Saturday, September 6, 2014

गौरी -- स्मित पाठारे



                                                                            गौरी
                                    लेखिका - स्मित पाठारे 

 गौरी विसर्जन झाले पण माझ्या मनात एक विचार नेहमी येत राहिला , गौरीला आपण माहेरवाशीण म्हणून किती प्रेमाने आणि लाडाने कौतुकाने आणतो . तिचे न सांगता, मागता लाड पुरवतो . साक्षात आई जगदंबा / पार्वती आपल्या घरी मुलीच्या रुपात येते म्हणून तिचे किती कोडकौतुक . ती जाणार म्हणून मन हि खिन्न होते . साक्षात लक्ष्मी अलक्ष्मी चा नाश करणारी , घरात वैभव ऐश्वर्य देणारी आणि अगदी दीड दोन दिवसांची पाहुणी सगळ्यांना हवी हवीशी वाटते , पण जिथे मुलगी जन्माला येते तिथे मन का खिन्न होते . तिच्याकडे निराशेने का बघितले जाते ? मुलगा मुलगी याच्यात का भेद भाव धरावा . तेंव्हा ती का लक्ष्मी नसते . पूर्वी असे म्हंटले जायचे " पहिली बेटी धनाची पेटी " आता हि म्हण काहीशी लोप पावत चालली आहे . मुलगा झाला म्हणजे वंशाला वारस आला .
मुलगी झाली म्हणजे आता वंश थांबला . अगदी खरे आणि कटू सत्य आहे . मुली झाल्याच नाहीत / होऊ न देण्याचा विचारच केलात तर मुलांना जन्म देऊन त्यांचा वंश वाढवण्यासाठी त्यांच्या आयुष्याचा जोडीदार कुठून आणणार आहात . त्यांचा वंश वाढण्यासाठी सह्चारीनीची त्याची गरज कुठून पूर्ण केली जाणार आहे याचा विचार प्रत्येकाने करावा . मुलगी सासरी जाणार , तिचा आम्हाला काय उपयोग ? तिला वाढवण्यात जबाबदारी असते . लग्न होई पर्यंत खूप टेन्शन असते अशा अनेक व्यथा या मागे आहेत . पण जिथे मुलगी गौरीच्या रुपात लक्ष्मीच्या रुपात हवी हवी शी वाटते तशीच ती खरया अर्थाने हि पहावी असे मला वाटते . आणि ज्या घरात मुलगी आहे त्या घरातील नाविन्य खरेच वेगळेच असते . तिच्या एकेक जबाबदाऱ्या आपण पार करणे एक कर्तव्य पूर्ण करणे आनंदाचा परमोच्च बिंदू गाठ्ण्यासारखेच आहे. ती माहेरी येणे आनंददायी असावे . मग ती आपली बहिण असली तरी तिच्याकडेही त्याच रुपात पाहावे . कारण हि माहेरवाशीण शांत समाधानानी आपल्या घरात येते आणि घरातून जाते तेंव्हा त्या घराला आईचा आशीर्वादच प्राप्त होत असतो . तो आपल्याला दिसत नाही . त्या घरात शांती सुख सदा नांदत असते . हे मी अनुभवले आहे . नुसत्याच गौरी येतात तेंव्हाच या माहेरवाशीणीचे कौतुक नको तर ते नेहमी हसत करावे , तिच्या मागेही कोणतीच निंदा नालस्ती नको . बघा काही फरक जाणवतो का ? सगळ्याच माहेरवाशिणी घरात येउन सुख देतील असे नाही ताप हि देतील . मानसिकता असते ती स्वभाव असतात सगळेच आपण बदलू शकत नाही .
पण गौरी न आणल्यावर आपण जसे मुक्त हस्ताने तिचे कौतुक करतो न आणि तिच्या कडे काही न मागता हि समाधानानी ती जाते आणि मुक्यानेचे तथास्तु बोलते तेच आपण घ्यावे . शांती सदैव सुख देते . तर सांगायचे इतकेच आताच्या काळात मुली काय करतात . किती प्रगती करतात पुरुषांच्या बरोबरीने कशा उभ्या राहतात , मुलांच्या जागा कशा घेतात या चर्चा खूप झाल्यात . त्यांच्या बद्दल मला काहीच बोलायचे नाही
फक्त घरात मुलगी जन्माला आली तर नाराज होऊ नका तर हसत तिचे स्वागत करा . आनंदानी तिचे पालानपोषण करा . आदर्श घडवून तिला योग्य जोडीदाराच्या हाती स्वाधीन करा आणि मग ती माहेरी आली कि गौरीसारखेच तिचे लाड करून समाधानानी तिच्या करी तिची पाठवणी करा . हीच तर खरी गौरी पूजा .


स्मित

No comments: