Friday, June 5, 2015

मुक्तपक्षी --११

मुक्तपक्षी --१1 
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
                         अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे


कुजबुज अशी पाखरांची 
   अजूनही भासे अल्हड यौवनाची 
       जशी सौंदर्य कळी मोहरली 
            अलवार कळी फुलात प्रकटली ~~~~





चेतनमय रक्ताळलेल्या मनावर 
    घाव सतत पेलत आली 
      संध्या समयी परतता गृही 
        निळाईत गुंतून जाई ~~~~~~ 





धुंद कळी फुंद सावळा 
      मोहरला बघ केसात मोगरा 
          तनबावरी  मिठीत  बांधता 
                ऋतुगंध फुलता झालं बावरा ~~~~~





गाढ मिठी एकरूप अशी 
    रात्र फुलली चंद्र प्रकाशी 
         धुंद मोगरा अन रातराणी 
               मोकळ्या आकाशी काही क्षण अनुभवली .. 





       निरखता फुलं गुलबकावलीचे 
                    भास आहेत अनंत सारे 
                          पंखात तुझ्या बळ यावे 
                              तरच साद घालीन लाजणारे ~~~~~




   जयघोष नसे प्रीतीचा तरी 
           नाद अखंड तव नामाचा 
                उर्मी प्रबळ दाटते मधूगंधी 
                       धिटाई तुझी मज हवीहवीशी ~~~~









                                                राधे __/|\__कृष्ण                        कैलास मांडगे ...........

देवा माझे ~~नि ~~शब्दाचे हे नाते असेच अतूट राहू दे……. सई (सौ. संतोषी केदार कदम )

-------देवा माझे ~~ नि ~~ शब्दांचे नाते अतूट राहू दे --------


"तुझ्यातूनी सुरूवात तुझ्यापाशी अंत माझ्यातूनी तुही

 तसा शोधसी एकांत माझ्या तळहाती तुझे शाश्वत
 गोंदण तुझ्या वाटेवर माझी आनंद पेरण..। काल सांज वेळी अशीच खिडकीबाहेर पाहता पाहता , सहजच विचार करता करता पाच वर्षांपूर्वी लिहीलेली एक कविता आठवली. मला खूप आवडते ती कविता. नेमकी त्यातली एक ओळ बराच वेळ आठवत नव्हती. आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केल्या आठवेनाच. मग वाटले जाऊ दे कुठे इतका ताण देऊ जाऊ दे आठवेल नंतर …. पण मन कुठे थाऱ्यावर खुप अस्वस्थ झाले आठवत का नाही .
शेवटी आठवली. खूप हलकं वाटलं. क्षणभरापूर्वी आपण किती अस्वस्थ झालो होतो हा विचार लगेचच मनात आला. कवितेतली ती ओळ आठवल्यावर आनंद नक्कीच झाला होता. पण तो आनंद नेहमीपेक्षा खूप वेगळा होता. खूप जवळचे मित्रमैत्रिणी भेटले की जसा आनंद होतो ना तसाच काहीसा. पण त्या मित्रमैत्रिणींपेक्षाही जवळचं.. मनाच्या गाभ्याशी असलेलं काहीतरी परत मिळाल्याचा आनंद होता तो. अव्यक्त! त्या क्षणी जे वाटलं ते खरंच व्यक्त करता आलं नाही मला. एरव्ही शब्दांच्या दुनियेत रमणारं हे मन शब्दांमुळे मिळणारा हा आनंद शब्दांतून व्यक्त करू शकलं नाही. शब्द... शब्दांशी माझी नाळ लहानपणीच जोडली गेलेली. स्वतः हातात घेऊन वाचलेलं पहिलं पुस्तक.. चंपक! चंपकने मला शब्दांशी मैत्री करायला शिकवलं. त्या नकळत्या वयातही गोष्टींमधल्या मूल्यांचा संस्कार माझ्या मनावर घडवला. पंचतंत्र, हितोपदेश, परीकथा, सुरस गोष्टी.. खूप आवडायला लागली पुस्तकं. पुढे ललितलेख, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, निसर्गवर्णनं, काव्यसंग्रह, मासिकं, नियतकालिकं, दिवाळी अंक
असं बरंच काही वाचायला लागले. पु. लं., वपुंच्या अनेक पुस्तकांची पारायणं केली. शांता शेळके, गदिमा, भट साहेब, पाडगावकर वाचून आतला जिप्सी जागा होत गेला. भट साहेबांनी शृंगाराचा अर्थ खऱ्या अर्थाने उलगडला. ह्या शब्दांनी लहान वयातच हात लिहिता केला. शब्दांची अर्थाशी.. अर्थाची विचारांशी आणि विचारांची जगण्याशी सांगड घालण्याला सुरुवात झाली तीही नकळतच.. कोऱ्या कागदावर कसलीतरी जादू झाल्यागत शब्द उमटवून घेणारा तो परमेश्वर! त्या शब्दांशी केवढे जोडले गेलोय आपण..! आयुष्यात पुढे जाऊन अगदी
कशाचीही उणीव भासली तरी ही पुंजी मात्र वाढतच राहणार.. शब्दांचं आणि माझं हे नातं असंच घट्ट होत राहणार.. लहानपणीचा 'चॉकलेटचा बंगला' आठवला. केवढी सुबत्ता होती त्या बंगल्यात! तशीच काहीशी सुबत्ता माझ्यापाशीही वाढत जाणार.. शब्दांची.. अर्थाची.. विचारांची! कधीच कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही अशी.. परमेश्वराने बहाल केलेल्या ह्या अव्यक्ताच्या लेण्यासाठी मनोमन आभार मानले त्याचे. शब्दांचा हा संग कधीच सोडायचा नाही असा निर्धार केला आणि पाहते तर........ सांज वात लावण्याची योग्य वेळ झाली होती ……………….
देवा माझे नि शब्दाचे हे नाते असेच अतूट राहू दे…….
सई (सौ. संतोषी केदार कदम )



Sunday, April 19, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - १०

                                     मुक्तपक्षी भाग क्रमांक -१० 

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे






अस्तित्वासाठी खोळंबलेली पंचेंद्रिय 
          हृदयरसाचे पेरीत प्रीतीगान
               याच घरातला तुझा वावर
                  तु नसतांना आठव अनुभवेन ~~~~~~~~~





          प्रत्येक क्षणी धुंद फुंद मी
              ध्यास मी श्वास तु
                  बंध जुळून बेहोश मी
                    न संपणारी साठवण तु .~~~~~~


किती मुश्किलीने सावरलेलं
      चिखल पुसून ओलाव्यात सुखावलेलं
           क्यानवास पूर्वीचा स्वच्छ श्वेत
              सुखाच्या मोहक रंगात रंगलेलं ~~~~~


पापणीआड डोह नी:शब्द्तेचे
 वर्मी बसलेले घाव साखळलेले 
    ओठातले शब्द ही थिजलेले 
       हसू चांदण्यांचे नको असे विखुरलेले~~






   स्वातंत्र्याने उडण्यासाठी 
     अनंत आभाळ पसरले आहे 
        नको पाहू थबकून मागे 
          सोबत निर्मळ हास्य आहे ~~~~~ 





                 राधे __/|\__कृष्ण                      कैलास मांडगे ~~~~~

Thursday, April 16, 2015

प्रीत योगायोगाची ----- लेखिका सौ तारा ठाकरे

~~~~ प्रीत योगायोगाची ~~~~

                                               सौ. तारा ठाकरे   - मुंबई                 
                                  प्रिन्सिपल .... प्रबोधन ठाकरे ...विद्यालय 


          एका सेमिनार च्या निमित्ताने ती दोघ एकमेकांना भेटले खूप जुजबी ओळख झाली ती पत्रकार आणि तो लेखक सेमिनार नंतर दोघे आपापल्या घरी निघून जातात पण निरोप घेताना 
...एकमेकांना पत्ता देऊन जातात, एकमेकांशी सातत्याने पत्रव्यवहार चालू असतो दोघही एकमेकाचे प्रेरणास्थान बनतात पण तिने सांगितलेले असते तू मला भेटायला मी सांगेपर्यंत येणार नाहीस तो हि अट मान्य करतो.
पण विधिलिखित वेगळे असते ..
त्यांची भेट कधीच होणार नसते ....
दुर्दैवाने बातम्या चे वृत्तांकनास जात असताना तिचा अपघात झाला ..

अपघात मोठां होता त्यात ती अपंग झाली... तिच्या मेंदूला ही बरीच दुखापत झालेली होती या जीवघेण्या प्रसंगाने तिची पत्रकारिता थांबते पण तरीही ती त्याला कळवत नाही.
त्याची लेखक म्हणून घौडदौड चालू असते..
दोघांचा पत्रव्यवहार नियमित सुरु असतो आणि या विचारांच्या देवान घेवाणीत ते एकमेकाच्या प्रेमात कधी पडले ते समझले देखील नाही ....

तो तिला त्याच्या कथानकातील मध्यवर्ती नायिका समजून लिखाण करीत असतो. सर्व पुस्तके तिला पाठवतो ती वाचते अभिप्राय दाखल  खूप मार्मिक पत्र पाठवत असे.
अशी त्यांची जगावेगळी कल्पने पलीकडची प्रेमकहाणी असते. परंतु नियती ला हे मान्य नव्हते .... दरम्यान तिची प्रकृती खूप खालावते व उपचारापलीकडे दुखणे जाऊन दुर्दैवाने ती त्याच्या आठवात प्राण सोडते. 
त्याला यातील काहीही माहीत नसते त्यामुळे त्याचे नियमित पत्रव्यवहार करने चालू असते ...
पण पत्राचे हल्ली उत्तर मिळत नाही... 
हे पाहून तो बेचैन होतो ... रागावलीस का

 काही झाले का ? 
तु ठीक आहेस नं ?
असे ही प्रत्येक पत्रात विचारणा करीत असतो ..
काही वेळा आयुष्यात असे काही वळणे येतात की ते नियतीलाचं माहीत असतात ...
 त्या गावात पोष्टऑफिस चा विस्तार वाढतो ... पोस्टमन बदलतो आणि तिच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या ... दुस-या घरी पत्र घेऊन जातो..
योगायोग कसा ... 
ती तिचीच मैत्रीण पण आंधळी असते तिला आश्चर्य वाटते कोणी मला पत्र पाठविले. 
ती आश्चर्य चकित होते .
 पण उत्सुकता म्हणून व शिष्टाचार मोडून ते पत्र ती पोस्टमनला पत्र वाचायला सांगते आणि त्यातले भाव वाचून आपल्या मैत्रिणीच्या आठवणीने तिला गदगदून येते आणि याची जाणीव होते  कि त्याच्या कथानकांची नायिका माझी स्वर्गीय मैत्रीणचं आहे म्हणून ...
ती खूप विचार करते आणि पोस्टमन ला दुस-या दिवशी यायला सांगते ....
यावेळी तीची अवस्था अतिशय चलबिचल असते ..
तिच्या मनात योग्य की अयोग्य ...
काय करावे ? होय ... की नको ? 
पण तिने पुन्हा वर्तमान आणि भविष्याचा विचार करून त्याला धीर देण्याचा निर्णय घेतला .
दुसऱ्या दिवशी पोष्टमन यांना विनंती करून ती पत्र लिहायला सांगते आणि जे कधी संपलेच नव्हते असे पुन्हा होऊन पत्र लिहिण्याचा क्रम सुरु होतो.
 पोस्टमन लिहून देत असतो पहाता पहाता ~~~
आठ ते दहा वर्षाचा कालावधी लोटतो~~~
 कालानुरूप तो एक प्रतिभावंत आणि प्रसिद्ध लेखक म्हणून नावारूपाला येतो .
खूप नावलौकिक मिळवतो पण आताशी त्याच्या सहनशीलतेचा बांध सुटतो...
 मी तुला भेटणारच .....
तिची आंधळी मैत्रीण खूप धीराने आणि हिम्मत एकवटून त्याला ..
ये~~~ असे कळवते ...

कैक वर्षानंतर भेटण्याचा क्षण जवळ आलेला हे पाहून तो तिला भेटण्या साठी खूप आतुर होतो ... आणि लगेच पुढील रविवारी तो तिच्या गावी पोहचतो ... त्याची तिच्याशी भेट होते.
तिच्याकडून भुतकाळाच्या सर्व वेदनामय घटना ऐकतो... नियतीने त्याचेशी केलेला खेळ पाहून खूप खिन्न होतो.
तिच्या आठवणीने तो अतिशय कासावीस होतो त्याला भडभडून येते.
त्याची ही अवस्था पाहून तिची मैत्रीण त्याच्याकडे माफी मागते...
मी तुला फसवले तिच्या नावाने पत्र लिहून !!!
पण त्यावेळी तू यशस्वी होण्याचा मार्गावर होता.. आणि तिच्या दुख:न निधना च्या  बातमीने कदाचित तू उन्मळून पडला असता,
यातून सावरला नसता ..
कदाचित दुखी होऊन तुझे लिखाण थांबले असते ..
तुझे वर्तमान अंधारमय होऊ नये ....
हे सर्व लक्षात घेऊन योगायोगाने आलेले पत्र पहाताच त्यात खंड न पडू देता मी सद्सद्विवेक बुद्धीने तिला तु गृहीत धरावे या मानसिकतेने पत्रव्यवहार चालू ठेवला...

मी तुझी दोषी आहे ... मला तु हवी ती शिक्षा दे !!
हे ऐकून तो धीरगंभीर होऊन अवाक झाला .
तिच्या पत्रातील लेखनातील वैचारिक दृष्टीकोन त्याने अनुभवलेले होते .
तिने योग्य प्रसंगी दाखवलेले बौद्धिक चातुर्य ...
पण आता तिला प्रत्येक्ष पाहित्यानंतर ति जग पाहू शकत नाही . तरी ही तिने तिच्या अंधत्वा वर मात करून पोष्टमन यांना वेळचे वेळी मदत करायला भाग पाडले .त्यासाठी तिला प्रत्येक वेळी किती अडीअडचनिंना सामोरे जावे लागले असेल . असे नानाविध विचारचक्र त्याच्या मनात तांडव करीत होते .
पण दुसरी बाजू पाहिली तर जर तिने मला कळवले असते आणि मी त्या दुखात एकटा पडलो असतो ... त्यातून आलेल्या निराशेतून बाहेर पडलो नसतो तर ?
आज मी प्रतिभावंत नसतो .... कारण माझी नायिका चं संपली असती मी काय लिखाण केले असते .... त्यामुळे हीने मला मोठा आधार दिला. माझी प्रतिभा वाया जाऊ दिली नाही ... आता माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे की ही जरी अंध असली तरी आम्हाला दोघांची एकमेकांना गरज आहे .
 आता तूच माझ्या कथांची नायिका...
,माझी सर्वस्वी जबाबदारी आणि प्रेरणा सुद्धा ....
तो तिला घेऊन शहरात त्याच्या घरी येतो व पुन्हा नव्याने लिखाण सुरु करतो.

 एक यशस्वी लेखक होतो तात्पर्य .....

"एखाद्याला यशस्वी होण्यासाठी केलेली एखादी प्रामाणिक चूक सुद्धा कधी कधी उपकारक असते ""!!!!!

                         सौ तारा ठाकरे ```



                                        राधे __/|\__ कृष्ण                                  कैलास मांडगे ............

मुक्तपक्षी भाग क्रमांक - ९

                                                               मुक्तपक्षी भाग क्रमांक - ९ 
हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.
               अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे






संपूर्ण सारं विश्व सुंदर 
     तसं पुन्हा जगायला हवं 
        नातं किती अलवार मोहक 
           ते आता सतत जपायला हवं ~~~~~~~~~~~~~~~





मी शोधला विसावा तुझ्यात 
     याची देही डोळा देखिले 
          नवयुवती आकाश तारांगणी 
               तेजाने मज रोमरोम न्हाईले~~~~~~~~~~



असा कसा देऊ होकार 
      मन सोडते सारखं सुस्कार 
           फुल्रराणी चा बहर फुलवायचा 
             सौभाग्यात मोगरा माळायचा !!!!



नजरेत सारं ओळखीचं 
           तरी गोंधळून का पहायचं 
                मिश्कील सारं गालातल्या गालात 
                    जेथे जावे तेथे बंधनात ...............



येणं जाणं अत्तरासारखं 
     साधेपण निशिगंधा सारखं 
          भेटणं पहिल्या पावसा सारखं 
               मातीचा सुवास गंधाळण्या सारखं ~~~~









                                                           राधे __/|\__कृष्ण                      कैलास मांडगे ~~~~~~~