रेडिओ -- मंदाकिनी रासकर
रेडीओ
सौ. मंदाकिनी रासकर
पुर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणून सर्वसामान्य लोकांचा
फक्त रेडीओ वरच जास्त भर असायचा .
रेडीओ सर्वांनाच खुप प्रिय असायचा . टी . व्ही .
फक्त एखाद दुसऱ्या चांगल्या सधन कुटुंबांमध्येच असायचा . ज्यांच्या घरात टी . व्ही
. ते लोकं खुप श्रीमंतामध्येच गणले जायचे . मला चांगले आठवते मी लहान होते तेंव्हा
टी . व्ही . वर सिनेमा पहायचा असेल तर ज्यांच्या कडे टी . व्ही . असेल त्यांच्या
कडे आम्ही मैत्रिणी 25 पैसे एकीचे देऊन अर्धा सिनेमा पहायचो आणि पुन्हा जर घरच्यांनी
सोडले तरच पुढचा अर्धा सिनेमाही 25 पैसे देऊन पहायचा . तेंव्हा मोजकेच चित्रपट आणि एखादीच मालिका
असायची आठवड्यातून . चित्रहार आणि छायागीत खुप आवडायचे . पण तेही एखाद्याच्या
घरांत बळच डोकवून पहावे लागायचे . पण रेडीओ मात्र आपला हक्काचा सोबती असायचा आवडता
. सकाळपासून ते रात्री झोपे पर्यंत थेट . विविध भारती वरील सर्वच कार्यक्रम खुप
छान असायचे . गाणी ऐकता
ऐकता आणि गुणगुणत कामं करायला खुप उत्साह वाटायचा .
आठवड्यातून एक दोन वेळा अभिनेत्यांच्या मुलाखती , किंवा सिबाका गीतमाला , बालोद्यान
किंवा एखादे सुंदर रोज लागणारे नाटुकले खुप छान वाटायचे ऐकायला . आम्ही अगदी न
चुकता कान टवकारून नाटकं ऐकायचो . खुपच छान दिवस होते ते !! अजुनही आठवतात
मला . नंतर माझे जेंव्हा लग्न ठरले तेंव्हा मला कळले कि अहमदनगरला विविध भारती
लागत नाही . मला खुप वाईट वाटले होते तेंव्हा हे ऐकुन . मी विचार करायचे आता मला
कसे करमणार सासरी ? लग्न होईपर्यंत मी मनसोक्त रेडीओ ऐकून घेतला होता . खरंच
मुलींना लग्न म्हटलं कि खूप गोष्टींची तडजोड करावी लागते . वातावरणाशी मिळते जुळते
घ्यावे लागते लग्नानंतर . त्यात मला हे एक रेडीओचे माझ्या आवडीचे बलिदानच दयावे
लागले होते . कालांतराने मी
सासरी रुळले देखील लवकर . हळूहळू विसरही पडला रेडीओचा
. पण नंतर बरीच मनोरंजनाची साधने आली . रेडीओवर देखील अनेक वाहिन्या आल्या छान छान
. आता विशेष जास्त काहीच वाटत नाही कशाचेच . कारण आता ईतकी साधनं आहेत मनोरंजनाची
आणि भरपूर वाहिन्या आहेत . माणसाला एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात मिळू लागली कि तिची
किंमत राहत नाही . तसेच आता रेडीओ आणि टी . व्ही . चेही झाले आहे .
पण तरीही अजुनही मला काम करता करता रेडीओ वरील गाणी ऐकायला
खुप आवडते . पण सध्या रेडीओ वरती अर्धा तास जाहिराती आणि त्यात चुकून एखादं गाणं
लागतं !! खुप कंटाळा येतो आता रेडीओ ऐकायचा . कोणे एके काळी माझा खुप आवडता असणारा
, माझा लाडका
रेडीओ आता नावडता होतो कि काय ? असेच वाटू लागले आहे मला . पण असे घडू नये असे
मला मनोमन
वाटते . कारण शेवटी कितीही झाले तरीही रेडीओ माझ्या मनांत कायम घर करून राहिलेला
आहे .
. . . .
मंदाकिनी रासकर .
राधे __/|\__कृष्ण
!! श्री स्वामी समर्थ !!
No comments:
Post a Comment