*=*=*=अंतरंगातील काही
चारोळ्या =*=*=*
कैलास मांडगे
अवेळीचा पाऊस असाच
तुझ्याकडे पडत असणार
थेंबा थेंबासकट ओलाचिंब पदर
शहारून आनंद देत असणार ~~~~
नाद पाखरांचा मस्तीचा
गुलाबी अवखळ प्रीतीचा
अंतरी माझिया अवखळ किनारा
प्रीतीत कसला दुरावा ~~~~
न्हाह्तांना दर्पणात न्याहाळते
मलमली तारुण्य चांदणे जसे
रंग सख्याचे आठवून सारे
अमृताचे घन शहारून गेले ~~~~
प्रभातीचे दव टीपूनी
हवे हवे क्षण नको का म्हणायचे ?
रंगात सार्या भिजुनी
रंग माझा वेगळा का भासवायचे ?
भावभावना मुक्त कर पुन्हा
वादळातली नौका गाठेल किनारा
विखुरल्या क्षणांची भेट होईन पुन्हा
उध्वस्त अंतर्मन नांदेल सुखात ~~~~
अवेळीचा पाऊस असाच
तुझ्याकडे पडत असणार
थेंबा थेंबासकट ओलाचिंब पदर
शहारून आनंद देत असणार ~~~~
नाद पाखरांचा मस्तीचा
गुलाबी अवखळ प्रीतीचा
अंतरी माझिया अवखळ किनारा
प्रीतीत कसला दुरावा ~~~~
न्हाह्तांना दर्पणात न्याहाळते
मलमली तारुण्य चांदणे जसे
रंग सख्याचे आठवून सारे
अमृताचे घन शहारून गेले ~~~~
प्रभातीचे दव टीपूनी
हवे हवे क्षण नको का म्हणायचे ?
रंगात सार्या भिजुनी
रंग माझा वेगळा का भासवायचे ?
भावभावना मुक्त कर पुन्हा
वादळातली नौका गाठेल किनारा
विखुरल्या क्षणांची भेट होईन पुन्हा
उध्वस्त अंतर्मन नांदेल सुखात ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !! राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment