अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास मांडगे
बेधुंद अनामिक भावनांना
मुक्त होऊन तनमन सारे मोहरू दे
आता कसं समजावून सांगू तुला
गालावरच्या खळीने खरं प्रेम ओथंबू दे ~~~
चेतनमय रक्ताळलेल्या मनावर
घाव सतत पेलत आली
संध्या समयी परतत गृही
निळाईत गुंतून जाई ............
जमेल का तुला ? का उगी उगी अट्टाहास
वचनाच्या बंधनात रहायला
वेदनेच्या जखमेवर वारा घालण्यास
अंतर्मनात न झाकता दिसतात पीळ नात्याला ~~~
धडा भूगोलाचा वाचतांना
अंतरीचा विझला चांदोबा
जरा मोजता खगोल तारा
गजरा सुगंधाविन कोमजून गेला ......
स्वच्छ नितळ पाउल टाक
तरारणाऱ्या हिरव्या रोपट्यासारखे
फुलू दे निर्व्याज मनीचा श्रावण
मनाची कवाडं नकोत काहुर्लेले ~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment