मुक्तपक्षी भाग क्रमांक -१२
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात
आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज
सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
घडेल रीतीनेच सारं काही
होऊ दे अस्तित्वाची जाणीव
शब्द मोत्यात माळशील कधी
नभातला चंद्र हरखून कसा जाईल ~~~~
सरळ हमरस्त्यावर असताना
अधून मधून वळणे ही असतात
पटपट नाही होणार मनासारखं
म्हणून झपझप थोडं चालायचं ~~~~~~
निरखता दिव्या खाली अंधार
भिरभिरणारया काजव्यांची लगबग
आठवात हरखून स्वप्नी जावं
अथांग प्रेमात लीन व्हावं ~~~~~~
सुखावला सावळा गौरकांतीवर
येताना अनुभवतो आठव चंदेरी
जसे भेटणे केवड्याच्या बनात
धुंद होतो कुंतलाच्या सुगंधात ~~~~
पहातोय वावटळ गोल चक्री
निळाई झाली गंभीर
लागता झळा रखरखत्या आगी
झाकोळून धुरळा काळवटले क्षितीज ~~~~
जपून ठेवला सुगंध रातराणी चा
शिकलो सारे मोहक क्षणातून
ओलावा ठेवू नात्यात निळाईचा
भावनांचे पिळ नको नात्यात ~~~~
मन कसे फुलपाखरू झाले
मौनात जशी सजा असते
तूच एक निर्विवाद सत्य
बाकी सारं व्यर्थ ~~~~
राधे __/|\__ कृष्ण कैलास मांडगे ~~~~~
No comments:
Post a Comment