Sunday, October 26, 2014

मुक्तपक्षी - १

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....


 मैत्री  तुझी माझी 
   न बोलता खूप काही सांगणारी 
      मनसोक्त गंधाळणारी
        अंतरी प्राजक्त फुलवणारी                                    












           निवांत आता चांदणे पांघरु 
       संकोच नको आता बहरताना 
    नको पापण्या खाली झुकवू 
मिठीत खुदकन हसतांना~~~~ 
 गालावरून ओघळलेल्या सरींनी 
   अजूनही ओंजळ भरलीय 

     शहारेल निळाईत अंग जेव्हा 
  
        ओंजळ रिती करेन तेव्हा ~~~~












मैत्री पूर्ण तुझ्याशिवाय नाही 

  दुरावा हा सहन होत नाही 
    का जाणे अंतरास ठाऊक 

        मन मोकळं व्हायला क्षण नाहीत ~~











         मी तर तुझ्यातच 

      दूर नाही आसपासच 

    न सरणाऱ्या मोहक क्षणी 
  नजर पोहोचणार नाही असा

सामावलोय  क्षितिजाच्या अलीकडे ~~


 

No comments: