*=*=*=अंतरंगातील काही चारोळ्या
=*=*=* कैलास मांडगे
आठवणीतले थेंब बरसताना
कल्लोळ माजवतात अंतरात
बघ खुलते का पुन्हा निशा
सुगंधी धुंद मंतरलेल्या आठवणीत ----
तूच कृष्णप्रिया सखी
कल्पतरूची बालिका रंगबावरी
गोडी मधाळ सौंदर्याची
प्रेमात स्वर्ग फुलवणारी ------
गरज तुझ्या अस्तित्वाची
वसंतात जसे मोहरून येते
शब्दांची एक्सप्रेस अगदी
तुझेच खरे ..भन्नाट सुटते ------
हृद्यबंध उकलताना
रास खेळती सभोवती
फुलवेली अस्तित्व दरवळताना
गातात तुझ्याच गुजगोष्टी -----
आभास स्पंदनांचा जाणवेना
पुन्हा पुन्हा समजावून घेतांना
एकांतातही स्वतः शी भांडताना
सूर्यास्त अन सूर्योदयाचा हिशेब मांडताना ----
रुणझुणनाऱ्या एकांत क्षणी
अहंकाराने छेडतेस तू सतार
अनेच्छेने नकळत गळून पडती
सुखांत इच्छयाशक्तीचा मोहोर
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment