आपली साथ ,आपले प्रेम हेच माझ्या जगण्याचे बळ आहे ....
कैलास मांडगे --------
कुटुंब टिकण्यासाठी :
"मेड फॉर इच अदर' या
केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू
शकतात.
काळ हा सर्वात
मोठे औषध आहे काळ ही जीवनातली सर्वांत मौलिक गोष्ट असते. जन्मल्याक्षणी प्रत्येकाचा काळ- जगण्याचा कालावधी
ठरलेला असतो आणि तो दिवसदिवसानं कमी कमी होत असतो. तो वाढवणं माणसाच्या हातात नसतं. तो उधार उसना घेता येत नाही. तो खात्यावर जमा
करून ठेवता येत नाही. जेव्हाच्या तेव्हा त्याचा सदुपयोग करणं हेच माणसाचं उद्दिष्ट असायला हवं. हे ज्यांना कळतं, जमतं ते लोक
आयुष्यात काहीतरी कमवू शकतात. गाठीला बांधू
शकतात. इतरांचं मात्र श्वासावरी
आयुष्य सतत जातं
माणसाचं आयुष्य...जन्म
आणि मृत्यू या दोन अटळ घटनांमधला कालावधी. या दोन
बिंदूंमध्ये माणूस फक्त मनःशांती आणि आनंद या दोन गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत राहतो. या दोन शब्दांची व्याख्या आणि ते मिळवण्याचे प्रत्येकाचे
मार्ग वेगवेगळे असतील. पण अंतिम ध्येय तेच असतं. चुकलेली व्याख्या, चुकीचा दृष्टिकोन आणि पर्यायानं चुकलेले मार्गच या दोन
गोष्टी मिळवण्याच्या आड येत असतात. कालचक्र
पुढं जात राहतं. क्षणांची
मिनिटं होतात. मिनिटांचे
तास. तासांचे दिवस. दिवसांचे महिने आणि
महिन्यांची वर्षं. युगानयुगं असं चालूच आहे. आपण काही काळासाठी किंवा कालचक्राचआयुष्य
कसे जगलो हे खूप महत्वाचे आहे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगायचा असेल, तर
आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य छान असणं आवश्यक आहे. खरं तर शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्ही संकल्पना
एकमेकांशी निगडितच आहेत.
आपण सर्वच नातेसंबंधा बद्दल सतत
आपल्या मनाप्रमाणे समोरच्या चा विचार न करता स्वत:चेच बरोबर या दृष्टीकोनातून समृद्धीची, श्रीमंतीची स्वप्ने पहात असतो. पण
तसे नसते ...दैनंदिन आयुष्य , छंद इत्यादीमध्ये रस असणं. . आपलं स्वतःशी आणि सर्वांशी चांगलं नातं असणं. . आयुष्य अर्थपूर्ण व उद्दिष्टपूर्ण जगण्याचा प्रयत्न असणं. पुरेपूर
आत्मविश्वास, आत्मसन्मान... भावनात्मक समतोल असणं म्हणजेच पर्यायानं मनःशांती आणि
स्थिरता..
भविष्याविषयी आणि जीवनाविषयी सकारात्मक भावना. कुठल्याही
विपरीत परिस्थितीतून पुन्हा सावरण्याची, उभं राहण्याची क्षमता. प्रत्येक
क्षणी उत्साही राहून प्रत्येक क्षण रसरसून उपभोगण्याची क्षमता. या साऱ्यांचा
विचार करायला हवा .तर आणि तरच आपल्याला आपल्या त्या संबंधातील कर्तव्याची वेळोवेळी
आठवण करून देत असतात. त्या आपल्या समाईक ध्येयप्राप्तीसाठी आपण सर्वच सतत यथाशक्ती
प्रयत्न करीत राहू व इतरांच्या अशा प्रयत्नांना हातभार लावू.
स्नेहीनो माझी आई निवर्तली ....
आईच्या शेवटच्या
क्षणापर्यंत तिच्या बाबतीत
जे हि काही मी केले ते अतिशय प्रामाणिक पणे माझे
कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला .
या मागील सहा महिन्याच्या काळात मी खूप
धावपळीत आणि डिस्टर्ब होतो .
आपणा सर्वामुळे आपल्या सदभावना , प्रेम माझ्या पाठीशी
होते ..... त्यामुळे च मी सकारात्मक राहून आईची शुश्रूषां करू शकलो .
आपण माझ्या दु:खात
सहभागी झालात .. मला
वेळोवेळी मार्गदर्शन केले.
खूप समाधान वाटले .... आपली
साथ ,आपले
प्रेम आणि आपण जपलेली स्नेहाची बांधिलकी हेच माझ्या जगण्याचे बळ आहे ....
धन्यवाद .........
राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे ............
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!