अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास
मांडगे
चमकताना हृदयात वीज
कळ जिव्हारी लागते
किती जागून काढावी रात्र
रांझाच्या हिर ला विसरता न आले ~~~~
चुळबुळणारी संयमी सायंकाळ
मैत्रीचे जुळणारे नाजूक बंध
मनातले सारे मनातच ठेवायचं
शिशिरा नंतरच्या वसंताची वाट पहायचं ~
रिकाम्या गाळलेल्या भावना
तगमग अडखळणारी मध्यान्ह
अंतर्मनास हवा असतो दिलासा
भरतोय नकळत उसासा हृदयात ~~~
कुठे चुकते काहीतरी अडते
नको ती चुणूक दर्शवून जाते
सदाच नको तेथे रेंगाळते
थांब म्हणून कोठे ते ऐकते ~~~
आयुष्यात लोभस तुझी आरास
तुझे नसणे रिते मन भकास
निळ्या नभाचा चांद सांगतोय
तुझ्या नाजूकपणाचा थाट ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment