मुक्तपक्षी - २
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात
आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे ....
मैत्री केली आहे रे निर्व्याज
निसर्गा पेक्षा ही सुंदर
शेवटपर्यंत निभावण्यासाठी
मरण जवळ आले तरी सुद्धा ~~~
कैलास ~~~~
वळणे सगळी ओसाड नसतात
सजुनी अशी तु फुलून ये
बहरून घे अंतरी घाल तु साद
येतील चाफा ,अबोलीची
वळणेच वळणे ~~~
कैलास ~~~
जन्मदिन लग्नसोहळे नित्य साजरे
चवीनं पुरवतील जिभेचे डोहळे
मनाचे सुख हीच आपली शांती
सदैव जप मजसाठी तु
आरोग्याची किल्ली ~~~~
कैलास ~~~
ना बोल .. ना शब्द काही
ही चाहूल असे अंतरीची
असावेत स्वप्न आभाळात सावरणारी
उघड्या पापण्यातून फुलणारी ~~~
कैलास ~~~
थोपवू नकोस वादळाला
स्वप्नात नाही तो सामावणारा
तुझ्या प्रत्येक दु:खाला
लपेटून नेईन तो सोबतीला ~~~
कैलास ~~~
No comments:
Post a Comment