अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास
मांडगे
धुंद कळी फुंद सावळा
मोहरला बघ केसात मोगरा
तनबावरी मिठीत बांधला
ऋतुगंध फुलता झाला बावरा *****
गंध ताजाच राहील सदैव
म्हणून फुले ताजी रहात नाही
प्रवाहाविरुद्ध काही होऊ नये सदैव
म्हणून सगळं मनाविरुद्ध घडत नाही ~~~~~
आधीचे जग खूप सुंदर होते
तरी मी तुझ्यासाठी स्वत:ला बदलले
सगळं जागेवरच असून प्रेमवीरास
मजा नाही जगण्यात असे का वाटते ?
डवरला घाम तुझ्या भाळावर
जागल्या चेतना मधुगंधात
स्वैर शहारे अंगप्रत्यंगावर
गंध भूलवितो श्वासा श्वासात -**-**-**-*--*
निरखता फुल गुलबकावलीचे
भास आहेत अनंत सारे
पंखात तुझ्या बळ यावे
तरच साद घालीन लाजणारे ~~~~
जयघोष नसे प्रीतीचा तरी
नाद अखंड तव नामाचा
उर्मी प्रबळ दाटते मधुगंधी
धिटाई तुझी मज हवीहवीशी ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे_/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment