""विमलताई, तुमचं वय आता 62 वर्षे आणि तुमच्या पतीचे 68. सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण केल्यात. दोन्ही मुलींची लग्नं झाली,
मुलाचंही
लग्न झालं, त्यांचा
संसारही मार्गी लागला. त्यांना त्यांच्या मनासारखं
करियरही मिळालं. आता तुम्हाला नव्याने काही करण्याची गरजही नाही. मग आता या
वयात घटस्फोट घेण्याची भाषा तुम्ही का करताय?''
""अहो, या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठीच तर मी इतके दिवस हे पती-पत्नीचं नातं टिकवलं. आयुष्यभर मी नवऱ्याच्या मर्जीनेच वागत आले. सतत संशय... कोणाशी कधी मोकळेपणाने बोलता आलं नाही की कधी कुठे जाता आलं नाही. साधं भाजी आणायलासुद्धा मी एकटी जात नसे. माझ्याबरोबर कुणाला तरी घेऊन जावं लागायचं. माझ्या हातात कधीही पैसा नसायचा. मोजके पैसे मिळायचे आणि सामान किंवा कोणत्याही वस्तू आणल्या तरी त्याचा पै न पैचा हिशेब द्यावा लागायचा. घरात माझ्या कोणत्याही गोष्टीचं कधीही कौतुक झालं नाही. रांधा वाढा आणि उष्टी काढा याशिवाय दुसरं जग नव्हतं. माझी पदवी तर मला गुंडाळूनच ठेवावी लागली. माझ्याच घरात मला ना सत्ता, ना पैसा आणि ना मान तरीही सहन करत राहिले ते फक्त मुलांसाठी. आता मुलं मार्गाला लागली, जबाबदाऱ्या संपल्या; परंतु माझा त्रास संपलेला नाही. अजूनही
मला अहंकारी, एककल्ली आणि उद्धट नवऱ्याला तोंड द्यावे लागते. या वयातही मला त्यांच्या संशयी स्वभावाला सामोरं जावं लागतं; परंतु आता ठरवलंय, स्वत:साठी जगायचं. ज्या गोष्टी आयुष्यात करण्याच्या राहिल्या असतील. त्या सर्व करायच्या, मोकळेपणानं श्वास घ्यायचाय आणि म्हणून मला या लग्नातून सुटका हवी आहे.''
""विमलताई; पण आतापर्यंत तुम्ही या गोष्टींवर आवाज का उठवला नव्हता? तुम्हाला नक्की काय हवं आहे, हे त्यांना का सांगितलं नाहीत?''
""काय सांगणार? ऐकून घेणारं कोणी असेल, तर काही सांगण्यात अर्थ आहे. माझं मत मांडण्याचा नुसता प्रयत्न केला तरी थेट घटस्फोटाची धमकी मिळायची.'' दोन वेळच खायला- प्यायला मिळतंय ना तुला? तेवढीच तुमची लायकी आहे. घर सांभाळा... तेवढं जमलं तरी पुष्कळ आहे. बाहेर पाऊल टाकण्याची भाषा करू नका,'' असे अनेकदा ऐकायला मिळालं. निमुटपणे मी सहन करीत राहिले. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नाही, तीन मुलं पदरात, आई-वडिलांना त्रास देऊन त्यांच्याकडे जाऊन राहण्यात अर्थ नव्हता. "लोक काय म्हणतील?' घटस्फोटाचा शिक्का कपाळी बसला, तर समाजात अप्रतिष्ठा होईल.'' या भीतीपोटी सर्व सहन करीत राहिले; पण आता नवऱ्याच्या धमक्यांना मी जुमानणार नाही. आता मीच त्यांना घटस्फोट देऊन निवांत वृद्धाश्रमात जाऊन राहीन. समवयस्कांसोबत राहता येईल. इतके दिवस सर्व सहन करीत राहिले; पण आता नवऱ्याच्या धमक्यांना मी जुमानणार नाही.''
""तुम्हाला खरं सांगू का, हा निर्णय मी घ्यावा असं मुलं मला गेली अनेक वर्षे सांगत आहेत. वडिलांच्या विचित्र स्वभावाची त्यांना कल्पना आहे. तू का सहन करतेस, असे मुलं मला नेहमी म्हणायची. वयात आल्यानंतर कमवायला लागल्यानंतर तर मुलांनी अनेक वेळा मी स्वतंत्र व्हावं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं सांगितलं होतं; पण तरीही लोकनिंदेचा विषय होऊ नये म्हणून माझ्या व्यथा मी कुणाला सांगत बसले नाही. लग्न टिकवण्याचा नव्हे, तर रेटण्याचा प्रयत्न केला; पण आता नाही. माझ्या मुलांना मी सांगितलं आहे. मुलगा परदेशात असतो, त्याने तर मला त्याच्याकडेच बोलावले आहे; पण मी कुठंही जाणार नाही. स्वतंत्रपणे एकटी जगणार, अगदीच हात-पाय चालले नाहीत, तर मग पुढचे पुढे बघता येईल.''
""एवढे वर्षे तुम्ही सहन करीत राहिलात मग आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेणं योग्य होईल, असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या नवऱ्याशी बोलून त्यांनी तर स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची तयारी दाखवली, तर तुमचा घटस्फोटाचा विचार तुम्ही मागे घ्याल का?''
""ताई... अहो सुंभ जळला ना तरी पीळ जळत नाही. तसा माझ्या नवऱ्याचा स्वभाव कधीही बदलणार नाही. त्याच्यात बदल होणं अशक्यच आहे आणि तुम्ही म्हणताय तसं एवढी वर्षे मी सहन केलं; पण आता सहन होत नाही. माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली आहे म्हणूनच मला आता स्वतंत्र व्हायचंय आणि आयुष्यात उरलेले दिवस शांतपणे घालवायचे आहेत.''
सततचे अपमान सोसून दुखावलेल्या विमलताई त्यांची व्यथा सांगत होत्या. पुरुषी अहंकाराचं वर्चस्व त्या आयुष्यभर सहन करीत आल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना लग्न बंधनातून या वयात मुक्त व्हायचं होतं. विमलताईंसारखी अनेक उदाहरणं समाजात आहेत. असफल लग्नातील घुसमट सोसणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात दिसून येतात. अशी कितीतरी लग्न आहेत, की ज्या लग्नामुळे सुरवातीचे काही दिवस चांगले गेले तरी नंतर एकमेकांच्या स्वभावामुळे अखंड मनस्तापाशिवाय दुसरं काहीही हाती लागलेलं नाही. एकमेकांना टोचत, बोचत, रक्तबंबाळ होतं... नातं टिकवतायंत. नव्हे तर संसार रेटातायंत.
चार भिंतींच्या आत एकत्र राहतात... मुलं-बाळं आहेत. समाजाला दिसायला सर्व काही चांगलं दिसत असलं तरीही दोघांच्याही नात्यात प्रेम... ओलावा... आपुलकी काहीच नाही. आतून ही नाती पोखरलेली असतात. अशा एकत्र राहण्याला काही अर्थच नसतो. एकत्र राहूनही एकमेकांपासून ही नाती खूप दुरावलेली असतात. या घुसमटलेल्या नात्यात मग वाद-प्रतिवाद, एकमेकांविरुद्ध डावपेच चालूच राहतात. घटस्फोटाचा कलंक नको म्हणून समाज काय म्हणेल, अप्रतिष्ठा होईल. या भयापोटी मोडलेली नाती टिकवून ठेवण्याची धडपड चालू राहते; परंतु यातून होणारी घुसमटच अतिशय त्रासदायक असते. स्वत:ला सुख नाही आणि दुसऱ्यालाही नाही. यातून नैराश्याला बळी पडणे, व्यसनाच्या आहारी जाणे, घराबाहेर... संस्काराच्या बाहेर आणि चौकटीच्या बाहेर जाऊन सुख शोधण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळेस तात्पुरते सुख मिळतेही; परंतु त्याचे परिणाम फारच वाईट असतात. त्या सापळ्यात अडकलेल्या व्यक्ती लवकर बाहेर येणं अवघडच असते आणि मग त्यातूनही मनस्ताप आणि पश्चात्ताप... नक्की सुख कशात आहे, हेच समजत नाही.
संसार करायचा आहे... नाती टिकवायची आहेत, तर मग रडतखडत का? आयुष्यात पुढे जाण्यासाठी जे पर्याय समोर ठेवले आहेत. त्यामध्ये त्यातल्या त्यात चांगलं काय, याचाच प्रत्येक जण विचार करीत असतो. मग लग्न टिकवायचं आहे. जोडीदाराचा स्वभाव पटत नाही. तरीही नाती तोडायची नाहीत, तर एकमेकांना समजावून घ्यायला शिकलं पाहिजे. एखादं रोपटं लावलं, तर ते वाढण्यासाठी त्याला वेळच्या वेळी खत-पाणी घालावं लागतं. त्याच्या सोबत वाढणारे तण काढून टाकावे लागतात. वारंवार माती मोकळी करावी लागते. त्याला योग्य ऊन-पाणी मिळेल, याचा विचार करावा लागतो, तरच ते रोप छान वाढू लागते. त्याला कीड लागायला लागली, तर जंतुनाशकांचा फवाराही करावा लागतो, तसंच एकदा संसाराचं रोपटं लावलं, की ते फुलवण्यासाठी त्यातील नात्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. द्वेष, अहंकार, अनावश्यक स्पर्धा अशी कीड त्वरित काढून टाकणे आवश्यक असते.
लग्न टिकवायचं आहे, परस्परांतील नाती जपायची आहेत, तर मग आपल्या जोडीदाराच्या स्वभावाचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. त्याला कोणत्या गोष्टींची आवड आहे, कोणत्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत, कुठल्या बाबतीत अतिरेक आहे, कोणत्या गोष्टी अजिबात जमत नाहीत, हे काही दिवसांत समजायला लागते आणि मग आपला स्वभाव आणि आपल्या आवडी-निवडी जोडीदारापेक्षा कशा भिन्न आहेत, हे लक्षात येतं आणि मग पावला-पावलांवर करावी लागते ती तडजोड. काही तडजोडी छोट्या आणि किरकोळ असतात, काही अतिशय अवघड, कस लावणाऱ्या असतात. या तडजोडी करीत असतानाच अनेक अनुभव येत राहतात आणि या अनुभवातूनच आपोआप शहाणपण येत राहत. आपल्या जोडीदाराची कोणती समीकरण कशी सोडवायची, याची तंत्र हळूहळू गवसत जातात. दोघांच्याही स्वभावातील भिन्नता लक्षात आल्यानंतर चिडून, रागावून, चरफडत जगण्यापेक्षा या भिन्नतेचा स्वीकार करून परस्परांच्या सहवासातून, अनुभवातून सोयी-सवयीने जुळवून जमवून घेत. परस्परांना आनंद कसा देता येईल. याचा विचार करायला हवा. जे आहे ते मान्य करून आपला मार्ग आपणच ठरवायला हवा.
पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातील खाचाखोचा समजल्यानंतर प्रसंगानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. उच्चशिक्षित, हुशार पत्नी हवी असते. मग तिच्या करियरच्या आड येऊन चालणार नाही. तिलाही पुढे जाण्यासाठी मदत करायला हवी. संधी द्यायला हवी. तिला स्वत:चे करियर प्रिय असले तरी कुटुंब सांभाळताना कोणत्या वेळी कशाला प्राधान्य द्यायचे, आपल्या आवडीला कुठं मुरड घालायची, हे तिनंही ठरवावं लागतं. कोणत्या विषयात कुणी कुणाचं ऐकायचं आणि कोणत्या बाबतीत कुणी कुणाला प्राधान्य द्यायचं हे समजुतीने ठरवायला लागतं. बदलत्या जीवनशैलीत नातेसंबंध सांभाळताना बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. कुणी कुणावर रूबाब गाजवून चालणार नाही. आपल्याला मान्य असो वा नसो; परंतु दोघांनीही एकमेकांना समानतेनं वागवणे अपेक्षित आहे. किंबहुना त्यावाचून गत्यंतर नाही, असेच म्हणावे लागेल. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी फक्त पुरुषाची राहिली नाही आणि घरातील कौटुंबिक जबाबदारी फक्त बायकांची राहिलेली नाही. एकमेकांना पूरक असे काम करून दोघांनाही सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्यामुळेच आता पूर्वीपेक्षा पती-पत्नीतील वादविवादाचे विषयही बदलत चालले आहेत. दोघांनाही एकत्र राहात असतानाच स्वत:चे स्वतंत्र अस्तित्वही जपायचे आहे आणि याला जोडीदाराकडून विरोध झाला की वाद होतोच. व्यक्तिगत स्वातंत्र्याबाबत जागरूक होताना कोणी कोणाचं ऐकायचं, हा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळेसच स्वत:मधील शक्ती ओळखता आली पाहिजे आणि जोडीदाराच्या चांगल्या गुणांचं कौतुक करण्याची दिलदारी दाखवता आली पाहिजे. स्वत:चे चुकले, तर कबूल करण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवता आला पाहिजे.
लग्न बंधन टिकवण्यासाठी परस्परांवरचा विश्वास, प्रेम आणि एकनिष्ठता असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. समंजसपणे स्वीकार करून स्वत:लाही आनंद मिळवण्यासाठी जोडीदाराला आनंद देण्याची तयारी ठेवली, तर वैचारिक मतभिन्नता असूनही लग्न टिकतात; परंतु सुखाच्या क्षणांची शक्यता अगदीच शून्य असेल, दोघांच्या नात्यात सतत शिवीगाळ, चिखलफेक होत असेल, तर दोघांच्या व्यक्तिगत आयुष्यातील आनंदच संपून जातो. एकमेकांना ओरबाडत बोचकारत ओढून ताणून टिकवलेलं लग्न अधिक त्रासदायक असत म्हणून नात टिकवायचं की संपवायचं हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला लागतो. नातं टिकवायचं असेल, तर त्यात अधिकाधिक आनंद निर्माण होईल, असे बदल करणे अनिवार्य आहे. अन्यथा, शांतपणे अशा नात्यांना पूर्णविराम देणं योग्य ठरतं.
लक्षात घ्या
1) लग्नाच्या नात्यात एकमेकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विचार जागरूकपणे करणे गरजेचे आहे आणि त्याचा मनापासून स्वीकार करणे आवश्यक आहे.
2) नाती टिकवण्यासाठी जुने हट्ट आणि सवयी सोडून देण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि नवीन कौशल्य आणि आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवायला हवी.
3) पती-पत्नीच्या वादविवादाचे खरे कारण शोधून काढले, तरच त्यावरील उपाय निश्चितपणे सापडतो.
4) समाजाला दाखवण्यासाठी नातं टिकवण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी नातं टिकवण्याला प्राधान्य द्या.
5) जी नाती मोडकळीस आलेली आहेत आणि टिकणं शक्य नाहीत, अशी नाती जबरदस्तीने जपू नका. समंजसपणे अलग होण्याची मानसिक तयारी ठेवा. मनातल्या मनात कुढत बसू नका.

स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
No comments:
Post a Comment