Wednesday, September 10, 2014

नातेसंबध

--- : नातेसंबंध :---

क्षुल्लक गोष्टीतील गैरसमजुतीमुळेच वाद वाढत राहतात. म्हणूनच असे गैरसमज त्वरित दूर करणं आवश्‍यक असतं. ते तसेच राहिले तर एकमेकांबद्दल कटू भावना निर्माण होते, नकारात्मक विचार वाढतात व या गैरसमजामुळे मनामनांतील अंतर वाढत
नातेसंबंध म्हणजेच धागेदोऱ्यांची गाठ. यातली काही नाती रक्ताची, तर काही बिनरक्ताची असतात. आणि या मानवी संबंधातूनच मानवी अस्तित्व निर्माण होते.’ काही संबंध मात्र आपण जन्माबरोबरच घेऊन येतो. उदाहरणार्थ, आई, वडील, भाऊ, बहीण, मामा, काका असे कितीतरी.येथे आपणास निवड करण्याचे स्वातंत्र्य नसते.
पण काही लोक म्हणतात की, नातेवाईकांपेक्षा मित्रच जास्त जवळचे आहेत मला. काहीजण मानलेली नाती सांगतात. स्वत:ला भाऊ, बहीण असतानाही. उदाहरणार्थ, मानलेला भाऊ, मानलेली बहीण वगैरे. हे दोन्ही प्रकार, म्हणजे मित्रांना नातेवाईकांचा दर्जा देणे किंवा मानलेली नाती तयार करणेही आयुष्यातील एक पळवाट आहे. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो; पण आपण त्याच्यासाठी काय केले, असा विचार करत नाही. खूप वर्षांपूर्वी घडलेला एखादा दु:खद प्रसंग, अपमान, कलह किंवा नको असलेली गोष्ट पुन: पुन्हा चघळत बसायचे यात सुसंस्कृतपणा दिसत नाही.कारण पहाडा सारखे कणखर व्हायचे असेल तर हिमालया सारखे व्हायला हवेच न . कारण मनुष्यलां कधी भाऊक होता होता वितळता ही यायला हवे .  आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:लाच संभाळणे अवघड होत आहे. अशा वेळी एकमेकांबद्दलची आपुलकी संभाळणे व व्यक्त करणे हीच जीवनात महत्वाची कसरत असते.

 ही नाती  टिकवताना इतरांच्या खूप अपेक्षा असतात;पण यात श्रेय मिळत नाही. लहानपणी शिळ्या भाकरी एका ताटात वाटून खाणारे भाऊ, बहीण, पुढे एकमेकांचे तोंड पाहण्यास तयार नसतात. अशी अनेक कुटुंबं आपण पाहतो. एकमेकांबद्दलची ही उत्कटताएकमेकांबद्दल असलेले प्रेम कोठे आटून जाते? या संघर्षातून आपण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण विसकटून टाकतो. शेवटी आपलाच, आपल्याशी असणारा संबंध महत्त्वाचा. हे आध्यात्मिक गूढ वाटेल; पण आपण आपल्यापासून दूर जात नाही ना किंवा आपल्यावरच आपण खूप खूप प्रेम करत नाही ना, असाही प्रश्न असतोच ना. त्यासाठी रक्ताची नाती अशी मध्येच सोडता येत नाहीत. त्यामुळे अस्वस्थता वाढते. एकाचवेळी प्रेम आणि द्वेष यांचे द्वंद्व सुरू होते. परिणामी इच्छाशक्ति, नवनिमिर्तीची शक्ती क्षीण होत जाते. शेवटी एकटेपणा येण्याचीही भीती वाटत राहतेयाचे तात्पर्य एवढेच की, जीवनात नातेसंबंध ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. तरच तुम्ही, आम्ही, सर्वजण आयुषात सुखी जीवन जगू शकतो. नातेसंबंध ही एक मधुर गोष्ट आहे. तसेच नाना प्रकारच्या माणसांचं नातं निर्माण करणं हीच जीवनाची समृद्धी आहे. समृद्धीची वाट बिकट नाही तर अगदी निकट असते. नातेसंबंध टिकवणे ही आनंदाचीच गोष्ट आहे. त्यासाठी सावध राहावे लागते.आपल्या मनातील घालमेल ही शेवटी शब्दांच्या भावना आणि घडलेल्या घटनांच्या चांगल्या वाईट आठवणीवर जगताना ह्या बेगडी दुनियेचे रंग रूप जेव्हा कळते तेव्हा आयुष्य कळते . नाती कळतात.
नातेसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांच्या मनातील गैरसमज वेळीच दूर करणं खूप आवश्‍यक आहे. मनात वाटणाऱ्या गोष्टी मनात न  ठेवता एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्या तर धुमसत राहणं कमी होतं. काही वेळा समोरच्या व्यक्तीला या गोष्टी आवडणार नाहीत, तो काहीतरी बोलेल ... थोड्याशा शाब्दिक चकमकी कदाचित होतीलही, पण त्या मनातून निघून जातील आणि काही ठराविक कालावधीनंतर एकमेकांना पटतील.
                     राधे __/|\__कृष्ण

                         श्री स्वामी समर्थ 

Sunday, September 7, 2014

देवघरात पाळावयाचे काही नियम

 वाचनात आलीय मला खूप व्यवस्तीत आणि जपून ठेवली ती माहिती अपना पर्यंत पोहोचवतो फक्त एवढेच माझे काम माझा एक ही शब्द यात नाही .... विचारवंत /लेखक कोण आहेत हे माहीत नाही . त्यामुळे त्या महान विचारवंतास मानाचा मुजरा .
 खूप छान आणि महत्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी ~~~~
अंध:श्रद्धा म्हणून पाहू नका परंतु रोजच्या दैनंदिन आयुष्यात एक प्रसन्नता रहावी म्हणून या कडे मी पाहिले आपण ही पहावे ही अपेक्षा ....  ...............

देवघरात पाळावयाचे काही नियम

देवापुढे समईची ज्योत दक्षिणे कडे लावून ठेवू नये
समईत किंवा निरांजनात तेल आणि तूप एकत्र घालू नये .
समईच्या ज्योतीवर निरांजनाची ज्योत पेटवून घेवू नये .
समईत तीन वाती लावू नये.
समई किंवा निरांजनाला कुंकू लावून नमस्कार करीत जावा.
देवाला एका हाताने नमस्कार करू नये.
घरातून बाहेर निघताना आणि बाहेरून घरात आल्यावर प्रथम
देवाला नमस्कार करीत जावा.
नमस्कार करताना देवापुढे टोपी काढून नमस्कार करावा.
शाळीग्रामावर अक्षता वाहू नयेत.
१० सहाणेवरील गंध तबकडीत घेऊनच देवाला लावावे.
११ देवघरात दोन शंख, दोन महादेव, दोन शाळिग्राम, तीन देवी,
तीन गणपती यांच्या मूर्ती ठेवू नयेत.
१२ भंगलेल्या मूर्ती किंवा देवाचे टाक देवघरात ठेवू नयेत.
१३ देवाच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणे कडे करून
ठेवू नयेत.
१४ देवाला वाहिलेली फुले ( निर्माल्य ) पुनः आपण वापरू नयेत.
१५ स्तोत्रे मोठ्या आवाजात म्हणावीत आणि जप मनातल्या
मनात करावा.
१६ देवाला गंध लावायचे ते आपल्या करंगळी शेजारील
बोटानेच लावावे. पितरांना लावायचे ते आपल्या
अंगठ्या शेजारील बोटानेच लावावे.
१७ ओले कपडे घालून देवपूजा करू नये.
१८ स्त्रियांनी तुळस तोडू नये.
१९ नैवेद्याच्या पानात मीठ वाढू नये.
२० देवघर नेहेमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे.



Saturday, September 6, 2014

गौरी -- स्मित पाठारे



                                                                            गौरी
                                    लेखिका - स्मित पाठारे 

 गौरी विसर्जन झाले पण माझ्या मनात एक विचार नेहमी येत राहिला , गौरीला आपण माहेरवाशीण म्हणून किती प्रेमाने आणि लाडाने कौतुकाने आणतो . तिचे न सांगता, मागता लाड पुरवतो . साक्षात आई जगदंबा / पार्वती आपल्या घरी मुलीच्या रुपात येते म्हणून तिचे किती कोडकौतुक . ती जाणार म्हणून मन हि खिन्न होते . साक्षात लक्ष्मी अलक्ष्मी चा नाश करणारी , घरात वैभव ऐश्वर्य देणारी आणि अगदी दीड दोन दिवसांची पाहुणी सगळ्यांना हवी हवीशी वाटते , पण जिथे मुलगी जन्माला येते तिथे मन का खिन्न होते . तिच्याकडे निराशेने का बघितले जाते ? मुलगा मुलगी याच्यात का भेद भाव धरावा . तेंव्हा ती का लक्ष्मी नसते . पूर्वी असे म्हंटले जायचे " पहिली बेटी धनाची पेटी " आता हि म्हण काहीशी लोप पावत चालली आहे . मुलगा झाला म्हणजे वंशाला वारस आला .
मुलगी झाली म्हणजे आता वंश थांबला . अगदी खरे आणि कटू सत्य आहे . मुली झाल्याच नाहीत / होऊ न देण्याचा विचारच केलात तर मुलांना जन्म देऊन त्यांचा वंश वाढवण्यासाठी त्यांच्या आयुष्याचा जोडीदार कुठून आणणार आहात . त्यांचा वंश वाढण्यासाठी सह्चारीनीची त्याची गरज कुठून पूर्ण केली जाणार आहे याचा विचार प्रत्येकाने करावा . मुलगी सासरी जाणार , तिचा आम्हाला काय उपयोग ? तिला वाढवण्यात जबाबदारी असते . लग्न होई पर्यंत खूप टेन्शन असते अशा अनेक व्यथा या मागे आहेत . पण जिथे मुलगी गौरीच्या रुपात लक्ष्मीच्या रुपात हवी हवी शी वाटते तशीच ती खरया अर्थाने हि पहावी असे मला वाटते . आणि ज्या घरात मुलगी आहे त्या घरातील नाविन्य खरेच वेगळेच असते . तिच्या एकेक जबाबदाऱ्या आपण पार करणे एक कर्तव्य पूर्ण करणे आनंदाचा परमोच्च बिंदू गाठ्ण्यासारखेच आहे. ती माहेरी येणे आनंददायी असावे . मग ती आपली बहिण असली तरी तिच्याकडेही त्याच रुपात पाहावे . कारण हि माहेरवाशीण शांत समाधानानी आपल्या घरात येते आणि घरातून जाते तेंव्हा त्या घराला आईचा आशीर्वादच प्राप्त होत असतो . तो आपल्याला दिसत नाही . त्या घरात शांती सुख सदा नांदत असते . हे मी अनुभवले आहे . नुसत्याच गौरी येतात तेंव्हाच या माहेरवाशीणीचे कौतुक नको तर ते नेहमी हसत करावे , तिच्या मागेही कोणतीच निंदा नालस्ती नको . बघा काही फरक जाणवतो का ? सगळ्याच माहेरवाशिणी घरात येउन सुख देतील असे नाही ताप हि देतील . मानसिकता असते ती स्वभाव असतात सगळेच आपण बदलू शकत नाही .
पण गौरी न आणल्यावर आपण जसे मुक्त हस्ताने तिचे कौतुक करतो न आणि तिच्या कडे काही न मागता हि समाधानानी ती जाते आणि मुक्यानेचे तथास्तु बोलते तेच आपण घ्यावे . शांती सदैव सुख देते . तर सांगायचे इतकेच आताच्या काळात मुली काय करतात . किती प्रगती करतात पुरुषांच्या बरोबरीने कशा उभ्या राहतात , मुलांच्या जागा कशा घेतात या चर्चा खूप झाल्यात . त्यांच्या बद्दल मला काहीच बोलायचे नाही
फक्त घरात मुलगी जन्माला आली तर नाराज होऊ नका तर हसत तिचे स्वागत करा . आनंदानी तिचे पालानपोषण करा . आदर्श घडवून तिला योग्य जोडीदाराच्या हाती स्वाधीन करा आणि मग ती माहेरी आली कि गौरीसारखेच तिचे लाड करून समाधानानी तिच्या करी तिची पाठवणी करा . हीच तर खरी गौरी पूजा .


स्मित

Friday, September 5, 2014

झिंगलेली सारी

सवंगड्यांची ओंजळ लेखणीची
भावभावनां खुलवित उल्हासित होती
बडीउज्जमा च्या सुरात अवघी

झिंगलेली सारी शब्द उधळीत होती .......

राधे __/|\__कृष्ण 

शब्दांनी मैफिल भिजलेली

शब्दांनी मैफिल भिजलेली
जुगलबंदीच्या भावात रंगलेली
बांधून दुर्वांची शब्दजुडी

शब्दां शब्दाला दाद होती .........

राधे __/|\__कृष्ण