हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू
दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला
तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....
तीची उबदार धडधड
पावसातली ओलसर आठव
थेंब न थेंबातली दरवळ
फेसाळणारा दोघातला अवखळ स्पर्श
कैलास ....
रेशमी साडीत रुपगर्विता झुलत फुलत साजणी येता
संध्या प्रकाशी खुलून जाता
मोरपिसी स्पर्शाने मोहून गेला ~~~
कैलास .......
कधी तुला मला न उलगडणारे
सारे उगाच पडताळून पहाणारे
समाधानी आहोत निळाईसवे
ज्यामुळे चारोळी प्रसवते अलवारपणे ~~~~~~
कैलास ...........
तुझ्या समझवन्यात माझं सावरणं
सुसाट वार्यासारखं
उदासीला दूर सारायचं
ऐन भरात मधूबहर शिंपायचं ~~~~~
कैलास ........
चातक चोचीने प्यावी
मधुर वर्षा ऋतूची सर्
दवात भिजलेल्या पानात
निवतात धावणारे क्षण ~~~~~~
कैलास ........
चिरतरुण आहे जे अनुपम
सरितेला सागरा ची ओढ
प्रवाही होऊन हो निर्भय
त्रूण पात्यांची नको सय
कैलास -------
No comments:
Post a Comment