Saturday, March 12, 2016

मस्तानी ... बाजीराव पेशव्यांची


मस्तानी ... बाजीराव पेशव्यांची 

हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची
किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे.
मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे 

यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. मूर्तिमंत निष्ठेची भाषा ती समस्त मराठी मुलुखाला शिकवून गेली. १७४० साली झालेल्या या घटनेला आज ३०० वर्षे होत आलीत आणि तरीही ती मराठी
साहित्यात, मराठी मनात वारंवार तिच्या व्यक्तिमत्त्वाचे
उल्लेख येतात. परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराला कायम थट्टेचा, टिंगल-टवाळीचा उपसर्ग पोहोचला आणि तो अबाधित राहिला, म्हणूनच आजही या ३०० वर्षांत महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नावमस्तानीअसे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव
कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थाना
ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला.
म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी,
मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली,
ती अशी.

मस्तानीची दुसरी ओळख आहे, ती म्हणजे रखेल मस्तानी, नाची
मस्तानी, कंचन मस्तानी आणि तिची शेवटची ओळख म्हणजे तिने
पान खाल्ल्यानंतर पानाची पिंक तिच्या गळ्यातून खाली
उतरताना दिसायची ती पान खाऊन सज्जात बसायची
त्याला लोकमस्तानीचा सज्जाम्हणून ओळखत. मस्तानी या
पद्धतीने इतिहासपटलावर प्रतीत झाली. परंतु खरंच मस्तानी
अशी होती का? काय आहे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य?
मस्तानीला समजून घ्यायचे असेल तर प्रथम आपल्याला छत्रसाल
महाराजांना समजून घ्यावे लागेल. राजा छत्रसाल महाराज हे
प्रौढप्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उद्गाते, बुंदेल खंडाचे
भाग्यविधाते. आजही बुंदेल खंडात परमेश्वराअगोदर त्यांची पूजा
केली जाते. ‘छत्रसाल महाबली! कर दे भली! कर दे भली!’ अशी
प्रार्थना म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. एवढे मोठेपण
हिंदुस्थानातील कोणत्याही राजाला लाभले नाही.
छत्रसाल महाराज हे प्रणामी पंथाचे होते. प्रगत, उदारमतवादी
प्रणामी पंथात हिंदू-मुस्लीम या धार्मिक भेदास मान्यता

नव्हती. वेद आणि कुराण यातील ईश्वर एकच असून, मनुष्यमात्राची
समानता, धार्मिक सहिष्णुता आणि निरामय प्रेमभावना ही
या पंथाची तत्त्वे होती. या प्रणामी पंथास निगडित असलेली
खूप मोठी मोठी नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महात्मा
गांधी यांचे. ते त्यांचे कुटुंब हे प्रणामी पंथीय होते. हे ऐकले तर
आश्चर्य वाटेल; परंतु हे सत्य आहे.
अशा पंथातून, अशा संस्कारातून मस्तानी आली होती. ती
छत्रसाल महाराजांना यवन उपपत्नीपासून झाली होती.
प्रणामी पंथाच्या तत्त्वाप्रमाणे हिंदू-मुस्लीम भेद हा तर ग्राह्य
धरत नसत. त्यामुळे मस्तानी ही छत्रसालांची औरस राजकन्याच
ठरते.
तिचे शिक्षण, संगोपन, तिच्यावरचे धार्मिक, सामाजिक
संस्कार हे छत्रसालानेच केले होते. म्हणूनच ती नृत्य, गायन, तलवार,
तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा,
मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू
साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. वैभवात
ती राहिली होती. गजान्तलक्ष्मीचा अनुभव तिला होता.
तिच्या पिखादीला (अंगरखा) गुंडी म्हणून हिरे लावण्यात येत
असत आणि हे हिरे त्या काळात लाख लाख रुपये किमतीचे असत.
अशा या लाडक्या, राजकन्येचा मस्तानीचा खांडा पद्धतीने
बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. छत्रसाल राजाने
त्या वेळी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा
जहागिरीचा प्रदेश पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील
तिसरा हिस्सा भेट दिला. ही भेट म्हणजे बुंदेल खंडावर आक्रमण

करणाऱ्या महमंद बंगषाला बाजीरावांनी पराभूत केल्याची
कृतज्ञता होती. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास
पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी
शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा
सरदार होते. मस्तानीच्या लग्नाच्या निमित्ताने छत्रसाल
राजाने मराठे बुंदेला ही सोयरीक निर्माण केली.
बाजीरावांचाही या विवाहामागील हेतू पाहिला तर
मस्तानी लावण्यवती होती, एवढाच नव्हता, तर
बाजीरावांनी तो एक राजकीय व्यवहारच केला होता.
बाजीरावांचे दिल्ली हे निश्चित लक्ष्य होते आणि
त्यासाठी
त्यांना बुंदेल खंडासारखे संपन्न आणि मोगलांचे
शत्रूराज्य कायम आपल्या बाजूने राहणे गरजेचे होते. ही गरज
बाजीरावांनी ओळखली होती. पुढे पुढे मात्र या व्यवहारात
भावनिक जवळीक निर्माण झाली. छत्रसालांनी
बाजीरावांना आपला मुलगाच मानले. छत्रसालाच्या मृत्यूनंतर
बाजीरावांचे सांत्वनपत्र उपलब्ध आहे. त्यात ते छत्रसाल पुत्रास
म्हणतात, ‘हाल मालुम भयो, श्री श्री श्री महाराज ककाजू
साहिब को वैकुंठवास हो गयो, बडी भारी रंज भयी.’
महाराजने हम कौ लडम्का कर कै मानो है, सो मैं वही तरह आप को
अपनौ भाई समझे हो.’ पत्राची तारीख आहे शनिवार, २३ सप्टेंबर
१७३२. सदर पत्रातून बाजीरावांचा आणि मस्तानीच्या
परिवाराबद्दलचा जिव्हाळा किती होता, हेच दिसून येतं.
बाजीरावांनी केवळ सौंदर्यवती मस्तानीला पुण्यात आणले
नाही, तर त्यांनी मस्तानीसोबत प्रणामी पंथाची

भेदाभेदातीत निरामय प्रेमतत्त्वाची, अनोखी जीवनदृष्टीही
आणली होती. हा नाही म्हटला तरी पुण्यातील लोकांना
धक्काच होता आणि आव्हानही. त्यातच बाजीराव-मस्तानी
यांच्या परस्परासंबंधीच्या निष्ठा फारच पक्क्या होत्या.
परस्परांतील प्रेमही अतूट होते.
सुरुवातीची तीन वर्षे मस्तानीची ठीक गेली. त्यातील
निजामभेट, कोकण मोहीम सात-आठ महिने. त्याअगोदर डबईचे
युद्ध आणि नंतर उत्तरेची मोहीम. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने
सोडले तर मस्तानीला रायांचा सहवास असा नव्हताच. पेशवे
कुटुंबाचेही तसे दुर्लक्षच होते. एक रखेल या पलीकडे मस्तानीचे
अस्तित्व पेशवे कुटुंबाच्या लेखी नव्हते.
परंतु मस्तानीस जसा समशेर हा मुलगा झाला, तसे पेशवे कुटुंबास
एका भीतीने ग्रासले की, कदाचित मस्तानीचा वंशज
पेशव्यांच्या गादीवर हक्क सांगेल. झाले त्याच दिवसापासून
मस्तानीच्या खच्चीकरणास सुरुवात झाली. त्यात तिला
नाची कंचनी ठरविले. तिला मद्य पिणारी- प्राशनी ठरविले.
एवढेच नाहीतर या संकटास कायमचे पंगू करण्यासाठी
बाजीराव-मस्तानी हा संबंध वैवाहिक नाही, ती पत्नी नसून
रखेल आहे,
शिवाय ती खानदानी नसून ती निजामाच्या रक्षेची
मुलगी आहे, शहाजन खानाची कलावंतीण आहे- अशा
कपोलकल्पित गोष्टींचा पुण्यात बोभाटा सुरू केला.
आणखी एक आवई अशीच उठवली गेली, ती म्हणजे मस्तानी
आल्यामुळे बाजीरावांचे काशीबाईंवरील लक्ष उडाले. परंतु
वास्तवात मात्र मस्तानीचे काशीबाईंचे संबंध सौहार्दाचे
होते. मस्तानी आल्यानंतर ही काशीबाईंना तीन अपत्ये झाली.
यातून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे चारही बाजूंनी मस्तानीवर
हल्ले होत होते. यात थोडा अंकुश होता, तो शाहू
महाराजांचा. त्यातच बाजीरावांनी मस्तानीला तीन गावे
इनाम दिली. पाबळ इथे मोठा वाडा बांधला.
शनिवारवाडय़ात प्रशस्त हवेली बांधली. एवढे नव्हे तर, समशेरच्या
मुंजेची तयारी सुरू झाली.
या सर्व गोष्टींनी पेशवे कुटुंब धास्तावले. त्यांचा विरोधास
आणखीनच धार चढली. त्यातच या लढय़ात पुण्यातील ब्रह्मवृंद
उतरला आणि बघता बघता राजकारणात रणभूमीवर
महाप्रतापी ठरलेले बाजीराव कौटुंबिक संघर्षांत मात्र पराभूत
झाले.

पेशवे कुटुंबाने मस्तानीला अटक केली. मस्तानीला मारण्याचे गुप्त
मनसुबे रचले गेले. खरे तर मस्तानी ही योद्धा होती. तिने
दिल्लीच्या
मोहिमेत बाजीरावांच्या रिकिबीला रिकीब
लावून घोडा पळविला होता; परंतु इथे मात्र बाजीरावांच्या
अनुपस्थितीत एकटी मस्तानी असहाय्य झाली, अगतिक झाली.
ती सहनशीलतेची ढाल पुढे करून जगण्याची पराकाष्ठा करीत
होती; परंतु अखेरीस ती कोसळली.
आजही मस्तानी-बाजीरावांचे इंदोर येथील वंशज म्हणतात ते
खरेच! मस्तानीला मराठी मुलखाने न्याय दिला नाही.
मस्तानी ही कधीच सत्तालोलुप नव्हती. महत्त्वाकांक्षी
नव्हती. सुखलोलुप नव्हती. तसे असते तर एवढे बुंदेला येथील वैभव,
ऐश्वर्य, आई-वडील आपला मुलुख सोडून ती हजार किलोमीटर
एवढय़ा दूर पुण्यात आली नसती, यावरूनही ते सिद्ध होते. ती
पुण्यात आली. राहिली. तिने इथली भाषा, पेहराव
स्वीकारला. राऊंच्या पाठोपाठ काशीबाईंचे प्रेम मिळवले.
मात्र ही पुण्याई तिच्यासाठी तुटपुंजी ठरली.
इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात निर्दोष समाज हा
भारतात कधीच नव्हता, आजही तो नाही. आणि तो तर तीनशे

वर्षांपूर्वीचा काळ होता. परंतु, बाजीरावांनी सामाजिक सौहार्दाचा प्रकाश मस्तानीच्या रूपात पाहिला होता. तोमस्तानीच्या रुपाने त्यांना मराठी मुलुखात पेरायचा होता;
परंतु तत्पूर्वीच बाजीराव मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची खबर
ऐकताच मस्तानीही त्या धक्क्याने पाबळ येथे मृत्यू पावली.
सर्वसाधारण समज आहे, की मस्तानीमुळे
बाजीरावांची
राजकारणावरील पकड ढिली झाली, दुर्लक्ष झाले.
व्यसनाधीनता वाढली; परंतु तो समज निखालस खोटा आहे.
मस्तानी बाजीरावांच्या जीवनात आली ते वर्ष आहे . .
१७२२. यानंतर ११ वर्षांत त्यांनी १२ लढाया केल्या आणि
मस्तानीच्या अगोदर त्यांनी १० लढाया केल्या आहेत. दुसरी
गोष्ट मस्तानीमुळे गृहकलह पेटला असतानाही परकीय नादीर
शहाचे आक्रमण होताच सबंध हिंदुस्थान वाचवण्यासाठी
त्यांनी नर्मदेच्या तटावर सैन्य उभे केले होते. दक्षिणेत नादीर
शहा उतरला नाही,
यातील एक प्रमुख कारण बाजीराव होते.
नादीर शहापाठोपाठ त्यांचे नासीरजंगाशी युद्ध झाले,
त्याला पराभूत केले. हे युद्ध मोठे होते. आपल्यावर मस्तानीवर
होणारी बदनामी तलवारीच्या टोकावर झेलत त्यांनी मराठी
राजकीय सत्तेची पुनर्रचना केली. त्याचे साम्राज्यात रूपांतर
केले. होळकर, पवार, खेर (बुंदेला) शिंदे या मराठा सरदारांची
नर्मदेपलीकडे अभेद्य फळी उभी केली, तो त्यांच्या
व्यवस्थापनाचा दूरदृष्टीचा महनीय नमुना होता.
चारित्र्यसंपन्न, निव्र्यसनी, बुद्धिमान,
कष्टाळू, अलोट देशप्रेम
अशा बाजीरावांच्या अकस्मात मृत्यूने मराठी राजसत्तेवर
दूरगामी परिणाम झालेले आपल्याला आढळतात. वयाच्या
विसाव्या वर्षी ते पेशवे झाले आणि चाळिसाव्या वर्षी
त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे राजकीय आयुष्य फक्त २० वर्षांचे. या
२० वर्षांत त्यांनी ज्ञात २२ लढाया केल्या. आपल्या
सरदारांच्या ३००च्या आसपास लढायांचे व्यवस्थापन केले मुख्य
म्हणजे ते अजिंक्य राहिले. बाजीरावांचे असामान्यत्व या ना
त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय?
मस्तानीबद्दल तिरस्कार
मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही
हेच. ना हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गुलाब गळून पडला, ना त्याच्या
सौंदर्यास किंमत, ना त्याच्या सुगंधास. तो फक्त अणकुचीदार काटय़ांना धनी झाला.


 संग्रहित ..............

राधे __/|\__ कृष्ण                                                                 कैलास मांडगे 

Monday, January 25, 2016

प्रजासत्ताक दिन

                                    ::   प्रजासत्ताक दिन ::

भारतमातेच्या चरणी प्रत्येकाचे फुल व्हावे 

सगळ्या श्वासात भिनावा दरवळ 
smile emoticon

वंदे मातरम् !..
smile emoticon
 प्रजासत्ताक चिरायू होवो !

२६ जानेवारी! भारताचा प्रजासत्ताक दिन; हे बरेच लोक जाणतात.
पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी, या दिवसाचे महात्म्य टाळून 'हू केअर्स' असा पवित्र घेणा-यांची संख्याही मोठी आहे.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील फरकाकडे दुर्लक्ष करणारेही कमी नाहीत. जाण असून माहित नसल्याचे सोंग वठवून स्वत:स आधुनिक ठरवणा-या थिल्लर लोकांची संख्या आता भूछत्रासारखी वाढत आहे.
काहीना २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रजातंत्र सुरु झाले, इतकीच माहिती असते. फार कमी लोक या दिवसाची पाळेमुळे किती खोलवर रुतली आहेत ते जाणतात.
आपली रास्त ओळख जाणण्यात रस असलेल्यांसाठी हा छोटा लेख! 
२६ जानेवारी १९५० रोजी ख-या अर्थाने 'आपल्या देशात आपले राज्य' अशी परिस्थिती निर्माण झाली, हे निर्विवाद! ही शुभ सुरुवात करण्यास याच दिवसावर पसंतीची मोहोर, अत्यंत विचारपूर्वक मारण्यात आली आहे.
स्कॉटलंड, आयर्लंड प्रमाणे 'डॉमिनिअन विदिन द ब्रिटीश एम्पायर' हे ध्येय ठेऊन १९१६ साली ऑल इंडिया होमरूल ही मातबर संस्था स्थापन झाली.

या संस्थेच्या कार्यात महमदअली जिन्नाह, लोकमान्य टिळक, अॅनी बेझंट, सर सुब्रह्मण्यम अय्यर, वगैरेंचा सहभाग होता. त्यांनी ब्रिटीशांच्या छत्राखाली प्रत्येक राज्यात स्वायत्त सरकार निर्माण करण्याची भलावण केली. 
पण पुढे सरकारने हिंदू-मुस्लीम प्रजेत फूट पडण्यावर भर दिला. जालियानवाला बागेतील बेछूट हत्याकांड, लोकमान्य टिळकांवर अन्याय, अॅनी बेझंटची अटक वगैरेमुळे भारतीय जनतेत असंतोष वाढला. शिवाय विश्वयुद्धामुळे परिस्थितीत वेगाने बदलत होती. म्हणून दृष्ट्या पुढा-यांना ‘अरत्र न परत्र’ स्वराज्य नको वाटले. पूर्ण स्वराज्याच्या विचाराचे बीज १९२० साली अंकुरु लागले. आपल्या देशात आपले सार्वभौमत्व असले पाहिजे, हा विचार देशातील धुरीण देशभर पसरवत होते. चर्चा विचारणा होत होत्या. कार्य कसे संपन्न करावे, या विषयी मतभेद असले तरी आपल्या देशात आपले सार्वभौमत्व असलेच पाहिजे, हा आग्रह यच्चयावत देशभक्तात जोर धरू लागला. 
त्या काळी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या संदर्भात लाहोर आणि कलकत्ता या स्थानी निर्णय घेतले जात. ३१ डिसेंबर १९२९ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी नॅशनल इंडियन काँग्रेसच्या सौजन्याने भारत स्वतंत्र असल्यागत लाहोर शहरी रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची मागणी सूचित केली. या ध्वजावर अशोकचक्राच्या जागी चरखा होता. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, वगैरेंनी पूर्ण स्वराज्याची मागणी करणारा मुद्देसूद विचार शब्दबद्ध केला. बुद्धीप्रामण्यवादी साक्षरांशी चर्चा करून 'डिक्लरेशन ऑफ ईंडीपेंडन्स ऑफ द इंडिया' चा मसूदा तयार झाला. यात पूर्ण स्वराज्यात ठीक काय अभिप्रेत आहे, ते स्पष्ट केले होते. १० वर्षांच्या वैचारिक मंथनाचे हे नवनीत! २६ जानेवारी १९३० रोजी नॅशनल इंडियन काँग्रेसने तो ठराव बहुमताने मंजूर केला. अपार आंदोलनांच्या परिणामी १५ ओगस्ट रोजी देश स्वतंत्र झाला. पण देशाची आचारसंहिता तयार झाली नव्हती. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम चालू होते. १९४९ सालच्या २६ नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची घटना

राष्ट्रपतींच्या हवाली केली. वास्तविक ग्रीन व्हिले ऑस्टिन यांनी द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉरनर स्टोन ऑफ नेशन या लेखात घटनेच्या कार्यात सहभागी असलेल्या २१ सदस्यांची नावे विषद केली आहेत. आपली मजल सरदारपटेल, नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, आणि डॉ. राजेंद्र प्रसाद या सात महानुभावापर्यंत पोहोचते. पण भारताची घटना तयार करण्यात रक्ताचे केले, असे उरलेले १४ अलक्षित राहतात. एम.ए.अय्यंगार, दिवान बहादूर अल्लादी क्रिष्णस्वामी अय्यर, दिवान गोपाल स्वामी अय्यंगार, श्रीमती.जी.दुर्गाबाई . टी.टी.कृष्णमाचारी, (मद्रास प्रतिनिधी) जयरामदास दोलतराम (पंजाब) शंकरराव देव (दलितांचे मुंबई प्रतिनिधित्व) कन्हैयालाल मुनशी, (मुंबई. विख्यात गुजराती लेखक. पुढे मंत्री.) जी.एस.मुखर्जी (बंगाल. पुढे राज्यपाल), बेनेगल नरसिंह राऊ आणि माधव राऊ, (ओरिसा) सय्यद मोहम्मद अताउल्ला (आसाम) सत्यनारायण सिंह (बिहार) बी.पट्टाभी. सितारामैय्या, (मद्रास रुरल प्रतिनिधी. पुढे राज्यपाल मध्य प्रदेश. ) या १४ मधील काहीचे नाही
फोटो उपलब्ध की सविस्तर माहिती! डॉ. आंबेडकरांनी घटना राष्ट्रपतींना सुपूर्द केली,तेव्हा डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी बेनेगल नरसिंह राऊ यांच्या कार्याचा गौरव करून डॉ. आंबेडकरांच्या तोलाचे काम केले आहे, असे आवर्जून सांगितले होते. घटनेचे लेखन करणा-या आसाम प्रतिनिधी कुलधर चालिहा यांच्या अजोड ड्राफ्टिंगचा सन्मान केला होता. दुर्दैवाने या १४ महानुभावातील काहींची स्थिती आज नाही चिरा नाही पणती, या पठडीत आहे. वास्तविक वास्तविक घटना तयार होताच प्रजासत्ताक राष्ट्राची ९ डिसेंबर रोजी घोषणा करण्याचा प्रस्ताव आला होता. नेहरू सरकारला ते रुचले नाही. त्यांना पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला त्या ऐतिहासिक घटनेचे महत्व जोपासणे हवेसे वाटले. म्हणून २६ जानेवारीस प्रजासत्ताक राज्याची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानची घटना १९५६ मध्ये तयार झाली. 

१९४० सालच्या २३ मार्च रोजी 'मिनार ए पाक' चा विचार जाहीर करण्यात आला होता. म्हणून आपले अनुकरण करून त्यांनी २३ मार्च तारखेस महत्व दिले. भारतीय पूर्ण स्वराज्याचा तसेच ‘मिनार ए पाक’चा विचार लाहोरमध्येच जाहीर झाला, हा योगायोग! वृक्षाची वाढ व्हावी या साठी रोपाचे तुरे छाटतात, मुळे नव्हे. मुळे छाटल्याने रोपाची वाढ खुंटते. ते वृक्षरूप धारण करण्याऐवजी बॉन्साय बनते. मानवाचेही तसे आहे. इतिहास देशाची मुळे ठरतो. मॉडर्न बनण्याची हौस अतीताची मुळे छाटून भागवण्याचा उथळपणा केला तर व्यक्तिमत्व चहूअंगाने विकसित होत नाही. गगनाला गवसणी घालायची महत्वाकांक्षा बाळगायची नि 'मेरा भारत महान' ख-या अर्थाने सिद्ध करायचे असेल तर इतिहास जाणला आणि जतन केला पाहिजे. ते घडत नसल्याने ही घोषणा हास्यास्पद ठरत आहे. 
प्रगतीपथावर असलेल्या कोणत्याही देशात अशी होर्डिंग नाहीत. इतिहासाची मुळे छाटल्याने देश बॉन्साय बनत आहे, हा विचार व्हायला हवा.
तर मग चला मस्तक उन्नत करून मन:पूर्वक म्हणू या जय हिंद.
........सन्माननिय लेखक यांना .......त्रिवार मुजरा ..........
.....संग्रहित ......
उज्ज्वल भविष्यासाठी इतिहासाची जाणीव जागती ठेवणे आवश्यक! म्हणून २६ जानेवारी हा केवळ रजेचा दिवस न ठरवता या दिवसाचे महात्म्य आठवून चिंतन व्हावे. स्वराज्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले, त्या विख्यात तसेच प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या अनाम वीरांचे स्मरण केले पाहिजे. स्वार्थी राजकारणावर कुरघोडी करण्याची मनीषा बाळगली पाहिजे. कै. साने गुरुजींची 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो' ही इच्छा जोजवत त्यासाठी प्रयत्न करण्यास कंबर कसण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पाहिजे. अशक्यप्राय करणीच्या संदर्भात मला तुकोबा आठवतात - निश्चयाचे बळ पटवणारे! केल्याने होत आहे रे... म्हणत सुषुप्त समाजास जागे करून कार्यरत करणारे समर्थ आठवतात. आणि बहुभाषिक भारतीय या नात्याने विविध भाषातील अशी वचने आठवतात. त्यात अग्रभागी असतो एक शेर - कौन कहता है आकाशमे सुराख नही होता? तबियतसे एक पत्थर तो उछालो यारो! सुराख म्हणजे भोक! कवी म्हणतो - पूर्ण शक्तीनिशी मनापासून उडवलेला फत्तर आकाशास भोक पडू शकतो. प्रयत्नांचे अनेक फत्तर उसळले तर नक्की आकाशाची चाळण होईल. 





आजच्या विपरीत परिस्थितीवर मात होईल. आजच्या शुभदिनी पूर्वसुरींचे स्मरण करून परिस्थिती बदलण्याचा वसा घेतला तर 'जितेगा भारत' हे दिवास्वप्न अवश्य सिद्ध होईल. ख-या अर्थाने भारत महान ठरेल आणि ज्या पूर्वसूरींनी अपर त्याग करून आपल्याला स्वराज्याचा नजराणा दिला, त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण केल्याचे सुख आपण मिळवू शकू. तुम्हाला नाही असे वाटत? 
तर मग चला मस्तक उन्नत करून मन:पूर्वक म्हणू या जय हिंद.
........सन्माननिय लेखक यांना .......त्रिवार मुजरा ..........
.....संग्रहित ..

राधे __/|\__कृष्ण                                                        कैलास मांडगे ~~~~~~~~~~~~~~~~


Saturday, January 16, 2016

मुक्तपक्षी चारोळी भाग क्रमांक - 31

                                        अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे



सितारों को जानता हु सदियों से 
     जहां भी जावू साथ साथ रखते है 
           नीली फिजाये के हसते नूर हमारे 
                आपके हर आंचल से छान जायेंगे ~~~~





रंगात भिनलाय सखा केशर गुलाबी 
       शब्दांच्या गुलालात जिव हां खुळा 
            अजूनही आस गुलमोहरास फुलण्याची 
                 निसर्ग कवेत येता झाला खुळा ~~~~~



दुखवले प्रेमाने कितीही तरी 
     त्याच्या भावनांना पेलायचे असते 
         प्रत्येक वेळी त्याचं तेज वाढतच रहाते 
             कारण कुठलीही अपेक्षा नसते ~~~~~~






गंध ताजाच राहील सदैव 
         म्हणून फुले ताजी रहात नाही 
               प्रवाहांविरुद्ध काही होऊ नये सदैव 
                   म्हणून सगळं मनाविरुद्ध घडत नाही ~~~~~




आल्या पावली असे का परतणे 
    शब्द मांडताना का येई गहिवर 
            तुझं अचानक अबोल होणं 
                घालमेल होते निर्णय घेणं ~~~~







राधे __/|\__ कृष्ण                                                                                    !! श्री स्वामी समर्थ !!

                                                           कैलास मांडगे 

मुक्तपक्षी चारोळी भाग क्रमांक - 30

                              अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे





भावनांचा धागा अलवार क्षणांचा 
      वारा चाहूल देतो तुझी येताना 
          परसदारी प्राजक्ताचा गंध दरवळला 
               कळेल कधी तुला , भाव मनातला ~~~~



धडा भूगोलाचा वाचतांना 
     अंतरीचा विझला चांदोबा 
          जरा मोजता खगोल तारा 
              गजरा सुगंधाविन कोमजून गेला ~~~~



स्वच्छ नितळ पाउल टाक 
     तरारणारया रोपट्यासारखे 
         फुलू दे निर्व्याज मनीचा श्रावण 
                मनाची कवाडं नकोत काहुरलेले ~~~~




सतत स्वप्न बघावे असेच ना 
       कधी उन्हाळा तर कधी हिवाळा 
           जाणवते कधी झरणारी सारंगधारा 
               आनंद देते तेव्हा जगण्या पलीकडचा ~~~~






             
         डवरला घाम तुझ्या भाळावर 
                जागल्या चेतना मधुगंधात 
                    स्वैर शहारे अंगप्रत्यंगावर 
                        गंध भुलवीतो श्वासा श्वासात ~~~~









राधे __/|\__ कृष्ण                                                                                    !! श्री स्वामी समर्थ !!

                                                           कैलास मांडगे 

Thursday, January 14, 2016

मुक्तपक्षी चारोळी भाग क्रमांक - 29

                                 अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे






गंधवेडा पीत रहातो सुगंध 
    कोठे राहिलो मी माझा 
         विसावा तुझ्यात शोधला 
                  स्वत्व माझे विसरता ~~~~~~~~~~~    
     





         दबकू नको शहारताना 
             भावसमर्पण फुलवताना निशा सोबतीला 
                    विळखे मीपणाचे सोड आता 
                           धाग्यांचा गुंता सोडवूया आता ~~~~
             





 आताशा नभ कुठे दाटलेले 
         भाव कळून न कळणारे 
                जुळणाऱ्या अव्यक्त जाणीवेने 
                       स्वप्न झुळुकेत बेसावध गाठणारे ~~~~




भांबावलेल्या मनाला कसं सावरू 
   अंतरात सारखी चुळबुळ 
       क्षणात कसं उधळून देवू ?
          प्रीतीचे अणुरेणु हळूच फुलवू ~~~~~








चांदणे का मधाळ 
     सप्तर्षीचा समूह सोडून 
            रंगबावऱ्या मारव्यात बेभान 
                 पाहून नखरा जशी तळपणारी तलवार ~~~~













आधीचे जग खूप सुंदर होते 
    तरी मी तुझ्यासाठी स्वतः ला बदलले 
           सगळं जागेवरच असून प्रेमवीरास 
              मजा नाही जगण्यास असे का वाटते ?











राधे __/|\__ कृष्ण                                                                                 !! श्री स्वामी समर्थ !!

                                                           कैलास मांडगे