Tuesday, April 14, 2015

स्वगत -- प्रा.मा. अलकाजी गांधी -असेरकर



                                                स्वगत -----                           प्रा.मा. अलकाजी गांधी -असेरकर 

दिनांक ८ मार्च महिला दिनी -- प्रा.मा. अलकाजी गांधी -असेरकर यांचे मला भावलेले स्वगत ...................
अलका जी गांधी ......... ह्या प्राध्यापिका असून नेहमी स्री विषयक लिखाण करीत असतात . महिला विषयक बाजू सकारात्मकतेने मांडून ..महिलांच्या सर्व अंगांतूनचौफेर असे त्यांचे लेखन असते . पण प्रत्येक लिखाणात त्यांची अपेक्षा असते . की हे मत माझे वयक्तिक आहे . आपणास किती भावते हे ज्याचा त्याचा व्ययक्तीक  विषय        असतो . त्यामुळे आपण सुद्धा वाचताना आपण सहमत असावेच असे नाही .

उद्या ८ मार्च...        
 साहजिकच अनेकांना तुझ्या प्रेमाचं भरतं येईल..
तसं ते नेहमी येत असतं...पण ते वेगळ्या कारणाने 
)..त्यात सर्वप्रथम तर तू माता म्हणून किती श्रेष्ठ आहेस या जगात ते तुला ठासून सांगितलं जाईल .पण ते त्यांच्या मुलांची माता म्हणून...तू त्यांच्याशिवायच माता झालीस तर तो कसा घोर अपराध आहे हे तुला चांगलंच ठाऊक आहे..
तात्पर्य, महत्त्व नुसत्या मातेला नाही..तर त्यांच्या वंशाची तू माता असल्याचं आहे)..(शिवाय, भाषेतल्या शिव्यांना माता-भगिनीमुळेच तर महत्त्व आहे नाही का...ती नसती तर सारे चतुष्पाद कुणाला लावता आले असते..)
.नंतर उतरत्या क्रमाने बहीण, सखी, पत्नी, प्रेयसी, मुलगी वगैरे वगैरे रुपात तुझे गुणगान गायिले जाईल...

सारे तुला सल्ले देतील...तुझे स्वातंत्र्य,
तुझ्या जाणीवा, तुझी मुक्ती, तुझं उडणं, तुझं नटणं, तुझे कपडे, तुझे केस, तुझे यंव, न तुझे त्यंव..हे सारं कधी, कसं असावं याच्या व्याख्या तुला पुन्हा शहाजोगपणे समजावल्या जातील.
..'त्यांच्या'शी बरोबरी करणं कसं चुकीचं आहे हेही चपखल शब्दांत समजावतील..त्यात तुझा भलेपणा कसा आहे हेही साळसूदपणे सांगतील...
असंही तुझ्याकरिता काय योग्य न काय अयोग्य हे तेच ठरवत आलेत आजपर्यंत...
.कारण तुला अक्कल नाही अशी त्यांची ठाम गैरसमजूत आहे....तू ही हो ला हो करत आजपर्यंत मुंडी हलवून  त्या  समजाला बळकटी दिलीयस.....तशीच देशील...

हे सारं तुला पटवून देण्यासाठी तुझ्यातल्याच काहीजणींची ते मदत घेतील...
             उद्या ते सारे तुझी महाआरती गातील...आणि तुझ्याशिवाय त्यांची कशी गती नाही हे संभावितपणे आळवतील..

आता या सा-याला सामोरं जाण्याची
 रात्रभर तयारी कर    ...देवी म्हणून सिंहासनावर बसायचंय, की 
प्रत्येक कौतुकाच्या वाक्याची तटस्थपणे शहानिशा करून माणूस म्हणून कसं वागायचं, ते तूझं तू ठरवायचं...हे तुझ्या हातात आहे.......
म्हणून मी ठरवतेय..     
 त्या प्रत्येक आदमला सांगायचं....माझ्यासाठी  काय भलं आणि काय बुरं हे माझं मला ठरवू दे आता...कारण मीही तर तुझ्याएवढीच वयस्क नाही का...
तुझ्या बरोबरच माझाही जन्म झालाय एकाच वेळी....
समजा अक्कल नसलीच, तर कदाचित ती तुझ्यात नसेल...कारण मी लाख तुला सफरचंद तोडायला सांगितलं...पण तू जर हुशार असतास तर तू ते तोडता ना.................. 



             ........ कविता माझी-.........
     कविता माझी तुमच्यासाठी
      कधीच नसते
      याच्यासाठी, तिच्यासाठी
      अन् 'त्या'च्यासाठी तर
       मुळीच नसते..
       कविता माझी अल्लड पोर
       कधी जीवाला उगीच घोर
       कधी मावळत्या चंद्राची कोर
       कधी उगवत्या दिनकराची भोर
कधी कंकणी किणकिणते
पैंजणी रुणझुणते
त्वेषाने खणखणते
कधी मनाशीच गुणगुणते
कविता माझी
भजनात दंगते
पुजनात रंगते
लावणीत नादते घुंगरासवे                                                                         पोवाडा गाते डफासवे
                                 
कधी चोरून फिरते
प्रेमाच्या गावाला 'त्या'च्यासवे
कविता माझी
रुढी तोडते रूढीत अडकते
स्वच्छंद उडते बेडीत फसते
ही तंत्राच्या पलिकडली
ना समीक्षेत सापडली
कशी कुणास सांगू वाचा कविता माझी.....

                                                                                                                                  -अलका

     राधे __/|\__कृष्ण                                            

No comments: