अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
खरी नाती , निस्सीम बंध मिळतात
पण कितीतरी पावसाळे जातात
जुळणारे वेळी अवेळी सुखभरे
अव्यक्त क्षण मोहन टाकतात
शब्दांच्या अर्थाचा अनर्थ नको
किती दिवसात लाभला निवांत
किती उष्ण पण मोहक हां स्पर्श
शहारून उठू दे चांदण्यांवर तरंग ~~~~
रोमांटिक सुचायला प्रेमच
करायला हवे कशाला
मैत्रीतही निर्मळ मोहक नात रुजत
मैत्रीच्या नात्यात क्षिति मनास होईल का ?
राजस बावरी ग राधा
अनुराग अजूनही तस्साच ताजा
जसे कुबेराचे फुलले भांडार
रोमरोम स्पर्शता दाटली लाली गालाला ~~~
मनापासून विश्वासाने प्रेम केलत
तर नक्कीच निर्व्याज प्रेम मिळते
प्रेमाची शाई असते आई
बासरीच्या सुरात गुंग होणारी राधाई ~~~
राधे __/|\__ कृष्ण
!!
श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment