‘ संवाद आणि शांती हीच स्वास्थ्याची जननी ‘
कैलास
मांडगे ........
संघर्ष
निर्माण करणारे आपणच आणि संवाद करणारेही आपणच. संघर्ष केला तर मन त्रासेल. संवाद
केला तर मन सुखावेल. त्रासाचा ताप वाढवायचा, की
सुखाची शीतलता आणायची, हे आपण ठरवायचे. संवाद करावा. संघर्ष कशाला?
संघर्ष, भांडण,
द्वंद्व, विरोध, मतभेद हे सर्व
एक-एक छटा वेगळी असणारे, पण असुख दर्शविणारे शब्द आहेत. संघर्ष
बाहेरच फक्त घडतो असे नाही, मनातही संघर्ष असू शकतो. भांडण
दुसऱ्याशी होते, तसे मनातल्या मनात घडू शकते. बाहेर दोघांत घडले,
तर त्याला द्वंद्वयुद्ध म्हणता तरी येते; आतल्या
आत होते त्या ओढाताणीचे काय करणार? ते देखील द्वंद्वच. विरोध, मतभेद
हे दृश्यण असू शकतात, आंतरिकही असू शकतात. द्वंद्व म्हणजे ओढाताण,
परस्परविरोधी, लठ्ठालठ्ठी. म्हणजे अस्वास्थ्य.
कम्युनिकेशन म्हणजे संवाद. संप्रेषण. एकमेकांशी
बोलणे. विचारांची देवाणघेवाण. एकमेकांना समजून घेणे.
जिथे संवाद आहे, तिथे
शांती आहे. शांती आहे तिथे स्वास्थ्य आहे.
शिरीष च्या लग्नाला साधारण ४ ते ५ वर्षाचा कालावधी जाऊनही त्याच्यात
नैराश्य आणि अस्वस्थता जाणवत होती . तो जेव्हा ही मला भेटतो सारखे सारखे हेच
सांगतो की तुरुंगातील कैदी तरी सुखात असतील पण त्यांचे पेक्षा माझे आयुष्य वैराण
झालेय .. फारच त्रास भोगतोय ......
वैवाहिक आयुष्य नकोसं झालंय... मुलगी हळू हळू मोठी होईल ... दुसरे अपत्य जन्माला
घालावे अशी तर इच्छया चं मेलीय....तन्वी (शिरीष ची बायको ) सारखी भांडत असते ....
विचित्रपणा करीत असते . काय करू तेच कळत नाही .
तन्वी च्या संशयी वृत्ती मुले आई ,बहिण आणि सर्व नातेवाईक लांब गेलेते
... कुठलीही गोष्ट पोझीटीवं घ्यायला तयार नाही हर प्रकारे समझवंण्याचा प्रयत्न
करून ही काही उपयोग होत नाहीये ..... शिरीष ला मी थोडे विश्वासात घेऊन विचारले की
असे मोघम नको सांगू नाण्याला दोन बाजू असतात ... एका हाथाने टाळी वाजत नाही ....
फक्त संशय घेते .... भांडते आरोप करते .. रोज रोज वादावादी होऊन शिवीगाळ चालते
..... म्हणजे तुम्ही दोघे सुशिक्षित असून ही असे होते ... पण नेमके काय होते ....
कारणे काय नेमकी ? तेव्हा शिरीष ने जेव्हा काही उदाहरणे सांगितलीत तर आश्चर्य कारक
घटना होत्या .....
शिरीष आणि तन्वी चे अरेंज्ड म्यारेज लग्न.... दोघा बाजू कडून अगदी
व्यवस्तीत आनंदात पार पडले .. शिरीष ने तिला मधुचंद्रा साठी उटी ला ही फिरवून आणले
... हनिमून ला सुद्धा शिरीष ला तन्वी चे स्वभावा चे काही टोचणारे अनुभव आलेत पण
शिरीष ने ते गंमत म्हणून नजरेआड केलेत.
नेहमीप्रमाणे घरी असताना आई बाबांशी .. बहिणीशी रोज वागताना ही तिचा संशयी स्वभाव पराकोटी चा
अवघड जाणवला . परिवारा तील कुणी काही चेष्टा केली की त्याला ती खाजगी गोष्टी चे
लेबल लाऊन खूप भांडण करायची . आई किंवा बहिणीने कधी डोक्याला तेल लाऊन दिले तर
त्यांचे वर ही संशय आणि त्या वरून ही भांडण आणि खूप आरडाओरड . शेवटी मला वेगळे
रहायचे म्हणून हटट केलाय ... वास्तविक मी
एकुलता एक मुलगा पण तरीही आई बाबांनी संसार सुखाने व्हावा म्हणून आम्हाला
वेगळा संसार थाटून दिलाय . पण तरी ही तन्वी मध्ये काहीही फरक पडला नाही . नवीन
फ्ल्यांट मध्ये आल्यानंतर तिचे नवीनच सुरु झाले तुमचे आणि खाली रहाणाऱ्या माधुरी
चे काहीतरी संबंध आहेत . तुम्ही एकमेकाकडे सारखे पहात असतात . असे अनेक स्रीयां
तसेच ऑफिस मधील स्री सहकार्या वरून, कधी मित्रपरिवाराने काही छोटेखानी कार्यक्रम
किंवा कुठे ट्रीप काढली तेथे तर तेथे सुद्धा तन्वी चे ती तुझ्याशीच का बोलली ...
तू सारखे लेडीज कडेचं पहातो , तुम्ही खूप वेळा भेटलेले पण मला ओळखू येऊ नये म्हणून
नाटक करताय ...असे अनेक प्रकारा वरून तन्वी ने सारखे वाद उकरून काढायचे आणि भांडत
रहायचे ...
मुलीचा वाढदिवस होता मी
सर्वाना बोलवले बहिण आली तिला मला पाहून गहिवरून आले तिने माझी गळाभेट घेतली
त्यावरून ही तिने माझ्या वडिलांना आणि बहिणीच्या नवर्याला बोलली की भाऊ असला
म्हणून काय झाले तुमच्यात अशा मिठ्या मारायची संस्कृती आहे का ? अशी अनेक उदाहरणे
शिरीष ने मला शेअर केलीत .........आणि या तन्वी च्या विक्षिप्त स्वभावामुळे शिरीष
चे सोशल लाईफ तर उध्वस्त झालेच पण आई वडील आणि नातेवाईक यांचेकडे जाणे ची सुद्धा
चोरी झाली .
साधारण १५ ते २०
दिवसानंतर शिरीषचा मला निरोप मिळाला की तन्वी खुपच आजारी आहे आणि तिला दवाखान्यात आडमीट केले . मी त्वरित हॉस्पिटल ला पोहोचलो ..... शिरीष ने
सांगितले की हल्ली तन्वी खुपच आक्रमक झाली होती ... रात्री व्यवस्तीत झोपत ही
नव्हती ....सारखे बडबड आणि विचित्र चं वागत होती .... आज ती सकाळी अचानक चक्कर
येऊन पडली .. मी त्वरित तिला हॉस्पिटल ला घेऊन आलोय . डॉक्टरांनी तिला सक्त
आरामाची गरज असल्याचे सांगितले . पण मला याबाबत सारखे खटकत होते .... शिरीष ने
ज्या घटना सांगितल्या होत्या ... त्या विचार करण्या सारख्या होत्या .... एकतर तन्वी
च्या पुर्वायुष्यात काहीतरी नक्कीच होते की त्यामुळे तन्वी च्या मनावर आणि शरीरां
वर याचा परिणाम होतोय .... कारण छिन्नमनस्कता- स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. सर्वसाधारण जनतेमध्ये याचे
प्रमाण एक टक्का आहे. दर शंभरांत एक माणूस चक्क "मेंटल' असतो. परिस्तितीत काही वेळा समझुन घेण्याचे मानसिक आधार कोलमडून पडत आहेत.
त्यामुळे मने कोसळत आहेत. मानसिक आरोग्यापुढील सर्वांत गंभीर प्रश्न आहे तो या
बदलत्या मूल्यांचा. रोगासाठी उपचाराच्या अनेक सोयी उभ्या करता येतील; पण वेगळ्याच तत्त्वांना उरी बाळगून झपाट्याने बदलणारी समाजरचना, वेगाने बदलणारी सामाजिक मानसिकता हे सारं भयानक होत चालले .
शिरीष
ला मी बोलवून घेतले आणि तन्वी ला घेऊन मानसोपचारतज्ज्ञ यांचे कडे घेऊन जायला
सांगितले . कारण तेच काय योग्य ते कारण शोधू शकतील असे वाटले . शिरीष
मानसोपचारतज्ज्ञ यांचे कडे जाऊन आला एक महिन्यानंतर तन्वी मध्ये अमुलाग्र फरक
दिसून आला . मानसोपचारतज्ज्ञ तज्ञां नी तन्वी ला संमोहन पद्धतीने तिचा भूतकाळ
जाणून घेतल्यानंतर तिच्यावर उपचार केलेत ..
मानसोपचारतज्ज्ञ
यांचेकडे या वेळी मी सुद्धा प्रत्यक्ष तन्वी च्या प्रकृती बद्दल चौकशी करीत होतो आणि
अनुभवत होतो की योग्य दिशा योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर आयुष्य उध्वस्त होऊ
शकते .
जेव्हा
तन्वी च्या दु:खा चे चीडचीड पणाचे कारण समझले तर सर्वस्वी त्याला सामाजिक
परिस्तिती चं जबाबदार असल्याचे दिसून आले . तन्वी सातवीत शाळेत असताना त्यांच्याच
वाड्यात रहाणाऱ्या यमुना काकू तन्वी ला खूप जीव लावत त्यामुळे तन्वी सारखे यमू
काकू कडे असायची ..... यमुना काकू चा नवरा .. रांजणे काका हे ही तन्वी वर खूप माया
करीत . पण काही वेळा रांजणे काका यमू काकू घरी नसताना मुद्दाम मांडीवर बसवायचे ...
गमंत गोष्टी सांगत आणि गोष्टी सांगता सांगता नको नको तेथे स्पर्श करीत नंतर तन्वी
ला हे सारं विचित्र वाटायला लागले आणि घरी आई ,अन्ना ना सांगितले तर खूप वाद होतील
म्हणून तन्वी ने यमू काकू कडे जाणेच बंद केले . नंतर कॉलेज ला होस्टेल ला असताना
रोहित भेटला जो तिला बहिणी सारखे प्रेम करायचा आणि तू माझी बहिण चं आहे असे करून
खूप मदत करायचा . पण त्याने ही एके दिवशी मला माझ्या मित्रा साठी गिफ्ट घ्यायचे
म्हणून तन्वी तू चल घेऊन दे ... तुझी चोइस छान आहे . म्हणून घेऊन गेलाय पण गिफ्ट
राहिले बाजूला तर त्याने ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला .
एकंदरीत
पूर्वायुष्या चे कटू सावट तन्वीच्या मनावर
खोल असल्या मुळे तन्वी प्रत्येक माणसात ..व्यक्तीत हे सारे असेच असतील म्हणून ती
माझा शिरीष आपल्या पासून कुणी हिरावून नेऊ
नये ह्या भावनेतून तिचा असा चुकीचा वागण्याचा अट्टाहास शिरीष च्या जीवावर उठला
होता . पण तसे जर पाहिले तर यामागे एक पुरुषी प्रवृत्ती चं जबाबदार म्हणता येईल .
पहा
अशीच अस्वथता , वाद विवाद , गैरसमज चालू ठेऊन आयुष्य गढूळ ठेऊन जगायचे की...
शेवटी
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार
.
विचार
..प्रयत्न आणि कृती स्वतः ची ............ आणि आशीर्वाद परमेश्वरा चा ............ राधे
__/|\__कृष्ण
श्री
स्वामी समर्थ
कैलास
मांडगे ......
No comments:
Post a Comment