अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----
कैलास
मांडगे
लाल झाले पिवळे झाले
हिरवे झाले निळे
कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले ...
असेच उधळूया आयुष्याचे सप्तरंग --~~~~
या जगण्यावर जीव जडतो
जिथे वाटतो तप्त उन्हाचा स्पर्श लोभस
थोडी थट्टा थोडी मश्करी
नात्यात मखमलीची हिरवळ ~~~~
गोड गुदगुल्या
होत असतात हृदयापाशी
रेशीमबंधाचा रंग हा अनोखा
भरून घेतो दोन्ही डोळ्यांनी ~~~~
गंधकोषी नटतेस सजणी
हृदयाचं गुपित ठेवतेस जपुनी
स्प्न्दनाचे काहूर सदैव अंतरी
शहारणारा दरवळ भिनू दे एकांती ~~~~
भाव माझे आतुरलेले
तिची निरागसता पाहून
डोळ्यातून आपसूक उमलले
निळ्याशार गाभाऱ्यात उमटले
आपुलकीचे रंग ~~~~
!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!
राधे __/|\__कृष्ण
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment