शंकाच आहे का ? कोण जाणे ?
भेटतो हरऐक अपूर्ण माणूस
एक एक दिवस आयुष्यातले
घालवतोय असेच आपण ~~~~~
शिशिर पुन्हा दरवळला
उभारीने पुन्हा जगावसं वाटणारा
खुलवूया रंगबहार ऋतू सोहळा
बघ कसा लख्ख प्रकाश पडला ~~~
रात्रीच्या मध्यान्ह प्रहरी
नि:शब्द असतो आसमंत
शृंगाराने गंधाळलेली रातराणी
शहारून उकळते ओठांची कळी ~~~~~
विझवताना भडकलेला वणवा
रोमारोमातून नजरेत भिनला
होईल शांत काही क्षणात
श्वेतचंद्र उजाडेल एवढ्यात ~~~
ओळखीच्या तर सार्या वाटा
साद येता स्पन्दने जाणवतात
ओठ न हालता तुझ्या भावना
डोळ्यातून हृदयाशी सलगी साधतात ~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे _/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment