Friday, June 5, 2015

मैत्रीतील संवाद

मैत्रीतील संवाद 
                                               

                                                                                                                                                                           

     मैत्रिणीच्या माजी प्रियकराबरोबर डेटवर जाने             बर्याच जणींच्या तत्वात बसत नाही .काही मैत्री          खातर तसे करने त्यांना आवडत नाही .
   पण जर तुमच्या मैत्रिणीच्या मनात त्या पुरुषा  बद्दल कुठल्याही फीलिंग्स नसतील आणि त्या                  दोघांनी आपाप्ल्यातील संबध समझूतिने दोघांच्या ही संमतीने संपुष्टात आणले असतील तर काहीही हरकत नाही .    परंतु स्वतः च्या स्वार्था पायी दोघांचे नात्यात वादविवाद तयार होऊन नाते संपूष्ठात यावे या साठी हेतू पुरस्कर त्याला डेट करने हे सर्वार्थाने चुकीचे आहे .
 तसे नसेल तर त्याच्याशी नव्याने नाते जोडण्यास काहीच हरकत नाही. मात्र काही गोष्टी पाळायला हव्या...
तुमच्या नात्याबद्दल मैत्रिणीपासून काहीही लपवू नका. उघडपणे तसे सांगणे जरा आव्हानात्मक आहे मात्र धीर करा व सगळे खरे सांगून टाका. हीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तिकडून कळल्यावर तुमची मैत्रिण जास्त दुखावेलहे लक्षात असू दया. 

       भूतकाळात जास्त डोकावू नका तुमच्या बॉयफ्रेंडचे तुमच्या      मैत्रिणीशी नेमके कसे नाते होते, त्याबाबत अधिकाधिक जाणून                 घेण्याची तुमची इच्छा असणे स्वाभाविक आहे. मात्र ते पाऊल तुमच्या     नात्यासाठी धोक्याचे ठरू शकते. भूतकाळात डोकावण्यापेक्षा तुमचे         नाते सुदृढ करण्याचा प्रयत्न करा.
    स्पर्धा टाळा  तुमच्या मैत्रिणीपेक्षा तुम्ही कशा सरस आहात हे तुमच्या    बॉयफ्रेंडला दाखण्याच्या प्रयत्नात तुमच्या मैत्रिणीचा अपमान करू           नका. यामुळे नात्यातला सहजपणा गमावून बसाल. तिचा आदर करा    जेणेकरून तुम्ही तिघे एकत्र असताना कुणालाच अवघडल्यासारखे          होणार नाही.
तुमच्या मैत्रिणीच्या माजी बॉयफ्रेंडबरोबर डेटवर जाताना वरील गोष्टी ध्यानात असू दया.

हे सर्वेक्षण न्यूयॉर्कमधील 'लिप्पे टेलर'ने 'हेल्दी वुमव डॉट ऑर्ग' चे संकेतस्थळ यांच्या संयुक्तमाने प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संशोधनात त्यांनी १८ वर्षे वय ते वृद्ध अशा एक हजार महिलांचे सर्वेक्षण केले असता वरील निष्कर्ष समोर आला आहे.
              या सर्वेक्षणातून आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, ४५ ते ५५ या वयोगटातील महिलांना प्रणयक्रीडा करतेवेळी वेगवेगळ्या प्रयोगांची अपेक्षा असते. यामागील कारण सांगताना मिलेनियम मेडिकल ग्रुपच्या संबंधीत असणाऱ्या मिशिगनच्या एक नर्स म्हणाल्या की, जस जसे वय वाढत जाते तसे महिला आपल्या जोडीदाराच्या जास्तच जवळ येतात. त्यांची ही जवळीकच त्यांच्या प्रणयक्रिडेतील आनंद वाढण्यास मदत करते. त्याबरोबरच त्या वेगवेगळ्या प्रयोगांनाही प्राधान्य देतात. म्‍हणजेच त्‍यांना प्रणयात नाविन्‍य हवे असते.

१. कारण... कदाचित यापुर्वी ती तरुणी अतिशय वेदनादायक दु:खातून गेलेली असेल.   


२. कारण... ती कोणासाठीही बदलू शकत नाही. 


३. कारण... रिलेशनशिपसारखा ड्रामा ती हाताळू शकत नाही.   


४. कारण... तिला नेहमी स्वातंत्र्य हवे असते. मग ते विचारात, वागण्यात, बोलण्यात, जगण्यात....अशा सर्वांत तिला नेहमीच स्वातंत्र्य हवे असते.  दुसऱ्याच्या आधारावर तिला जगणे आवडत नाही.




५. कारण...ती खूप क्लासी (उच्च प्रतीचे) आणि सोफिस्टीकेटेड जीवन जगते.



५. कारण...ती खूप क्लासी (उच्च प्रतीचे) आणि सोफिस्टीकेटेड जीवन जगते. 



एखादी मस्त करीअरची संधी असेल, पोटॅन्शिअल रिलेशनशिप असेल किंवा मग एक चांगला डिपेन्डेबल मित्र असेल या सर्वांवर पाणी सोडावे लागते. पण काळजी करू नका काही इंटरअॅक्शन टेक्निक्स आणि सरावाने तुम्ही तुमच्या या वागण्यावर सहज मात करू शकता. 

असे म्हटले जाते की, वय वाढले की महिलांचे शरिरसंबंधातले स्वारस्य संपते. मात्र, एका सर्वेक्षणात याउलटच निष्कर्ष समोर आला आहे. त्यानुसार वाढत्या वयानुसार महिलांची कामेच्‍छा वाढते तसेच त्यांना प्रणयात वेगळेपणही हवे असते.
            ओसंमं , प्रणयातूर / सेक्सी दिसणाऱ्या तरुणी                  नेहमीच एकट्या असतात . त्या पब मध्ये जातात .                   प्रणयातूर HOT तरुणांबरोबर मनमोकळेपनाने   बोलतात . त्यांचे बरोबर संगीतावर नृत्य ही करतात .  मात्र त्या पैकी एका ला ही प्रेम आहे किंवा   प्रेमा विषयी साद देत  नाहीत .
मग त्यांच्यासोबत 'डेटींगवर' जाण्याचा प्रश्न तर लांबच ! आणि म्हणूनच अशा तरुणींना त्यांच्या अटीनुसार जोडीदार मिळविण्यासाठी अतिशय वेळ लागतो, आणि विशेष वेळही....पाहुयात अशी १० कारणे जी ऑसम आणि सेक्सी तरुणींना 'सिंगल' राहण्यास भाग पाडतात.

६. कारण... तिचा स्वत:चा असा मुलींचा ग्रूप असतो                 आणि केवळ 
त्यांच्याबरोबरच ती मिक्सअप होते. 

७. कारण... सर्व कारणांसाठी ती केवळ
             पुरुषजातीलाच जबाबदार धरते.  


८. कारण... प्रत्येक व्यक्ती तिला समजू शकत नाही 


९. कारण... ती एक करिअर ओरिएंटेड मुलगी असते.


१०. कारण... तिला तिच्या योग्यतेचा जोडीदार अद्यापपर्यंत मिळालेला नसतो. 



थोडी जरी सोशलायजिंग असलेली परिस्थिती समोर आली तरी अंतर्मुखी लोकांना अनोळखी व्यक्तींसोबत मिसळणे खुप कठीण जाते. सोशली ऑकवर्डनेस असल्यास त्याची तुम्हाला खुप मोठी किंमत मोजावी लागते.

                                                                                                    संग्रहित .............


मुक्तपक्षी भाग क्रमांक -१२

मुक्तपक्षी भाग क्रमांक -१२ 
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
                     अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे






घडेल रीतीनेच सारं काही 
          होऊ दे अस्तित्वाची जाणीव 
                  शब्द मोत्यात माळशील कधी 
                      नभातला चंद्र हरखून कसा जाईल ~~~~


 सरळ हमरस्त्यावर असताना 
       अधून मधून वळणे ही असतात 
            पटपट नाही होणार मनासारखं 
               म्हणून झपझप थोडं चालायचं ~~~~~~

निरखता दिव्या खाली अंधार 
       भिरभिरणारया काजव्यांची लगबग 
            आठवात हरखून स्वप्नी जावं
                अथांग प्रेमात लीन व्हावं ~~~~~~


सुखावला सावळा गौरकांतीवर 
       येताना अनुभवतो आठव चंदेरी 
            जसे भेटणे केवड्याच्या बनात 
                 धुंद होतो कुंतलाच्या सुगंधात ~~~~



पहातोय वावटळ गोल चक्री 
     निळाई झाली गंभीर 
        लागता झळा रखरखत्या आगी 
            झाकोळून धुरळा काळवटले  क्षितीज ~~~~ 



जपून ठेवला सुगंध रातराणी चा 
         शिकलो सारे मोहक क्षणातून 
                ओलावा ठेवू नात्यात निळाईचा 
                   भावनांचे पिळ नको नात्यात ~~~~


मन कसे फुलपाखरू झाले 
  मौनात जशी सजा असते 
    तूच एक निर्विवाद सत्य 
       बाकी सारं व्यर्थ ~~~~



                                                 राधे __/|\__ कृष्ण                               कैलास मांडगे ~~~~~

!! असाही एक परीसस्पर्श !! लेखिका --सई (सौ .संतोषी केदार कदम )



!! असाही एक परीसस्पर्श !!




लेखिका --सई (सौ .संतोषी केदार कदम )

आपल्याच विचारांच्या गुंत्याने आपण आपली आयुष्ये गुंतागुंतीची करत असतो. आयुष्याचा खरोखरीचा अर्थ ज्यांना कळला आहे अश्या थोरामोठ्यांच्या आय़ुष्यात थोडे डोकावले की मात्र साध्या साध्या गोष्टींमधले त्यानी शोधलेले सुंदर अर्थ त्यांच्या जीवन रसरसून जगण्याचे रहस्य सांगुन जातात. मोठी माणसे मोठी का असतात ..त्यांचे मोठेपण साध्या सोप्या विचांरांमधे दडलेले असते. कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याची त्यांची अनोखी द्रुष्टी मनाला खूप वेळा नवा विचार, उभारी देवुन जातात.
बरेच दिवसांपासुन मनात होते अश्या सुंदर गोष्टींचा एक संग्रह आपल्यापाशी असावा.मनाच्या परिस स्पर्शाच्या या गोष्टी मग पडत्या-झडत्या,भांबावलेल्या प्रत्येक क्षणी आडोसा बनुन जगण्याची उर्मी पुनश्च तरारुन यावी..
काल youtube वर शोधता शोधता अचानक ही लिंक मिळाली.
हे प्रा. प्रवीण दवणे यांचे काव्यांजली - आड वाटेच्या कविताया कार्यक्रमामधले भाषण आहे. त्यात त्यांनी सांगितलेला हा किस्सा.
ते एकदा कविवर्य कुसुमाग्रजांना एका कुठल्याश्या कार्याक्रमामधे भेटले..आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला..
तात्यासाहेब् आजकाल कितीजण कविता करतात. कोणीही उठावे आणि कविता करावे असे चित्र आहे.
त्यावर ते म्हणाले...
सकाळी नांगर हातामधे धरणारा शेतकरी जर संध्याकाळी लेखणी हातात धरुन कविता करत असेल तर तो कदाचित चांगला कवी नसेल पण चांगला माणूस तर असेल.
कित्ती सहज आणि सोप्या शब्दात त्यांनी कविता आणि चांगला माणूस असण्याचे मर्म सांगुन टाकले. आपल्या स्रुजनाच्या ताकादीची जाणीव असणारे काही लोक सोडले तर बाकी आपण सगळेच,’कशाला काही लिहायचे... कोण वाचणार..’ , ’थोरा मोठ्यानी लिहुन ठेवलेय तेच वाचावे आणि गुमान बसावेअश्या प्रश्न्नानी, विचारांनी ग्रासलेले असतो. रोजच्या जगण्यातल्या कुठल्यातरी अत्रुप्त स्वप्नाच्या छायेमधे हीनगंड बाळगु लागतो. कित्तेक वेळा सुप्त मनात
असलेली ही गोष्ट तुमच्या मनातली कविता कागदावर उतारु देत नाही... पण मला वाटते वरची गोष्ट नक्कीच या उगीचच्या जडत्वावरचे झाकोळ दूर करेल आणि एक चांगला माणूसहोण्यासाठी मनाची कवाडे स्रुजनाच्या दिशेने उघडी करेल..


                                                            सई (सौ .संतोषी केदार कदम )

मुक्तपक्षी --११

मुक्तपक्षी --१1 
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
                         अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे


कुजबुज अशी पाखरांची 
   अजूनही भासे अल्हड यौवनाची 
       जशी सौंदर्य कळी मोहरली 
            अलवार कळी फुलात प्रकटली ~~~~





चेतनमय रक्ताळलेल्या मनावर 
    घाव सतत पेलत आली 
      संध्या समयी परतता गृही 
        निळाईत गुंतून जाई ~~~~~~ 





धुंद कळी फुंद सावळा 
      मोहरला बघ केसात मोगरा 
          तनबावरी  मिठीत  बांधता 
                ऋतुगंध फुलता झालं बावरा ~~~~~





गाढ मिठी एकरूप अशी 
    रात्र फुलली चंद्र प्रकाशी 
         धुंद मोगरा अन रातराणी 
               मोकळ्या आकाशी काही क्षण अनुभवली .. 





       निरखता फुलं गुलबकावलीचे 
                    भास आहेत अनंत सारे 
                          पंखात तुझ्या बळ यावे 
                              तरच साद घालीन लाजणारे ~~~~~




   जयघोष नसे प्रीतीचा तरी 
           नाद अखंड तव नामाचा 
                उर्मी प्रबळ दाटते मधूगंधी 
                       धिटाई तुझी मज हवीहवीशी ~~~~









                                                राधे __/|\__कृष्ण                        कैलास मांडगे ...........

देवा माझे ~~नि ~~शब्दाचे हे नाते असेच अतूट राहू दे……. सई (सौ. संतोषी केदार कदम )

-------देवा माझे ~~ नि ~~ शब्दांचे नाते अतूट राहू दे --------


"तुझ्यातूनी सुरूवात तुझ्यापाशी अंत माझ्यातूनी तुही

 तसा शोधसी एकांत माझ्या तळहाती तुझे शाश्वत
 गोंदण तुझ्या वाटेवर माझी आनंद पेरण..। काल सांज वेळी अशीच खिडकीबाहेर पाहता पाहता , सहजच विचार करता करता पाच वर्षांपूर्वी लिहीलेली एक कविता आठवली. मला खूप आवडते ती कविता. नेमकी त्यातली एक ओळ बराच वेळ आठवत नव्हती. आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या आठवेनाच. मग वाटले जाऊ दे कुठे इतका ताण देऊ जाऊ दे आठवेल नंतर …. पण मन कुठे थाऱ्यावर खुप अस्वस्थ झाले आठवत का नाही .
शेवटी आठवली. खूप हलकं वाटलं. क्षणभरापूर्वी आपण किती अस्वस्थ झालो होतो हा विचार लगेचच मनात आला. कवितेतली ती ओळ आठवल्यावर आनंद नक्कीच झाला होता. पण तो आनंद नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. खूप जवळचे मित्रमैत्रिणी भेटले की जसा आनंद होतो ना तसाच काहीसा. पण त्या मित्रमैत्रिणींपेक्षाही जवळचं.. मनाच्या गाभ्याशी असलेलं काहीतरी परत मिळाल्याचा आनंद होता तो. अव्यक्त! त्या क्षणी जे वाटलं ते खरंच व्यक्त करता आलं नाही मला. एरव्ही शब्दांच्या दुनियेत रमणारं हे मन शब्दांमुळे मिळणारा हा आनंद शब्दांतून व्यक्त करू शकलं नाही. शब्द... शब्दांशी माझी नाळ लहानपणीच जोडली गेलेली. स्वतः हातात घेऊन वाचलेलं पहिलं पुस्तक.. चंपक! चंपकने मला शब्दांशी मैत्री करायला शिकवलं. त्या नकळत्या वयातही गोष्टींमधल्या मूल्यांचा संस्कार माझ्या मनावर घडवला. पंचतंत्र, हितोपदेश, परीकथा, सुरस गोष्टी.. खूप आवडायला लागली पुस्तकं. पुढे ललितलेख, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, निसर्गवर्णनं, काव्यसंग्रह, मासिकं, नियतकालिकं, दिवाळी अंक
असं बरंच काही वाचायला लागले. पु. लं., वपुंच्या अनेक पुस्तकांची पारायणं केली. शांता शेळके, गदिमा, भट साहेब, पाडगावकर वाचून आतला जिप्सी जागा होत गेला. भट साहेबांनी शृंगाराचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडला. ह्या शब्दांनी लहान वयातच हात लिहिता केला. शब्दांची अर्थाशी.. अर्थाची विचारांशी आणि विचारांची जगण्याशी सांगड घालण्याला सुरुवात झाली तीही नकळतच.. कोऱ्या कागदावर कसलीतरी जादू झाल्यागत शब्द उमटवून घेणारा तो परमेश्वर! त्या शब्दांशी केवढे जोडले गेलोय आपण..! आयुष्यात पुढे जाऊन अगदी
कशाचीही उणीव भासली तरी ही पुंजी मात्र वाढतच राहणार.. शब्दांचं आणि माझं हे नातं असंच घट्ट होत राहणार.. लहानपणीचा 'चॉकलेटचा बंगला' आठवला. केवढी सुबत्ता होती त्या बंगल्यात! तशीच काहीशी सुबत्ता माझ्यापाशीही वाढत जाणार.. शब्दांची.. अर्थाची.. विचारांची! कधीच कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही अशी.. परमेश्वराने बहाल केलेल्या ह्या अव्यक्ताच्या लेण्यासाठी मनोमन आभार मानले त्याचे. शब्दांचा हा संग कधीच सोडायचा नाही असा निर्धार केला आणि पाहते तर........ सांज वात लावण्याची योग्य वेळ झाली होती ……………….
देवा माझे नि शब्दाचे हे नाते असेच अतूट राहू दे…….
सई (सौ. संतोषी केदार कदम )