Monday, January 25, 2016

प्रजासत्ताक दिन

                                    ::   प्रजासत्ताक दिन ::

भारतमातेच्या चरणी प्रत्येकाचे फुल व्हावे 

सगळ्या श्वासात भिनावा दरवळ 
smile emoticon

वंदे मातरम् !..
smile emoticon
 प्रजासत्ताक चिरायू होवो !

२६ जानेवारी! भारताचा प्रजासत्ताक दिन; हे बरेच लोक जाणतात.
पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी, या दिवसाचे महात्म्य टाळून 'हू केअर्स' असा पवित्र घेणा-यांची संख्याही मोठी आहे.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरकाकडे दुर्लक्ष करणारेही कमी नाहीत. जाण असून माहित नसल्याचे सोंग वठवून स्वत:स आधुनिक ठरवणा-या थिल्लर लोकांची संख्या आता भूछत्रासारखी वाढत आहे.
काहीना २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रजातंत्र सुरु झाले, इतकीच माहिती असते. फार कमी लोक या दिवसाची पाळेमुळे किती खोलवर रुतली आहेत ते जाणतात.
आपली रास्त ओळख जाणण्यात रस असलेल्यांसाठी हा छोटा लेख! 
२६ जानेवारी १९५० रोजी ख-या अर्थाने 'आपल्या देशात आपले राज्य' अशी परिस्थिती निर्माण झाली, हे निर्विवाद! ही शुभ सुरुवात करण्यास याच दिवसावर पसंतीची मोहोर, अत्यंत विचारपूर्वक मारण्यात आली आहे.
स्कॉटलंड, आयर्लंड प्रमाणे 'डॉमिनिअन विदिन द ब्रिटीश एम्पायर' हे ध्येय ठेऊन १९१६ साली ऑल इंडिया होमरूल ही मातबर संस्था स्थापन झाली.

या संस्थेच्या कार्यात महमदअली जिन्नाह, लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट, सर सुब्रह्मण्यम अय्यर, वगैरेंचा सहभाग होता. त्यांनी ब्रिटीशांच्या छत्राखाली प्रत्येक राज्यात स्वायत्त सरकार निर्माण करण्याची भलावण केली. 
पण पुढे सरकारने हिंदू-मुस्लीम प्रजेत फूट पडण्यावर भर दिला. जालियानवाला बागेतील बेछूट हत्याकांड, लोकमान्य टिळकांवर अन्याय, अॅनी बेझंटची अटक वगैरेमुळे भारतीय जनतेत असंतोष वाढला. शिवाय विश्वयुद्धामुळे परिस्थितीत वेगाने बदलत होती. म्हणून दृष्ट्या पुढा-यांना ‘अरत्र न परत्र’ स्वराज्य नको वाटले. पूर्ण स्वराज्याच्या विचाराचे बीज १९२० साली अंकुरु लागले. आपल्या देशात आपले सार्वभौमत्व असले पाहिजे, हा विचार देशातील धुरीण देशभर पसरवत होते. चर्चा विचारणा होत होत्या. कार्य कसे संपन्न करावे, या विषयी मतभेद असले तरी आपल्या देशात आपले सार्वभौमत्व असलेच पाहिजे, हा आग्रह यच्चयावत देशभक्तात जोर धरू लागला. 
त्या काळी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संदर्भात लाहोर आणि कलकत्ता या स्थानी निर्णय घेतले जात. ३१ डिसेंबर १९२९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी नॅशनल इंडियन काँग्रेसच्या सौजन्याने भारत स्वतंत्र असल्यागत लाहोर शहरी रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची मागणी सूचित केली. या ध्वजावर अशोकचक्राच्या जागी चरखा होता. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, वगैरेंनी पूर्ण स्वराज्याची मागणी करणारा मुद्देसूद विचार शब्दबद्ध केला. बुद्धीप्रामण्यवादी साक्षरांशी चर्चा करून 'डिक्लरेशन ऑफ ईंडीपेंडन्स ऑफ द इंडिया' चा मसूदा तयार झाला. यात पूर्ण स्वराज्यात ठीक काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट केले होते. १० वर्षांच्या वैचारिक मंथनाचे हे नवनीत! २६ जानेवारी १९३० रोजी नॅशनल इंडियन काँग्रेसने तो ठराव बहुमताने मंजूर केला. अपार आंदोलनांच्या परिणामी १५ ओगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला. पण देशाची आचारसंहिता तयार झाली नव्हती. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम चालू होते. १९४९ सालच्या २६ नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची घटना

राष्ट्रपतींच्या हवाली केली. वास्तविक ग्रीन व्हिले ऑस्टिन यांनी द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉरनर स्टोन ऑफ नेशन या लेखात घटनेच्या कार्यात सहभागी असलेल्या २१ सदस्यांची नावे विषद केली आहेत. आपली मजल सरदारपटेल, नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, आणि डॉ. राजेंद्र प्रसाद या सात महानुभावापर्यंत पोहोचते. पण भारताची घटना तयार करण्यात रक्ताचे केले, असे उरलेले १४ अलक्षित राहतात. एम.ए.अय्यंगार, दिवान बहादूर अल्लादी क्रिष्णस्वामी अय्यर, दिवान गोपाल स्वामी अय्यंगार, श्रीमती.जी.दुर्गाबाई . टी.टी.कृष्णमाचारी, (मद्रास प्रतिनिधी) जयरामदास दोलतराम (पंजाब) शंकरराव देव (दलितांचे मुंबई प्रतिनिधित्व) कन्हैयालाल मुनशी, (मुंबई. विख्यात गुजराती लेखक. पुढे मंत्री.) जी.एस.मुखर्जी (बंगाल. पुढे राज्यपाल), बेनेगल नरसिंह राऊ आणि माधव राऊ, (ओरिसा) सय्यद मोहम्मद अताउल्ला (आसाम) सत्यनारायण सिंह (बिहार) बी.पट्टाभी. सितारामैय्या, (मद्रास रुरल प्रतिनिधी. पुढे राज्यपाल मध्य प्रदेश. ) या १४ मधील काहीचे नाही
फोटो उपलब्ध की सविस्तर माहिती! डॉ. आंबेडकरांनी घटना राष्ट्रपतींना सुपूर्द केली,तेव्हा डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी बेनेगल नरसिंह राऊ यांच्या कार्याचा गौरव करून डॉ. आंबेडकरांच्या तोलाचे काम केले आहे, असे आवर्जून सांगितले होते. घटनेचे लेखन करणा-या आसाम प्रतिनिधी कुलधर चालिहा यांच्या अजोड ड्राफ्टिंगचा सन्मान केला होता. दुर्दैवाने या १४ महानुभावातील काहींची स्थिती आज नाही चिरा नाही पणती, या पठडीत आहे. वास्तविक वास्तविक घटना तयार होताच प्रजासत्ताक राष्ट्राची ९ डिसेंबर रोजी घोषणा करण्याचा प्रस्ताव आला होता. नेहरू सरकारला ते रुचले नाही. त्यांना पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला त्या ऐतिहासिक घटनेचे महत्व जोपासणे हवेसे वाटले. म्हणून २६ जानेवारीस प्रजासत्ताक राज्याची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानची घटना १९५६ मध्ये तयार झाली. 

१९४० सालच्या २३ मार्च रोजी 'मिनार ए पाक' चा विचार जाहीर करण्यात आला होता. म्हणून आपले अनुकरण करून त्यांनी २३ मार्च तारखेस महत्व दिले. भारतीय पूर्ण स्वराज्याचा तसेच ‘मिनार ए पाक’चा विचार लाहोरमध्येच जाहीर झाला, हा योगायोग! वृक्षाची वाढ व्हावी या साठी रोपाचे तुरे छाटतात, मुळे नव्हे. मुळे छाटल्याने रोपाची वाढ खुंटते. ते वृक्षरूप धारण करण्याऐवजी बॉन्साय बनते. मानवाचेही तसे आहे. इतिहास देशाची मुळे ठरतो. मॉडर्न बनण्याची हौस अतीताची मुळे छाटून भागवण्याचा उथळपणा केला तर व्यक्तिमत्व चहूअंगाने विकसित होत नाही. गगनाला गवसणी घालायची महत्वाकांक्षा बाळगायची नि 'मेरा भारत महान' ख-या अर्थाने सिद्ध करायचे असेल तर इतिहास जाणला आणि जतन केला पाहिजे. ते घडत नसल्याने ही घोषणा हास्यास्पद ठरत आहे. 
प्रगतीपथावर असलेल्या कोणत्याही देशात अशी होर्डिंग नाहीत. इतिहासाची मुळे छाटल्याने देश बॉन्साय बनत आहे, हा विचार व्हायला हवा.
तर मग चला मस्तक उन्नत करून मन:पूर्वक म्हणू या जय हिंद.
........सन्माननिय लेखक यांना .......त्रिवार मुजरा ..........
.....संग्रहित ......
उज्ज्वल भविष्यासाठी इतिहासाची जाणीव जागती ठेवणे आवश्यक! म्हणून २६ जानेवारी हा केवळ रजेचा दिवस न ठरवता या दिवसाचे महात्म्य आठवून चिंतन व्हावे. स्वराज्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले, त्या विख्यात तसेच प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या अनाम वीरांचे स्मरण केले पाहिजे. स्वार्थी राजकारणावर कुरघोडी करण्याची मनीषा बाळगली पाहिजे. कै. साने गुरुजींची 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' ही इच्छा जोजवत त्यासाठी प्रयत्न करण्यास कंबर कसण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पाहिजे. अशक्यप्राय करणीच्या संदर्भात मला तुकोबा आठवतात - निश्चयाचे बळ पटवणारे! केल्याने होत आहे रे... म्हणत सुषुप्त समाजास जागे करून कार्यरत करणारे समर्थ आठवतात. आणि बहुभाषिक भारतीय या नात्याने विविध भाषातील अशी वचने आठवतात. त्यात अग्रभागी असतो एक शेर - कौन कहता है आकाशमे सुराख नही होता? तबियतसे एक पत्थर तो उछालो यारो! सुराख म्हणजे भोक! कवी म्हणतो - पूर्ण शक्तीनिशी मनापासून उडवलेला फत्तर आकाशास भोक पडू शकतो. प्रयत्नांचे अनेक फत्तर उसळले तर नक्की आकाशाची चाळण होईल. 





आजच्या विपरीत परिस्थितीवर मात होईल. आजच्या शुभदिनी पूर्वसुरींचे स्मरण करून परिस्थिती बदलण्याचा वसा घेतला तर 'जितेगा भारत' हे दिवास्वप्न अवश्य सिद्ध होईल. ख-या अर्थाने भारत महान ठरेल आणि ज्या पूर्वसूरींनी अपर त्याग करून आपल्याला स्वराज्याचा नजराणा दिला, त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण केल्याचे सुख आपण मिळवू शकू. तुम्हाला नाही असे वाटत? 
तर मग चला मस्तक उन्नत करून मन:पूर्वक म्हणू या जय हिंद.
........सन्माननिय लेखक यांना .......त्रिवार मुजरा ..........
.....संग्रहित ..

राधे __/|\__कृष्ण                                                        कैलास मांडगे ~~~~~~~~~~~~~~~~


No comments: