अपेक्षाभंगा च्या दारात मात्र खरच वेडे ठरतात
नजर तुझी हलकेच सगळं सांगून जाते
महत्व नसलेल्या भावनात व्यवहार फसतात
हे मांडताना शब्द गोठून जातात सारे ~~~
मीच दिलेल्या धीराच्या वैचारिक क्षणांना
आयुष्याच्या मध्यान्ही भाव नि:शब्द होतात
माझीच विराण मैफिल प्यारी मजला
तूच मला वचनात बांधून गेलास ~~~~
नाही नजर लागणार तुला
मैत्रीच काजळ भरवतो तुला
हृद्य कसं होईल चिंध्या चिंध्या
मैत्रीत प्रीती राहील सदा ~~~~~
तसा फकीर मी वेदाच
इतिहास बदलणारा देवदास
नेकी कर दर्या मे डालनारच
आयुष्य बेफान होऊन जगणारच ~~~
नको करू उगीच पैंजणाचा दंगा
रंगवून निळ्या पिवळ्या हिरव्याने
बेभान होऊन कळू दे हाच खरा पिंगा ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment