अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
चंद्रमौळी घरात दरवळतो
तू लावलेल्या चाफ्याचा गंध
कुणाला नाही पण मला कळतो
तुझ्याच स्पंदनांचा स्पर्श ~~~~
जाणवली तलवार दुधारी
पण प्राजक्ताचा गंध माळणारी
न समझणारी अबला स्वतः ला
भाव पेरताना वसंत फुलवणारी ~~~
गंधारलेले भाव स्पर्शताना
परत शुभारंभी तेथेच मी उभा
हळहळतो श्वास गुदमरताना
वटवृक्ष भावनांचा उन्मळून पडताना ~~~~
गुदमरलेल्या श्वासातला मुक्त झाला स्वर
धुंदावून आलाय अबोल नक्षत्र
सुगंधी मातीत लावूया पिंपळपान
उमललेल्या प्रेमाचे अंकुर जपूया जीवापाड ~~~
फेसाळनाऱ्या लाटेत चिंब व्हायचं
सागराची गाज ऐकून शहारायचं
मोहक मृण्मयी क्षणात हरवायचं
ऋतू नसतानाही राग मल्हार गायचं ~~~
श्री स्वामी समर्थ राधे __/|\__ कृष्ण कैलास मांडगे ~~~~
No comments:
Post a Comment