Thursday, October 23, 2014

सत्य आणि आभास यात गल्लत करू नका -- दीपिका पदुकोण

-*-*-*-*-*  सत्य आणि आभास यात गल्लत करू नका ---
                                                                      दीपिका पदुकोण ....... 

                                               अनुवाद्क -- सौ. संगीता शेंबेकर ......
 
मध्यंतरी  अभिनेत्री दीपिका पदुकोण .... यांचे वर मेडिया ने विचित्र पद्धतीने केलेल्या शुटींग बाबत जेव्हा दीपिका पदुकोण यांनी त्यांचे मत प्रदर्शित केले . त्या बाबत .....

फेसबुक वरील .... अर्धांगी या स्री विषयक आणि अतिशय जागरूक अशा ग्रुप वरील सद्स्या वं प्रसिद्ध उत्तम गायिका ..सौ संगीता जी शेंबेकर ... यांनी याचे मराठी तून केलेला अनुवाद अगदी जसाच्या तसा ...


शरीरप्रदर्शन, शरीरप्रदर्शन..म्हणजे काय नेमकं....माणसाला शरीर आहे आणि वातावरणापासून संरक्षणासाठी वस्त्रं आहेत....त्याच 
वस्त्रांना नंतर लज्जारक्षणासाठी म्हणून म्हटलं गेलं....ही लज्जा म्हणजे नेमकं काय...
स्त्री पुरुष दोघांना जवळपास सारखीच शरीररचना दिलेली आहे फक्त जननेंद्रिय सोडल्यास....दोन हात दोन पाय डोकं, केस तोंड 
इत्यादी.....स्त्रियांना स्तन असतात...ही नैसर्गिक रचना आहे....हे झाकणं आणि उघडं टाकणं यासंबंधी एवढी गुंतागुंत का...एवढा संकोच का...एवढी चर्चा का....
आरामदायी कपडे घालण्याकरिता पुरुष बनिअनवर फिरतो..चड्डीवर फिरतो...एक जननेंद्रिय झाकून बाकीचं सगळं अंग तो उघडं टाकू शकतो..टाकतो...
मग स्त्रिच्या बाबतीतच ह्या सगळ्याचा बाऊ का....
स्तन आहेत स्त्रीला तर आहेत.......ते दिसले थोडे किंवा अधिक....त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे...तो अवयव लाज वाटण्यासारखा आहे का.....जे आहे ते नैसर्गिक आहे...पुरुषांना स्तन नसतात पण निपल्स असतातच ना.....आणि ते दिसतातच ना......
आता आता पर्यंत स्त्रिया आपल्या बाळाला सार्वजनिक ठिकाणी देखील उघड्यावर आपलं दूध पाजत बसायच्या...घरात, एकत्र कुटुंबात देखील ....आणि कुणालाही त्याचं फारसं काही वाटत नसे....(विकृत माणसं सोडून..) आता तर त्या पण दिसत 

 नाहीत...आणि त्यामुळे त्या अवयवाबद्दलचं फाजील कुतुहल अधिकच वाढतंय...जितकी वस्तु झाकलेली तितकं त्याचं कुतुहल 
 अधिक असतं...  जितका याबाबतीतला मोकळेपणा वाढेल, बघण्याची सवय होईल तितकं त्याबद्दलचं अवास्तव कुतुहल कमी होईल....   
पुरुषांची उघडी शरीरं बायकांना नेहमीच बघण्याची सवय असते आणि म्हणूनच कदाचित बायकांना पुरुषदेहाचं अवास्तव कुतुहल नसतं, जितकं पुरुषांना स्त्रीदेहाबद्दल असतं....
 
पुर्वी लहान मुलं पण चांगली पाच आठ वर्षांची होईपर्यंत उघडी नागडी फिरत असत...अगदी मुली देखील ...परंतु आता अगदी जन्मलेल्या बाळालाही असं नागडं सहसा ठेवलं जात नाही.....
 
त्यामुळे पुर्वी लहानपणीच माणसांना मुलामुलींमधला भेद समजायचा...सहजपणे, नैसर्गिकपणे...आता तो लवकर समजत नाही..
 
माझा एक मित्र मला यासंबंधी म्हणत होता की त्याच्या मुलाला दहा बारा वर्षांचा होईपर्यंत मुलामुलीत नेमका काय फरक असतो ते माहीत नव्हतं आणि ते त्याने त्याला म्हणजे आपल्या बाबाला एकदा विचारलं होतं...
 
मग आज मुलांना कळतं ते फक्त पोर्नोग्राफी मधून, चित्रांमधून आणि नेटवरच्या अनधिकृत साईट्सवरून...आणि त्याबद्दलचं 
कुतुहल वाढत राहतं...
आपण नैसर्गिक वागणं, राहणंच सोडून देतोय....शरीरं झाकण्याचा अतिरेक करतोय....त्याबद्दल अतीआग्रही राहतोय असं वाटत 
 नाही का...
 
पुर्वी बायका पण गावाकडे उघड्यावर आंघोळी करायच्या...नदीवर, मागच्या अंगणात...पदर गुंडाळून...आणि कुणाला फारसं काही 
वाटत नसायचं....
 
माणसं सहज नैसर्गिक वागत होती...फाजील कुतुहल नसायचं...परंतु आता उलट विकृती वाढताना दिसते....
 
यावर विचार होणं गरजेचं आहे मला माहीत आहे ...माझी
 
ही मतं धाडसी आणि न पचणारी आहेत....परंतु विचार करायला काय हरकत आहे यावर..........

आज सकाळी दीपिका पडुकोण हिनं आपल्या चाहत्यांना उद्देशून फेसबुकवर लिहिलेल्या पत्राचा भावानुवाद.
"
एखाद्या स्त्रीला समागम करायचा असेल तर त्याची एकच खूण खरी. ती म्हणते-हो’.
आता मी अशी ओळ लिहून सुरुवात का केली? बलात्कार, भीती आणि वेदना यांचा लवलेश नसलेला एक सुखी समाज बनवण्यासाठी, काही प्रकारच्या लोकांच्या विचारात बदल घडवायचा आपण सारेच सतत झटत असतो.
माझ्या व्यवसायात मी कुणी नवखी नव्हे. हा व्यवसाय मला खूप श्रमायला लावतो. एखाद्या भूमिकेत पायापासून डोक्यापर्यंत अंग झाकून वावरायचं असतं. तर एखाद्या भूमिकेत पूर्ण नागवं असावं लागतं. त्यातली कोणती भूमिका मी करायची ही निवड अभिनेत्री म्हणून माझीअसते. कृपया लक्षात घ्या, ते पात्र असतं. ती खरी मी नसते. जी भूमिका मी निवडली असेल ती अधिकाधिक परिणामकारकरित्या रंगवणे हे नटी म्हणून माझं रोजचं काम आहे.
कृपया चुकीचे अर्थ काढू नका. माझी कळकळ समजून घ्या. स्त्री- पुरुषांच्या अवयवांबद्दल मी बोलत नाहीये. एकीकडे आपण स्त्री समानता आणि सबलीकरणासाठी लढत असतांना वाचकांचं लक्ष खेचण्याच्या नावाखाली एक प्रतिगामी प्रवृत्ती काम करते, त्याचा त्रास होतो. अशा वृत्तीविरुद्ध मी वेळोवेळी आवाज उठवला आहे.
पुरुषप्रधान समाजात एखादी स्त्री पुढे येऊ पहात असेल तर त्याचं खरं तर स्वागत करायला पाहिजे. पण आपण सत्य आणि आभास यात गल्लत करतो. समानतेच्या वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांवर बोळा फिरवतो. एक वर्षापूर्वी झालेल्या अपघाताबद्दल कुठेतरी आलेल्या एका लेखाचा आधार घेऊन आपण त्याची हेडलाईन करतो, ‘‘अरे देवा, ही तर दीपिकाची उघडी छाती!’’ अशी हेडलाईन करुन आपण वाचकांना खेचण्यासाठी त्यांच्या मनात मागास-प्रतिगामी विचार कोंबायला सुरुवात करतो.
एखाद्या नटीचं अंतर्वस्त्र एखाद्या वेळी सुटू शकतं. कुठल्याही बाईचं ते होऊ शकतं. ती काही तसं करायच्या उद्देशाने ते करीत नसते. अशा वेळी त्याकडे डोळेझाक करण्याऐवजी आपण ते चित्र मोठं करुन त्यावर वर्तुळ आखून बाणाने ते दाखवीत त्याची हेडलाईन करतो, हे काय आहे? आम्ही नट्या म्हणजे माणूस नव्हेत का? एखाद्या पुरुष नटानं एखाद्या कार्यक्रमात शर्ट काढून आपले एटपॅक अ‍ॅब्ज दाखवले तर आपण त्याचं कौतुक करतो, मत्सर करतो, पुन्हापुन्हा पहातो. पण तो फोटो दाखवतांना त्या नटाच्या ‘Crotch' वर गोल करुन त्याच्या सस्त्या हेडलाईन्स नाही करीत!
माझ्या शरिराचा उत्सव करण्यात मला वावगं वाटत नाही. एखाद्या भूमिकेची गरज असेल तर पडद्यावर वाट्टेल ते करायला मी कधी लाजले नाही. पुढच्या एका सिनेमात मी बार डान्सरचा रोल करते आहे. या पेशातल्या बाईला तर तिचं शरीरच लोकांच्या भुका चाळवायला वापरावं लागतं. माझ्या ब्राच्या कपची साईज आणि मांड्यांचा परीघ यावर त्या भूमिकेच्या अनुषंगाने कितीही चर्चा करा. त्याला माझी ना नाही. पण भूमिकेच्या पलिकडे दीपिका पडुकोण नावाची मी स्वतंत्र स्त्री आहे याचा आदर तुम्ही राखलाच पाहिजे.
प्रश्न फक्त कुणाचे स्तन, शिश्‍न किंवा अन्य अवयवांबद्दल बातम्या देण्याचा नाही. संदर्भाचा आहे. आपला माल खपवण्यासाठी संदर्भ सोडून अशा बातम्या देणं चूकच आहे. सार्‍या समाजाचा स्त्रीविषयक दृष्टीकोण बदलण्याची नितांत गरज असण्याच्या काळात तर नक्कीच.


माझ्यासाठी हा विषय संपला आहे. प्रत्येकाला त्याचं मत असू शकतं. मी या प्रकरणी पुढे काही करणार नाही. त्यातून काही चांगलं निष्पन्न होण्याऐवजी कदाचित भलत्याच नकोशा हेडलाईन्सविकल्या जातील."
आपण सगळेच एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान आणि आदर बाळगू या. चांगलं जगू या. हसू या. प्रेम दाखवू या.
मूळ लिंकhttps://www.facebook.com/DeepikaPadukone/posts/722345794506193?fref=nf

LikeLike · 

No comments: