Tuesday, December 1, 2015

मुक्तपक्षी - भाग = २५

                                                   मुक्तपक्षी - भाग = २५


अंतरंगातून सुचलेल्या चित्रचारोळ्या। .....







अर्थ गवसते स्नेहपूर्ण शब्दांचे


     जुळून आलेल्या अलवार क्षणांना


            माणुसकीतील  अंश नात्याचे

                  सप्तरंगाच्या कमानीत  हरखताना ~~~~~




गुंजतो स्वर होकाराने


  छेड़तो लकेर राग मल्हाराने


      लकाकते क्षितिज सप्तधनुने

          उत्सव होवु  दे धुंद  आवेगाने ~~~~~ 





हळुवार  दाटतात भावना ओठी


  चांदण्या रात्री  पैंजण  किणकिणली

     शहारून घट्ट जाली मीठी

        बहरून रातरानी गंधाळली ~~~~


हरएक सुख दु :खांचे भागीदार


  चूक भूल देणे घेणे सदैव त्याचे


     संवेदना जाणून  नेहमीच अबोल


        भाव डोळे , श्वासांबरोबर उलगडतात सारे ~~~





हिशेब सुखक्षण आठवताना


   चारोळ्या छान असतात म्हणे तुज्या


    नेतात स्री -पुरुष नात्याच्या पल्याड


      हळूवार  लाजतात शब्द मोहरताना ~~~~










राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!


                                                           कैलास मांडगे 

स्री आणि तिच्या संवेदना






.~~~~~~~~~~~~~~~~ स्री आणि तिच्या संवेदना ~~~~~~~
                                                                                             कैलास मांडगे ----------





वाह ..... काहीना हा फारच संवेदनशील विषय वाटतो ....
अगदी बागुलबुवा करून सोडलेय त्यांनी .........
मला ते विज्ञान काय ? कसे ? कशा साठी ह्या बद्दल अजिबात देणे घेणे नाही ......
पण मानसिकता महत्वाची .....
ज्या परमेश्वराने माझ्या आई .... बहिण यांना जसे अंग दिले तसे परमेश्वराने प्रत्येक स्री ला दिले .. माझा जन्म ज्या उदरातून .. ज्या मुशीतून झाला .... त्याचे एवढे अवडंबर का ?
स्त्रिया या प्रथमतः स्त्रियाच असून, त्या ज्याक्षणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व धारण करतील, त्याक्षणी हे जग सर्वार्थानं वेगळं अधिक सुंदर, अधिक आनंदमय होईल.
पुरुषांनी स्त्रियांचं मानसशास्त्र पूर्णतः दडपून टाकल आहे. आपल्याला जे दिसून येतं ते काही स्त्रियाचं खरंखूरं मानसशास्त्र नसून, ‘ पुरुषांनी तयार केलेलं ’, ‘ पुरुषांनीच स्त्रियांमध्ये निर्माण केलेलेअसं मानसशास्त्र आहे. खरे पाहू जाता जेवढे समजले जातात तितके काही स्त्री आणि पुरुष विभिन्न नाहीत. त्यांचे शरीरशास्त्र वेगळे आहे आणि त्यांचे मानसशास्त्रही निश्चितपणे वेगळे आहे. परंतु ते दोघेही दर्जाने बरोबरीचेच आहेत.............

पण नाही... काही ठराविक विकृती सोडायलाच तयार नाहीत ..... एवढ्या शा जागेसाठी केवढा कल्लोळ माजवतात लेकाचे आणि सरळ संस्कार .. पूजा ..आणि देवाच्या नावावर खपवतात .... हिम्मत तर पहा त्यांची .........
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्याा तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्या विचारांची निकड आहे.
सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्चिातीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्चिचत केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु
असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.
स्नेही हो आपला भारत देश हां संस्कृती प्रिय नक्कीच आहे पण अवडंबर माजवणारा नाही हे लक्षात घ्या . सर्व वेद्शास्र आणि प्राचीन वनस्पती आणि ग्रंथांनी समृद्ध आहे . भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही... जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्यांचाच आहे.
काही स्नेहींना किंवा कुणाला कदाचित पोष्ट रुचणार नाही .... यातील मते स्रीत्वाचा पुरस्कार करणारे वाटेल
परंतु हे माझे वयक्तीक मत आहे ..... आपणावर लादण्या चा माझा कोणताही हेतू नाही .... पण शेवटी एकच म्हणेन की नका पत्नी किंवा इतर स्रियांचा विचार करू .... पण आपल्या आवडत्या किंवां आपल्या माता भगिनींच्या जागेवर आहात असे समझुन विचार करा ... कदाचित सहमत असाल अशी अपेक्षा आहे ...
पण तरीही सहमत नसाल ... तर दिलगिरी व्यक्त करतो .........
                                                            
                                                                कैलास मांडगे ----------


!! श्री स्वामी समर्थ शरणं भवं !!
   राधे __/|\__ कृष्ण