आठव किती जपायचे
वर्तमान हेच मोल नात्यांचे
प्रेमात परिमल जपायचे
जगरीत सोबत चालायचे ~~~
आठवांच्या अल्हड़ लाटा
आलिंगन देताना ज़ेपावतात
तूच तर राधा तुजाच हां कान्हा
आसुसलेले मन भावविभोर हळवेपण ~~~
अलबेली तू सांजबावरी
सर्वार्थाने स्व:तस शोधणारी
सैरभैर उगीच वाटणारी
क्षणोक्षणी चाहूल कासाविक होणारी
झेंडा फड़फड़तो तुज्या भक्तीचा
अधर्माची लाठी नारी तू नारायणी
भक्तीने लगाम लागतो दुर्गुणाना
अम्बे तुज़ा महिमा वर्णावा किती ~~~~~
ईवल्याश्या मनाचा किती पसारा
पौर्णचन्द्र प्रीतीत धागा नात्यांचा
मुक्या भावनांना नजरेत वाचताना
मिटुन पापण्या रोमरोम भिनणारा ~~~
जाणते अजाणतेपणी समोर तीच छबी
आकाश आभासात साऱ्यांमधे तू
उगाच सावकाश शिकलो हे सार
जपून वेदना उरात बाळगतो ~~~~
जेव्हा रात्र मोहरताना लाजते
धुंद कळ्या टपोरतात
प्रितीचे गहिरे पदर न्याहाळते
बघ चांदण्या कशा टिमटिमतात ~~~~
जल्लोष आज मैफिलीचा न्यारा होता
शब्दा शब्दाना बहर होता
हर एक भावना मोती होत होता तिच्या प्रेमाचा कैफ मदहोश करीत होता~~~~~
राधे __/|\__ कृष्ण
!!
श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
..
No comments:
Post a Comment