हेची दान देगा देवा ..... तुझा विसर न व्हावा
देवा,
जग काळं-पांढरं नसतं. सगळी चांगली माणसं सदासर्वदा चांगली नसतात आणि सगळी वाईट माणसं सरसकट वाईटच नसतात हे कळू दे मला. चांगल्या माणसातलं वाईटपण दिसलं म्हणून त्यांचा चांगुलपणा मी विसरून जाऊ नये आणि वाईट माणसांत दिसलं की चांगलं तर मी त्या चांगल्यावर विश्वामस ठेवून त्याही माणसावर ठेवून पाहीन भरवसा एवढी ताकद दे.! देवा, जे जे चांगलं ते ते मला दिसू दे.कळू दे.आत्मसात करता येऊ दे.!
देवा,
एक शेवटचं मागतो.
मला संत बनवू नकोस.फार अवघड असतं संत होणं.साधुपण निभावणं. मला साधा सामान्यमाणूसच राहू दे. मी माणसासारखाच माणुसकी जपत जगेन.चांगलं-वाईट करताना चुका करेन. पण देवा, एक नक्की कर. मी जर भरकटलोच कधी माणुसकीची वाट सोडून तर मला अशी अद्दल घडव की इतरांनाही कळेल की ‘माणूस’ होण्याची जबाबदारी निभावणं किती महत्त्वाचं असतं ते.! देवा, एवढं दे. जास्त नको.! इतपत दिलंस तरी माझी रोजची जगण्याची लढाई लढेन मी आनंदानं.!
देवारे तुझे काहीच मागत नाही फक्त माझ्यातीलच माझे मिळू दे.........
हेच दान देगा देवा ......... तुझा विसर न व्हावा .............
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण

No comments:
Post a Comment