Sunday, October 12, 2014

अनामिक प्रेमपत्र


टपाल दिना निमित्त ...  अनामिक प्रेयसी ला लिहिलेले काल्पनिक

:::  प्रेमपत्र  :::

                                                                      कैलास मांडगे .....

प्रिय सखी  प्रांजल .....

                        एवढं दचकायला काय झालय हो तुलाच लिहिलेय .......

मान्य आहे खूप मोठा काळ गेलाय आज आपण दोघे आपल्या आयुष्यात सुखी आहोत . पण नाही ग तूच तर सारखं म्हणायची नं,” नाही रे एवढं सोप्प नसतं विसरणे..... बरोबर होतं तुझं अगदी मनापासून बोलायचीस तू .... आताशी खूप जाणवतय ग ..

            कधी एकटा असलो आणि हिच्या शी वाद झालेत न तर सारखी तुझी उणीव जाणवत रहाते बघ .


 मग आठवतात सारे क्षण तुझे खळखळून हसणे ... बोलणे ... सुरुवातीला तर किती शिष्टपणा करायचीस ... अर्थात त्याला कारण ही तसे होते तुझे रूप माझ्या पेक्षा किती तरी छान .  माझ्याशी नेहमी अंतर ठेऊन रहायचिस मला सारखे ते टोचायचे . पण काय असेल तेव्हा माझा हेतू प्रेम वगैरे असे काही नव्हता . पण तू मला खूप आवडायचीस् एवढे मात्र खरे . पण एकाच कॉलनी त असल्या मुळे काही न काही निमित्ताने तुझी भेट व्हायचीच आमच्या समोरची शैला  सारखे मला बोलायची पण काय असेल तिच्याशी मला बोलायला आवडतच नसे. पण संगीता येवला , रमा नाडकर्णी ,उज्वला पेंडसे ,ठाकरेंची ज्योस्त्ना ,दीड शहाणी उषा पाटील हां तुमचा ग्रुप एकदम जोरात ..... कॉलेज ला तुझा वर्ग वेगळा आणि माझा वेगळा तरी प्रत्येक तास सम्पल्यावर मी १ मिनिट का होईना तुझ्या वर्गावरून चक्कर मारायचोच. पण ग्याद्रिंग ला माझे कविसंमेलन आणि नाटका  चे वेळी  जेव्हा माझ्या मैत्रिणी माझ्या बद्दल बोलायच्या तेव्हा तुला राग यायचा त्यांचा मग तू कॉलेज बसमध्ये मला जेव्हा पुस्तक चांगले आहे वाच असे सांगून पुस्तक दिले .. आणि घरी उघड येथे नको . तेव्हा घरी गेलेनंतर पुस्तक रुपाने मला माझी प्राची मला गवसली होती हे सांगायला नको हे तुला ही माहीत आणि मला ही माहीत .


             ३ वर्ष कसे भर्रकन निघून गेले ते कळले देखील नाहीत आणि त्या आठवणीची शिदोरी आज ही मी जपून ठेवलीय ... असु दे .,  गेलेत ते क्षण राहिल्या त्या आठवणी ... तुझ्या बाबांची बदली झाली जाताना दोघे ही रडलो भावना खूप अनावर झालेल्या पण काळ कुणासाठी थांबत नाही ... पण वाटले नव्हते आयुष्यात पुन्हा अशी अचानक भेट होईल झुकर बाबाने पुन्हा भेट घडवली  ...

            २२ ऑगस्ट २०१० चा दिवस मला सोन्या सारखा ठरला आणि माझी हरवलेली प्राची मला गवसली .... विशेष म्हणजे तुझे आडनाव बदललेले असल्याने मी ओळखू नाही शकलो पण माझ्या कविता वरून आणि माझ्या लेखनातील शुद्धलेखना वरून तुला अंदाज आला आणि सौ प्रांजल काटे ....सावळ्या ची आणि  प्राची ची भेट झाली .

               हे सगळं काही अनपेक्षित होतं विश्वास बसत नव्हता .... २ दिवस डोळ्याला डोळा नव्हता ... त्यात काय झाले माहीत नाही तू रात्री मला बोलली .... तुझी ती मी नाही ........ मला अजून खूप धक्का बसला ... क्षणार्धात लाव्हारस अंगावर पडावा अशा वेदना झाल्या ..... पण जेव्हा तू व्यक्त झालीस गम्मत केली .... तुम्हाला चेष्टा ही कळत नाही का ? तेव्हा कुठे मी नॉर्मल झालो ...

तसे तर पूर्वी जसे आपण  रेखीव नक्षीदार कागदा वर एकमेकाला  चिट्ठी लिहायचो त्या चिट्ठी चा सुगन्ध ही घ्यायचो ... माझ्या चिट्ठी ला सुगंधी  वास येत नसायचा म्हणून तू मला खिजवायचीस.. मग मी सेंट शिम्पायचो..पण कागद खराब व्हायचा ... पण नंतर तूच मला सुगंधी चालणारा पेन भेट म्हणून दिला  मग मला एक एक सारं कळत गेलंय.... आठवतं ~~~~ सारं सारं आठवतं... खूप आठवणी आहेत बघ ... एकटा असलो न ... काही वेळा उदास ही होतो आणि काही वेळा मीच माझ्याशी हसतो ......... होय ......खरच ......... पण बघ जसा जसा काळ सरकतोय तसं तसं ते धुसर होण्या ऐवजी गडद होत जातंय  .........

            पण प्राची  तुझा जन्मदिवस  आणि यावेळी मी सर्वात आधी तुला शुभेच्छ्या देणं हां तर तुझा हक्क .. पण पुन्हा तू गैरसमज करशील म्हणून तुझा हट्टी आणि स्वाभिमानी स्वभाव मला माहीत असल्याने मी तुझ्या कडून उत्तरा ची वाट पाहिली आणि खात्री केली की प्राची मला सांगते की नाही . पण खरोखर अभिमान आणि गर्व वाटला तुझा .

पण जन्मदिवसाच्या शुभेछ्या देण्या साठी तुझे फोटो पाहिले त्यात तुझे त्यावेळचे फोटो पाहून खूप भडभडून आले पण बाकीचे तुझे आयुष्यातील क्षण तसेच  तुझे मिस्टर श्री काटे  साहेब ... तुझा संसार , तुझी मुले घरदार  आणि इतर तुझ्या आयुष्यातील सुखद क्षणांचे छायाचित्र / फोटो पाहिल्या नंतर खूप समाधान वाटले . बस तू एवढी आनंदी आहेस अजून काय हवे आयुष्यात . खूप भरून पावले परमेश्वराचे खूप आभार मानले की प्राची ला सुखी केलेस या पुढे ही कर . तिला असेच हसत मुख ठेव .


            प्राची  तुला विशेष आणि आश्चर्य वाटत असेल की हां काय लिहितोय काय बडबडतोय एवढं कसा बेईमान झालाय आपले प्रेम ... घेतलेल्या आणा भाका . एकांतात घालवलेले सारे क्षण , सारे समर्पण याचे काहीच मोल नाही का ? हे इतके सहज कसे विसरू शकतो ?

            होय अगदी बरोबर प्राची  .... पण तुझे मिस्टर काटे  साहेब .... भारतीय मिलिटरीत  आहेत .... हे माझ्यासाठी महत्वाचे आहे आपले प्रेम नाही . एका शूरवीराची तू पत्नी आहेस की जो माझ्या मायभूमी साठी इतक्या लांब सीमेवर  योगदान देणेसाठी बांधील आहे . आणि मी माझ्या प्रेमासाठी त्याच्या सुखी संसारात माती कालवून ह्या मायभूमी शी द्रोह कधी ही करणार नाही . आणि हो समझा जरी काटे  साहेब देशाची सेवा करीत नसते ते एक सिविल सेवेत असते तरी मी तसे केले नसते कारण प्रत्येकाचे सुख हे सुख असते .... योगायोगाने तुझे घर माझ्या गावापासून जरी जवळ असले तरी ही मी तुला कधी ही भेटणार नाही. आणि माझे गुरु मला कधी ही तशी परवानगी देणार नाहीत .   हो एवढे मात्र नक्की की प्राची  माझी सखी आहे पण ती सौ काटे  सुद्धा आहे . ति माझ्या साठी जीव की प्राण आहे . तिच्या वर माझे मनापासून सकारात्मक प्रेम आहे पण त्यात वासना नाही . प्राची  वर माझे निर्मळ शुद्ध आणि सात्विक प्रेम आहे आणि राहील .... अगदी अनादी अनंत कालपर्यंत ..........

                                    

 
     राधे __/|\__कृष्ण

 

                                                                        तुझाच ..........कैलास .......  

 
टपाल दिना निमित्त हार्दिक शुभेछ्या ........

No comments: