मुक्तपक्षी - भाग = २५
अंतरंगातून सुचलेल्या चित्रचारोळ्या। .....
अर्थ गवसते स्नेहपूर्ण शब्दांचे
जुळून आलेल्या अलवार क्षणांना
माणुसकीतील अंश नात्याचे
सप्तरंगाच्या कमानीत हरखताना ~~~~~
गुंजतो स्वर होकाराने
छेड़तो लकेर राग मल्हाराने
लकाकते क्षितिज सप्तधनुने
उत्सव होवु दे धुंद आवेगाने ~~~~~
हळुवार दाटतात भावना ओठी
चांदण्या रात्री पैंजण किणकिणली
शहारून घट्ट जाली मीठी
बहरून रातरानी गंधाळली ~~~~
हरएक सुख दु :खांचे भागीदार
चूक भूल देणे घेणे सदैव त्याचे
संवेदना जाणून नेहमीच अबोल
भाव डोळे , श्वासांबरोबर उलगडतात सारे ~~~
हिशेब सुखक्षण आठवताना
चारोळ्या छान असतात म्हणे तुज्या
नेतात स्री -पुरुष नात्याच्या पल्याड
हळूवार लाजतात शब्द मोहरताना ~~~~
अंतरंगातून सुचलेल्या चित्रचारोळ्या। .....
अर्थ गवसते स्नेहपूर्ण शब्दांचे
जुळून आलेल्या अलवार क्षणांना
माणुसकीतील अंश नात्याचे
सप्तरंगाच्या कमानीत हरखताना ~~~~~
गुंजतो स्वर होकाराने
छेड़तो लकेर राग मल्हाराने
लकाकते क्षितिज सप्तधनुने
उत्सव होवु दे धुंद आवेगाने ~~~~~
हळुवार दाटतात भावना ओठी
चांदण्या रात्री पैंजण किणकिणली
शहारून घट्ट जाली मीठी
बहरून रातरानी गंधाळली ~~~~
हरएक सुख दु :खांचे भागीदार
चूक भूल देणे घेणे सदैव त्याचे
संवेदना जाणून नेहमीच अबोल
भाव डोळे , श्वासांबरोबर उलगडतात सारे ~~~
हिशेब सुखक्षण आठवताना
चारोळ्या छान असतात म्हणे तुज्या
नेतात स्री -पुरुष नात्याच्या पल्याड
हळूवार लाजतात शब्द मोहरताना ~~~~
राधे __/|\__ कृष्ण
!!
श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment