Tuesday, September 13, 2016

आपली साथ ,आपले प्रेम हेच माझ्या जगण्याचे बळ आहे ....

                                          आपली साथ ,आपले प्रेम हेच माझ्या जगण्याचे बळ आहे ....
                                                                                            कैलास मांडगे --------

कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
काळ हा सर्वात मोठे औषध आहे काळ ही जीवनातली सर्वांत मौलिक गोष्ट असते. जन्मल्याक्षणी प्रत्येकाचा काळ- जगण्याचा  कालावधी ठरलेला असतो आणि तो दिवसदिवसानं कमी कमी होत असतो. तो वाढवणं माणसाच्या हातात नसतं. तो उधार उसना घेता येत नाही. तो खात्यावर जमा करून ठेवता येत नाही. जेव्हाच्या तेव्हा त्याचा सदुपयोग करणं हेच माणसाचं उद्दिष्ट असायला हवं. हे ज्यांना कळतं, जमतं ते लोक आयुष्यात काहीतरी कमवू शकतात. गाठीला बांधू शकतात. इतरांचं मात्र श्‍वासावरी आयुष्य सतत जातं
माणसाचं आयुष्य...जन्म आणि मृत्यू या दोन अटळ घटनांमधला कालावधी. या दोन बिंदूंमध्ये माणूस फक्त मनःशांती आणि आनंद  या दोन गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत राहतो. या दोन शब्दांची व्याख्या आणि ते मिळवण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतील. पण अंतिम ध्येय तेच असतं. चुकलेली व्याख्या, चुकीचा दृष्टिकोन आणि पर्यायानं चुकलेले मार्गच या दोन गोष्टी मिळवण्याच्या आड येत असतात. कालचक्र पुढं जात राहतं. क्षणांची मिनिटं होतात. मिनिटांचे तास. तासांचे दिवस. दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्षं. युगानयुगं असं चालूच आहे. आपण काही काळासाठी किंवा कालचक्राचआयुष्य कसे जगलो हे खूप महत्वाचे आहे आयुष्यातील  प्रत्येक क्षण आनंदात जगायचा असेल, तर आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य छान असणं आवश्‍यक आहे. खरं तर शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य या दोन्ही संकल्पना एकमेकांशी निगडितच आहेत.

आपण सर्वच नातेसंबंधा बद्दल सतत आपल्या मनाप्रमाणे समोरच्या चा विचार न करता स्वत:चेच बरोबर या दृष्टीकोनातून  समृद्धीची, श्रीमंतीची स्वप्ने पहात असतो. पण तसे नसते ...दैनंदिन आयुष्य , छंद इत्यादीमध्ये रस असणं. . आपलं स्वतःशी आणि सर्वांशी चांगलं नातं असणं. . आयुष्य अर्थपूर्ण व उद्दिष्टपूर्ण जगण्याचा प्रयत्न असणं.  पुरेपूर आत्मविश्‍वास, आत्मसन्मान... भावनात्मक समतोल असणं म्हणजेच पर्यायानं मनःशांती आणि स्थिरता.. भविष्याविषयी आणि जीवनाविषयी सकारात्मक भावना. कुठल्याही विपरीत परिस्थितीतून पुन्हा सावरण्याची, उभं राहण्याची क्षमता.  प्रत्येक क्षणी उत्साही राहून प्रत्येक क्षण रसरसून उपभोगण्याची क्षमता. या  साऱ्यांचा विचार करायला हवा .तर आणि तरच आपल्याला आपल्या त्या संबंधातील कर्तव्याची वेळोवेळी आठवण करून देत असतात. त्या आपल्या समाईक ध्येयप्राप्तीसाठी आपण सर्वच सतत यथाशक्ती प्रयत्न करीत राहू व इतरांच्या अशा प्रयत्नांना हातभार लावू.

स्नेहीनो माझी आई निवर्तली ....
 आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या बाबतीत
 जे हि काही मी केले ते अतिशय प्रामाणिक पणे माझे कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला . 
या मागील सहा महिन्याच्या काळात मी खूप धावपळीत आणि डिस्टर्ब होतो . 










आपणा सर्वामुळे आपल्या सदभावना , प्रेम माझ्या पाठीशी होते ..... त्यामुळे च मी सकारात्मक राहून आईची शुश्रूषां करू शकलो .
आपण माझ्या दु:खात सहभागी झालात .. मला वेळोवेळी मार्गदर्शन  केले. 
खूप समाधान वाटले .... आपली साथ ,आपले प्रेम आणि आपण जपलेली स्नेहाची बांधिलकी हेच माझ्या जगण्याचे बळ आहे
....

धन्यवाद .........

राधे __/|\__कृष्ण 

कैलास मांडगे ............
!! श्री  स्वामी समर्थ शरणं मम !!

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 53


अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----

                                                        कैलास मांडगे 





ध्यास मी श्वास तू साऱ्यात तू 
    धुंद भावना अलवार भासतात कसे 
           हृदयात ढग दाटून येतात जसे 
                भाव मिलनाचे वाटतात जसे ~~~~



                                                                                                


पक्षी किलबिलाट विसरले 
       गुंतली , गुरफटली गलबते 
            त्या वळणावर परत नव्याने जन्मू 
               अशीच धुंदी भोगण्या पुन्हा क्षण गाठू ~~~







लाजलाजते अशी सोनुकली 
    सतत बेचैन तू फुलराणी 
        संपला काल अशुभ जावूनी 
              पुंडलिकाच्या भेटी परब्रम्ह येती ~~~~





हृदयाची स्पंदनं ऐकू येतात 
कारण मनाला बंधन असतात 
दोघात भाव तेथे फुलतात 
दरवळतात जेथे चांदणे ~~~


तसा निळाईचा जुनाच गोडवा 
रेंगाळतोय सदैव तनामनात 
आयुष्यातील बेधुंद गार वारा 
दरवळणाऱ्या ओल्या मातीचा सुवास ~~~~




!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!                    राधे __/|\__कृष्ण 
                                                           कैलास मांडगे 

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 52


अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----

                                                        कैलास मांडगे 




     

                     इबादतसी तस्वीर दिलमे  समाये बैठा हु  
              उन्हे दुनियासे बचाकर रखता हु 
           किनकिनसे जजबात ए अश्क छुपावू 
       पता है इश्क है वहां सोग है ~~~~


का कुणाच्या इशाऱ्यावर नाचावे 
    स्वतः चे अस्तित्व विसरताना 
        स्वतः दिवा होऊन जळावे 
              अनुभवतो मीच मला पारखे होताना ~~~






बेखबर मदहोश दिवाणा हु 
    आज दिलमे मैखाना है 
       नशा ए नजरों कि शौखीया 
            जब चलती है तो ए यकीन दिलाती है 
                  क्या जरुरत है 
                    शराब ए जाम पिने  कि ~~~~
 





जरी विश्वास उरला नाही 
    तरी नाविन्याने उभारू विश्व 
          पुन्हा धिटाईने चिंब चिंब होऊ 
            गुरुत्वाकर्षणाने आयुष्याची रंगत वाढवू ~~~~



है जुस्तजू कह खुद से खूब क्या 
     अब ठहरती है देखिये जाकर नजर है कहां 
           होती नही कुबूल दुवा ए इश्क कि 
                दिल चाहता ना हो तो 
                   जुबान मे असर कहां ~~~~








!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!                    राधे __/|\__कृष्ण 
                                                           कैलास मांडगे 




मुक्तपक्षी भाग क्रमांक - 51



अंतरंगातून सुचलेल्या काही चारोळ्या -----

                                                        कैलास मांडगे 


लाल झाले पिवळे झाले 
   हिरवे झाले निळे 
     कोरडे झाले ओले 
        एकदा रंग लागले 
           तर सर्व होतात रंगीले ...
               असेच उधळूया आयुष्याचे सप्तरंग --~~~~



या जगण्यावर जीव जडतो 
   जिथे वाटतो तप्त उन्हाचा स्पर्श लोभस 
          थोडी थट्टा थोडी मश्करी 
               नात्यात मखमलीची हिरवळ ~~~~



गोड गुदगुल्या 
  होत असतात हृदयापाशी 
       रेशीमबंधाचा रंग हा अनोखा 
          भरून घेतो दोन्ही डोळ्यांनी ~~~~ 




           
            गंधकोषी नटतेस सजणी 
                     हृदयाचं गुपित ठेवतेस जपुनी 
                              स्प्न्दनाचे काहूर सदैव अंतरी 
                                 शहारणारा दरवळ भिनू दे एकांती ~~~~



 भाव माझे आतुरलेले 
    तिची निरागसता पाहून 
        डोळ्यातून आपसूक उमलले 
            निळ्याशार गाभाऱ्यात उमटले 
                आपुलकीचे रंग ~~~~









!! श्री स्वामी समर्थ शरणं मम !!                    राधे __/|\__कृष्ण 
                                                           कैलास मांडगे 

हेची दान देगा देवा ..... तुझा विसर न व्हावा

                                                            हेची दान देगा देवा ..... तुझा विसर न व्हावा 

देवा,
जग काळं-पांढरं नसतं. सगळी चांगली माणसं सदासर्वदा चांगली नसतात आणि सगळी वाईट माणसं सरसकट वाईटच नसतात हे कळू दे मला. चांगल्या माणसातलं वाईटपण दिसलं म्हणून त्यांचा चांगुलपणा मी विसरून जाऊ नये आणि वाईट माणसांत दिसलं की चांगलं तर मी त्या चांगल्यावर विश्वामस ठेवून त्याही माणसावर ठेवून पाहीन भरवसा एवढी ताकद दे.! देवा, जे जे चांगलं ते ते मला दिसू दे.कळू दे.आत्मसात करता येऊ दे.!
देवा,
एक शेवटचं मागतो.
मला संत बनवू नकोस.फार अवघड असतं संत होणं.साधुपण निभावणं. मला साधा सामान्यमाणूसच राहू दे. मी माणसासारखाच माणुसकी जपत जगेन.चांगलं-वाईट करताना चुका करेन. पण देवा, एक नक्की कर. मी जर भरकटलोच कधी माणुसकीची वाट सोडून तर मला अशी अद्दल घडव की इतरांनाही कळेल की माणूसहोण्याची जबाबदारी निभावणं किती महत्त्वाचं असतं ते.! देवा, एवढं दे. जास्त नको.! इतपत दिलंस तरी माझी रोजची जगण्याची लढाई लढेन मी आनंदानं.!
देवारे तुझे काहीच मागत नाही फक्त माझ्यातीलच माझे मिळू दे.........

हेच दान देगा देवा ......... तुझा विसर न  व्हावा .............

!! श्री  स्वामी  समर्थ  शरणं मम !!                       राधे __/|\__कृष्ण