अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
अस्तनीत निखारा जपणारा
कटू भूतकाळ सोडणारा फक्त मी असतो
थबकणाऱ्या वर्तमानाचे भान येता
अश्रूत बुडण्याआधी कधी लाचार नसतो ~~
धिटाईत ही नाजूक साजुक
अबोल असूनही दृश्य अवखळ
ओळखतो सारे नि:शब्द हुंकार
मनपाखरू भिरभरते तुझ्याच आसपास ~~~
कसल्या वेदना घेऊन बसलाय
तू तर अंधार्या रात्री चरफडला
संपव दु:ख वेदनांचा एल्गार
घाल साद फुलव मधुबहार ~~~~
नशीबवानच असतात प्रेमजोड्या
नको उगी चुकीचे समझ ठरवलेले मनात
सळसळत्या धुंदीत तन्मय व्हा ..हरखून जा
थोडे मस्तवाल जगून पहा ~~~~
पेटलेले रान पुन्हा कितीदा विझवताना
हरवलेले वास्तव भान सोडून जाते
भासतात रंगबेरंग गोठलेले ओठांत
मैत्रील अकारण कोसताना पायउतार होऊ नये ~
श्री स्वामी समर्थ राधे __/|\__कृष्ण कैलास मांडगे ~~~
No comments:
Post a Comment