*=*=*=अंतरंगातून सुचलेल्या
काही चारोळ्या =*=*=*
कैलास मांडगे
नजरेत सारं ओळखीचं
तरी गोंधळून का पहायचं
मिश्कील सारं गालातल्या गालात
जेथे जावे तेथे बंधनात ---------
अबीर गुलाल इथे उधळला
दरवळ अंतरी पारिजात फुलवले
ऐहिक नात्याने पेरीत जीवनधारा
आकाशाचे नक्षत्र अंगणी झळकले ----
नभातलं विजयी चांदणं
तुझ्या डोळ्यात पाहिले
तुझ्या नुसत्या दिसण्यानं
उकलते अनामिक गूढ प्रीतीचे ------
नकळत जुळतात धागे
विजय शलाका डोळ्यात
हसताना गालाच्या खळीत भासले
जाणवले ओलेत्या सौंदर्यात ~~~~
मायेचा झगा मुग्ध वेलबुटीने
बघ मधुघट प्रेमाने भरले
प्रेम तुजवर अफाट उधळून
वेडावून सुटले हृदयाचे कोडे ------------
महसूस किया था मैने
कि उसे भी दिल्लगी है
झरने का संगम महसूस किया ........
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment