Friday, June 5, 2015

!! असाही एक परीसस्पर्श !! लेखिका --सई (सौ .संतोषी केदार कदम )



!! असाही एक परीसस्पर्श !!




लेखिका --सई (सौ .संतोषी केदार कदम )

आपल्याच विचारांच्या गुंत्याने आपण आपली आयुष्ये गुंतागुंतीची करत असतो. आयुष्याचा खरोखरीचा अर्थ ज्यांना कळला आहे अश्या थोरामोठ्यांच्या आय़ुष्यात थोडे डोकावले की मात्र साध्या साध्या गोष्टींमधले त्यानी शोधलेले सुंदर अर्थ त्यांच्या जीवन रसरसून जगण्याचे रहस्य सांगुन जातात. मोठी माणसे मोठी का असतात ..त्यांचे मोठेपण साध्या सोप्या विचांरांमधे दडलेले असते. कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याची त्यांची अनोखी द्रुष्टी मनाला खूप वेळा नवा विचार, उभारी देवुन जातात.
बरेच दिवसांपासुन मनात होते अश्या सुंदर गोष्टींचा एक संग्रह आपल्यापाशी असावा.मनाच्या परिस स्पर्शाच्या या गोष्टी मग पडत्या-झडत्या,भांबावलेल्या प्रत्येक क्षणी आडोसा बनुन जगण्याची उर्मी पुनश्च तरारुन यावी..
काल youtube वर शोधता शोधता अचानक ही लिंक मिळाली.
हे प्रा. प्रवीण दवणे यांचे काव्यांजली - आड वाटेच्या कविताया कार्यक्रमामधले भाषण आहे. त्यात त्यांनी सांगितलेला हा किस्सा.
ते एकदा कविवर्य कुसुमाग्रजांना एका कुठल्याश्या कार्याक्रमामधे भेटले..आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला..
तात्यासाहेब् आजकाल कितीजण कविता करतात. कोणीही उठावे आणि कविता करावे असे चित्र आहे.
त्यावर ते म्हणाले...
सकाळी नांगर हातामधे धरणारा शेतकरी जर संध्याकाळी लेखणी हातात धरुन कविता करत असेल तर तो कदाचित चांगला कवी नसेल पण चांगला माणूस तर असेल.
कित्ती सहज आणि सोप्या शब्दात त्यांनी कविता आणि चांगला माणूस असण्याचे मर्म सांगुन टाकले. आपल्या स्रुजनाच्या ताकादीची जाणीव असणारे काही लोक सोडले तर बाकी आपण सगळेच,’कशाला काही लिहायचे... कोण वाचणार..’ , ’थोरा मोठ्यानी लिहुन ठेवलेय तेच वाचावे आणि गुमान बसावेअश्या प्रश्न्नानी, विचारांनी ग्रासलेले असतो. रोजच्या जगण्यातल्या कुठल्यातरी अत्रुप्त स्वप्नाच्या छायेमधे हीनगंड बाळगु लागतो. कित्तेक वेळा सुप्त मनात
असलेली ही गोष्ट तुमच्या मनातली कविता कागदावर उतारु देत नाही... पण मला वाटते वरची गोष्ट नक्कीच या उगीचच्या जडत्वावरचे झाकोळ दूर करेल आणि एक चांगला माणूसहोण्यासाठी मनाची कवाडे स्रुजनाच्या दिशेने उघडी करेल..


                                                            सई (सौ .संतोषी केदार कदम )

No comments: