~~~~ प्रीत योगायोगाची ~~~~
सौ. तारा ठाकरे - मुंबई
प्रिन्सिपल .... प्रबोधन ठाकरे ...विद्यालय
एका सेमिनार
च्या निमित्ताने ती दोघ एकमेकांना भेटले खूप जुजबी ओळख झाली ती पत्रकार आणि तो
लेखक सेमिनार नंतर दोघे आपापल्या घरी निघून जातात पण निरोप घेताना
...एकमेकांना पत्ता देऊन जातात, एकमेकांशी सातत्याने पत्रव्यवहार चालू असतो दोघही
एकमेकाचे प्रेरणास्थान बनतात पण तिने सांगितलेले असते तू मला भेटायला मी
सांगेपर्यंत येणार नाहीस तो हि अट मान्य करतो.
पण विधिलिखित
वेगळे असते ..
त्यांची भेट कधीच
होणार नसते ....
दुर्दैवाने
बातम्या चे वृत्तांकनास जात असताना तिचा अपघात झाला ..
अपघात मोठां होता
त्यात ती अपंग झाली... तिच्या मेंदूला ही बरीच दुखापत झालेली होती या जीवघेण्या प्रसंगाने तिची
पत्रकारिता थांबते पण तरीही ती त्याला कळवत नाही.
त्याची लेखक म्हणून घौडदौड चालू असते..
दोघांचा
पत्रव्यवहार नियमित सुरु असतो आणि या विचारांच्या देवान घेवाणीत ते एकमेकाच्या
प्रेमात कधी पडले ते समझले देखील नाही ....
तो तिला त्याच्या कथानकातील मध्यवर्ती
नायिका समजून लिखाण करीत असतो. सर्व पुस्तके तिला पाठवतो ती वाचते अभिप्राय दाखल खूप मार्मिक पत्र पाठवत असे.
अशी त्यांची जगावेगळी कल्पने पलीकडची प्रेमकहाणी असते. परंतु नियती
ला हे मान्य नव्हते .... दरम्यान तिची प्रकृती खूप खालावते व उपचारापलीकडे दुखणे
जाऊन दुर्दैवाने ती त्याच्या आठवात प्राण सोडते.
त्याला यातील
काहीही माहीत नसते त्यामुळे त्याचे नियमित पत्रव्यवहार करने चालू असते ...
पण पत्राचे हल्ली उत्तर मिळत नाही...
हे
पाहून तो बेचैन होतो ... रागावलीस का ?
काही झाले का ?
तु ठीक
आहेस नं ?
असे ही प्रत्येक
पत्रात विचारणा करीत असतो ..
काही वेळा
आयुष्यात असे काही वळणे येतात की ते नियतीलाचं माहीत असतात ...
त्या गावात पोष्टऑफिस चा विस्तार वाढतो ... पोस्टमन
बदलतो आणि तिच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या ... दुस-या घरी पत्र घेऊन जातो..
योगायोग कसा
...
ती तिचीच मैत्रीण पण आंधळी असते तिला आश्चर्य वाटते कोणी मला पत्र पाठविले.
ती
आश्चर्य चकित होते .
पण उत्सुकता म्हणून व शिष्टाचार मोडून ते पत्र ती पोस्टमनला पत्र
वाचायला सांगते आणि त्यातले भाव वाचून आपल्या मैत्रिणीच्या आठवणीने तिला गदगदून
येते आणि याची जाणीव होते कि त्याच्या
कथानकांची नायिका माझी स्वर्गीय मैत्रीणचं आहे म्हणून ...
ती खूप विचार
करते आणि पोस्टमन ला दुस-या दिवशी यायला सांगते ....
यावेळी तीची अवस्था अतिशय चलबिचल असते ..
तिच्या मनात योग्य की अयोग्य ...
काय करावे ? होय ... की नको ?
काय करावे ? होय ... की नको ?
पण तिने पुन्हा वर्तमान आणि भविष्याचा विचार करून
त्याला धीर देण्याचा निर्णय घेतला .
दुसऱ्या दिवशी पोष्टमन
यांना विनंती करून ती पत्र लिहायला सांगते आणि जे कधी संपलेच नव्हते असे पुन्हा होऊन
पत्र लिहिण्याचा क्रम सुरु होतो.
पोस्टमन लिहून देत असतो पहाता पहाता ~~~
आठ ते दहा
वर्षाचा कालावधी लोटतो~~~
कालानुरूप तो एक प्रतिभावंत आणि प्रसिद्ध लेखक म्हणून
नावारूपाला येतो .
खूप नावलौकिक
मिळवतो पण आताशी त्याच्या सहनशीलतेचा बांध सुटतो...
मी तुला भेटणारच .....
तिची आंधळी
मैत्रीण खूप धीराने आणि हिम्मत एकवटून त्याला ..
ये~~~ असे
कळवते ...
कैक वर्षानंतर भेटण्याचा
क्षण जवळ आलेला हे पाहून तो तिला भेटण्या साठी खूप आतुर होतो ... आणि लगेच पुढील
रविवारी तो तिच्या गावी पोहचतो ... त्याची तिच्याशी भेट होते.
तिच्याकडून भुतकाळाच्या
सर्व वेदनामय घटना ऐकतो... नियतीने त्याचेशी केलेला खेळ पाहून खूप खिन्न होतो.
तिच्या आठवणीने
तो अतिशय कासावीस होतो त्याला भडभडून येते.
त्याची ही
अवस्था पाहून तिची मैत्रीण त्याच्याकडे माफी मागते...
मी तुला फसवले
तिच्या नावाने पत्र लिहून !!!
पण त्यावेळी तू
यशस्वी होण्याचा मार्गावर होता.. आणि तिच्या दुख:न निधना च्या बातमीने कदाचित तू उन्मळून पडला असता,
यातून सावरला
नसता ..
कदाचित दुखी
होऊन तुझे लिखाण थांबले असते ..
तुझे वर्तमान
अंधारमय होऊ नये ....
हे सर्व लक्षात
घेऊन योगायोगाने आलेले पत्र पहाताच त्यात खंड न पडू देता मी सद्सद्विवेक बुद्धीने
तिला तु गृहीत धरावे या मानसिकतेने पत्रव्यवहार चालू ठेवला...
मी तुझी दोषी
आहे ... मला तु हवी ती शिक्षा दे !!
हे ऐकून तो
धीरगंभीर होऊन अवाक झाला .
तिच्या
पत्रातील लेखनातील वैचारिक दृष्टीकोन त्याने अनुभवलेले होते .
तिने योग्य
प्रसंगी दाखवलेले बौद्धिक चातुर्य ...
पण आता तिला
प्रत्येक्ष पाहित्यानंतर ति जग पाहू शकत नाही . तरी ही तिने तिच्या अंधत्वा वर मात
करून पोष्टमन यांना वेळचे वेळी मदत करायला भाग पाडले .त्यासाठी तिला प्रत्येक वेळी
किती अडीअडचनिंना सामोरे जावे लागले असेल . असे नानाविध विचारचक्र त्याच्या मनात
तांडव करीत होते .
पण दुसरी बाजू
पाहिली तर जर तिने मला कळवले असते आणि मी त्या दुखात एकटा पडलो असतो ... त्यातून
आलेल्या निराशेतून बाहेर पडलो नसतो तर ?
आज मी प्रतिभावंत नसतो .... कारण माझी नायिका चं संपली असती मी काय लिखाण केले
असते .... त्यामुळे हीने मला मोठा आधार दिला. माझी प्रतिभा वाया जाऊ दिली नाही ...
आता माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे की ही जरी अंध असली तरी आम्हाला दोघांची
एकमेकांना गरज आहे .
आता तूच माझ्या कथांची नायिका...
,माझी सर्वस्वी
जबाबदारी आणि प्रेरणा सुद्धा ....
तो तिला घेऊन
शहरात त्याच्या घरी येतो व पुन्हा नव्याने लिखाण सुरु करतो.
एक यशस्वी लेखक होतो तात्पर्य .....
"एखाद्याला
यशस्वी होण्यासाठी केलेली एखादी प्रामाणिक चूक सुद्धा कधी कधी उपकारक असते ""!!!!!
सौ तारा ठाकरे ```
राधे __/|\__ कृष्ण कैलास मांडगे ............
No comments:
Post a Comment