*=*=*=अंतरंगातून सुचलेल्या
काही चारोळ्या =*=*=*
कैलास मांडगे
अस्तित्वासाठी खोळंबलेली पंचेंद्रिय
हृद्यरसाचे पेरीत प्रीतीगान
याच घरातला तुझा वावर
तू नसताना आठव अनुभवेन ...............
ऋतु नसतांना कसा बरसला
तुझ्या लहरीनं मन झाले बेजार
अमृत पाजणारा विषदूत भासला
नाही उरली नवलाई तुझ्या सरसरण्यात
किती मुश्किलीने सावरलेलं
चिखल पुसून ओलाव्यानं सुखावलेलं
कॅनवास पूर्वीचा स्वच्छश्वेत
सुखाच्या मोहक रंगात रंगलेलं -----
स्वातंत्र्याने उडण्यासाठी
अनंत आभाळ पसरले आहे
नको पाहू थबकून मागे
सोबत निर्मल हास्य आहे ..............
पापणीआड डोह नि:शब्दतेचे
वर्मी बसलेले घाव साखळलेले
ओठातले शब्द हि थिजलेले
हसू चांदण्यांचे नको असे विखुरलेले ----
आजी ,आई ,बहिण ,स्नेही
पत्नी ,प्रेयसी ,तेजस्विनी ...
अशा विविध रूपातून धीर देणारी
नाती व गणगोत जपणारी
पुरुषाच्या मागे शक्ती म्हणून उभी
रहाणारी स्री ......
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment