अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.
भावना फुलतात क्षणात डोळ्यात
मखमली शब्दांचा स्पर्श ओठांवर
लटकेच रुसणं गात्र शहारतात
चैत्रात गुलमोहराला आलाय मोहोर ~~~
जपून ठेवला सुगंध रातराणीचा
शिकलो सारे मोहक क्षणातून
ओलावा ठेवू नात्यात निळाईचा
भावनांचे पीळ नको नात्यात ~~~~
प्रत्येक क्षणी धुंद फुंद मी
ध्यास मी श्वास मी
बंध जुळून बेहोश मी
न संपणारी साठवण तू ~~~~~~~~~~
मन कसे फुलपाखरू झाले
मौनात जशी सजा असते
तूच एक निर्विवाद सत्य
बाकी सारं व्यर्थ ~~~
प्रत्येक श्वासात चाहूल
भावनांना कसं उधळून देवू
रोजचं स्वप्नात काहूर
क्षणभंगुर जीवनाशी नको खेळू ~~~~
श्री स्वामी समर्थ राधे __/|\__ कृष्ण कैलास मांडगे ~~~
No comments:
Post a Comment