अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास मांडगे
कुजबुज अशी पाखरांची
अजूनही भासे अल्हड जीवनाची
जशी सौंदर्य कळी मोहरली
अलवार कळी फुलात प्रकटली ~~~
नाही अपेक्षा .. नको व्यवहार
नको आभास नसावे मृगजळ
प्रीतगंध हळूच झुलवूया
अनाम रेणू ... अनु शहारुया ..........
बहारों कि तरह हवा के झोंके
करके दिल्लगी चल दिये
बहोत सालोमे कोई बसा दिलमें
उन्हें कैसे भुलाया जायें ~~~~
चारोळी रंगते जाणीवेने
रोज घालते उखाणे
हृदयाचं गुपित सांडणारे
सखे मोजू नको गं स्पन्दने ~~~
सुखाचा बेदुंध अदृश्य वारा
डोळे मिटून अनुभव गं
मधूनच झुळूक .. स्पर्श उबदार
मीच आसपास जावून बघ गं .......
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment