--- : नातेसंबंध :---
क्षुल्लक गोष्टीतील गैरसमजुतीमुळेच वाद
वाढत राहतात. म्हणूनच असे गैरसमज त्वरित दूर करणं आवश्यक असतं. ते तसेच राहिले तर एकमेकांबद्दल कटू भावना निर्माण होते,
नकारात्मक विचार वाढतात व या गैरसमजामुळे मनामनांतील अंतर वाढत
नातेसंबंध म्हणजेच धागेदोऱ्यांची गाठ. यातली काही नाती रक्ताची, तर काही बिनरक्ताची असतात. आणि या मानवी ‘संबंधातूनच मानवी अस्तित्व निर्माण होते.’ काही संबंध मात्र आपण
जन्माबरोबरच घेऊन येतो. उदाहरणार्थ, आई, वडील, भाऊ, बहीण, मामा, काका असे कितीतरी.येथे आपणास
निवड करण्याचे स्वातंत्र्य नसते.
पण काही लोक म्हणतात की, नातेवाईकांपेक्षा मित्रच
जास्त जवळचे आहेत मला. काहीजण मानलेली
नाती सांगतात. स्वत:ला भाऊ, बहीण असतानाही. उदाहरणार्थ, मानलेला भाऊ, मानलेली बहीण वगैरे. हे दोन्ही प्रकार, म्हणजे मित्रांना
नातेवाईकांचा दर्जा देणे किंवा मानलेली नाती तयार करणे, ही आयुष्यातील
एक पळवाट आहे. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा
करतो; पण आपण
त्याच्यासाठी काय केले, असा विचार करत
नाही. खूप वर्षांपूर्वी घडलेला एखादा दु:खद प्रसंग, अपमान, कलह किंवा नको असलेली गोष्ट पुन: पुन्हा चघळत बसायचे यात
सुसंस्कृतपणा दिसत नाही.कारण पहाडा सारखे कणखर व्हायचे
असेल तर हिमालया सारखे व्हायला हवेच न . कारण मनुष्यलां कधी भाऊक होता होता वितळता
ही यायला हवे . आजच्या
धावपळीच्या जीवनात स्वत:लाच संभाळणे अवघड होत आहे. अशा वेळी एकमेकांबद्दलची
आपुलकी संभाळणे व व्यक्त करणे हीच जीवनात महत्वाची कसरत असते.
ही नाती टिकवताना इतरांच्या खूप अपेक्षा असतात;पण यात श्रेय
मिळत नाही. लहानपणी शिळ्या
भाकरी एका ताटात वाटून खाणारे भाऊ, बहीण, पुढे एकमेकांचे तोंड पाहण्यास
तयार नसतात. अशी अनेक
कुटुंबं आपण पाहतो. एकमेकांबद्दलची
ही उत्कटता, एकमेकांबद्दल असलेले प्रेम कोठे आटून जाते? या संघर्षातून आपण आपल्या
आयुष्यातील आनंदाचे क्षण विसकटून टाकतो. शेवटी आपलाच, आपल्याशी असणारा संबंध
महत्त्वाचा. हे आध्यात्मिक
गूढ वाटेल; पण आपण
आपल्यापासून दूर जात नाही ना किंवा आपल्यावरच आपण खूप खूप प्रेम करत नाही ना, असाही प्रश्न असतोच ना. त्यासाठी रक्ताची नाती अशी
मध्येच सोडता येत नाहीत. त्यामुळे
अस्वस्थता वाढते. एकाचवेळी प्रेम
आणि द्वेष यांचे द्वंद्व सुरू होते. परिणामी इच्छाशक्ति, नवनिमिर्तीची शक्ती क्षीण होत
जाते. शेवटी एकटेपणा
येण्याचीही भीती वाटत राहते. याचे तात्पर्य एवढेच की, जीवनात नातेसंबंध ही गोष्ट
अत्यंत महत्वाची आहे. तरच तुम्ही, आम्ही, सर्वजण आयुषात सुखी जीवन जगू
शकतो. नातेसंबंध ही एक मधुर गोष्ट आहे. तसेच नाना प्रकारच्या
माणसांचं नातं निर्माण करणं हीच जीवनाची समृद्धी आहे. समृद्धीची वाट बिकट नाही तर
अगदी निकट असते. नातेसंबंध
टिकवणे ही आनंदाचीच गोष्ट आहे. त्यासाठी सावध
राहावे लागते.आपल्या मनातील घालमेल ही शेवटी
शब्दांच्या भावना आणि घडलेल्या घटनांच्या चांगल्या वाईट आठवणीवर जगताना ह्या बेगडी
दुनियेचे रंग रूप जेव्हा कळते तेव्हा आयुष्य कळते . नाती कळतात.
नातेसंबंध टिकवण्यासाठी
एकमेकांच्या मनातील गैरसमज वेळीच दूर करणं खूप आवश्यक आहे. मनात वाटणाऱ्या गोष्टी मनात न ठेवता एकमेकांशी मोकळेपणाने
बोलल्या तर धुमसत राहणं कमी होतं. काही वेळा समोरच्या व्यक्तीला या गोष्टी आवडणार
नाहीत, तो काहीतरी बोलेल ... थोड्याशा शाब्दिक चकमकी कदाचित होतीलही, पण त्या मनातून निघून जातील
आणि काही ठराविक कालावधीनंतर एकमेकांना पटतील.
राधे
__/|\__कृष्ण
श्री
स्वामी समर्थ
No comments:
Post a Comment