*मुक्तपक्षी - ४
* *ठरवले तर सहज शक्य आहे.* *अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....*
आयुष्य किती सुंदर आहे
फक्त तसं जगायला हवं
प्रत्येक नातं उमलणार आहे
फक्त ते जाणवायला हवं ~~~
कधी असे घडेल चांदण्या रात्री
उत्कट भावना दाटतील ओठी
एकांत क्षणी बावरी फुलराणी
मोहरता घट्ट होईल मिठी ~~~~~
दिलसे महसूस करो बीते हुये पलको
पलपल रुठना हम प्यार समझ बैठे
खता बेरुखी बहोत सही हमने
शायद ए अदा तो नही
आपके प्यार करने की कोई ~~~~~~
डोळ्यात सामावली आरास
उमलणारी अलवार पुष्करणी
हळुवार व्यक्त होऊ दे
सुरेल साद रेशमी क्षितिजावरची ~~~~~~
हृदयातल्या घालमेलीत
दुभंगून शहारली स्पंदने
रुसलेला चिंब ओला रुमाल
परत फिरतांना अश्रुंनी भिजलेला ~~~~~~~
राधे __/|\__कृष्ण कैलास मांडगे ~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment