*=*=*=अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या =*=*=*
कैलास
मांडगे
कागदाची नाव चालवायची
सळसळत्या धारेत सोडायची
विश्वास ठेवत वल्हवायची
भवऱ्यात न अडकता वाचवायची -----
सुखावला सावळा गौरकांतीवर
येतांना अनुभवतो आठव चंदेरी
जसे भेटणे केवड्याच्या बनात
धुंद होतो कुंतलाच्या सुगंधात -----
क्षणभंगुर आयुष्यात निस्वार्थ असावं
खोटी रुसलेली ... नाजूक लाजलेली गं
सतत जिव्हाळ्याचं खळखळून हसावं
दूर गेल्यावर रंगवलेली स्वप्न आठवायची गं ------
पहातोय वावटळ गोल चक्री
निळाई झाली गंभीर
लागता झळा रखरखत्या आगी
झाकोळून धुरळा काळवटले क्षितीज ----
नवनवे थेंब घेतले अंगावर
झाले भिजणे किती मोहक
मूके मुके थेंब ओघळले खळीत
अवकाळी दणका भर मयसभेत .......
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment