अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास
मांडगे
ध्यास मी श्वास तू साऱ्यात तू
धुंद भावना अलवार भासतात कसे
हृदयात ढग दाटून येतात जसे
भाव मिलनाचे वाटतात जसे ~~~~
पक्षी किलबिलाट विसरले
गुंतली , गुरफटली गलबते
त्या वळणावर परत नव्याने जन्मू
अशीच धुंदी भोगण्या पुन्हा क्षण गाठू ~~~
लाजलाजते अशी सोनुकली
सतत बेचैन तू फुलराणी
संपला काल अशुभ जावूनी
पुंडलिकाच्या भेटी परब्रम्ह येती ~~~~
हृदयाची स्पंदनं ऐकू येतात
कारण मनाला बंधन असतात
दोघात भाव तेथे फुलतात
दरवळतात जेथे चांदणे ~~~
तसा निळाईचा जुनाच गोडवा
रेंगाळतोय सदैव तनामनात
आयुष्यातील बेधुंद गार वारा
दरवळणाऱ्या ओल्या मातीचा सुवास ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment