=== मुक्तपक्षी - ५ ===
*हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर** ?**...* *आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर** ?**... * *ठरवले तर सहज शक्य आहे.* *अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....*
' गंधाली '
चिंब भिजले गवाक्ष
अलवार ओघळले आनंदाश्रू
सुगंधी दरवळ अक्षय आसमंत
सरीवर सरी बर्स्ल्यात
बाग हिरवी पैंजण फेर धरत
मनी माझ्या साद घाली
ओल्या मातीच्या गंधानं
भारावली साजणीची हाक
झाल्या अनावर सरी
चिंब चिंब भाव सारे
उर भरून कासावीस
गंध आवडला फुलांचा
म्हणून फुलं नको गं
माझ्या मनाला मीच
बांध घालीन वेळीचं
तुझं सुखं हेच गुंजन
तीच आपली फुलबाग
पान फुलांची सळसळ
चंदेरी मुकुट चढवून
फुलराणी होईल प्रफुल्लित ~~~~~~
कैलास ~~~~
जाणवतो आभास चैतन्याचा
स्वप्न कोलमडतात सत्यात
आठवणी सतावतात गतकाळाच्या
अंतरंग ढवळते वर्तमानात ~~~~
अंतरातले कासावीस गुंजन
आठव सारी काढतांना
तुझीच सारी आवर्तन
निशांत वाटते मनाला ~~~~~
गीत तुझे होतांना
गंध फुलांचा माळलेला
अलवार धुंद स्वर घुमताना
चैत्राचा मोसम सुगीचा ~~~~~~
अवकाळी बरसला भयाण सरसरला
इंद्रधनू नसता बाकी कसा अंगार
बरसून बरसून बेजार झाला
तुझ्यावर नाही आता भरोसा ~~~
राधे __/|\__कृष्ण कैलास मांडगे ..............
No comments:
Post a Comment