अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............
कैलास मांडगे.
आल्या पावली असे का परतणे
शब्द मांडताना का येई गहिवर
तुझं अचानक अबोल होणं
घालमेल होते निर्णय घेणं ~~
भावनांचा धागा अलवार क्षणांचा
वारा चाहूल देतो तुझी येताना
परसदारी प्राजक्ताचा गंध दरवळला
कळेल कधी तुला , भाव मनातला ~~~
भांबावलेल्या मनाला कसं सावरू ?
अंतरात सारखी चुळबुळ
क्षणात कसं उधळून देवू ?
प्रीतीचे अणुरेणु हळूच फुलवू ~~~
रंगात भिनलाय सखा केशरगुलाबी
शब्दांच्या गुलालात जीव हा खुळा
अजूनही आस गुल्मोह्रास फुलण्याची
निसर्ग कवेत येता झाला खुळा ~~~
चांदणे का मधाळ
सप्तर्षीचा समूह सोडून
रंगबावर्या गारव्यात बेभान
पाहून नखरा जशी तळपणारी तलवार ~~~
राधे __/|\__कृष्ण श्री स्वामी समर्थ -----कैलास मांडगे
कैलास मांडगे.
आल्या पावली असे का परतणे
शब्द मांडताना का येई गहिवर
तुझं अचानक अबोल होणं
घालमेल होते निर्णय घेणं ~~
भावनांचा धागा अलवार क्षणांचा
वारा चाहूल देतो तुझी येताना
परसदारी प्राजक्ताचा गंध दरवळला
कळेल कधी तुला , भाव मनातला ~~~
भांबावलेल्या मनाला कसं सावरू ?
अंतरात सारखी चुळबुळ
क्षणात कसं उधळून देवू ?
प्रीतीचे अणुरेणु हळूच फुलवू ~~~
रंगात भिनलाय सखा केशरगुलाबी
शब्दांच्या गुलालात जीव हा खुळा
अजूनही आस गुल्मोह्रास फुलण्याची
निसर्ग कवेत येता झाला खुळा ~~~
चांदणे का मधाळ
सप्तर्षीचा समूह सोडून
रंगबावर्या गारव्यात बेभान
पाहून नखरा जशी तळपणारी तलवार ~~~
राधे __/|\__कृष्ण श्री स्वामी समर्थ -----कैलास मांडगे
No comments:
Post a Comment