Tuesday, September 29, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 22

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.





क्षितीज कसं भरभरून दाटलं
       हे तर शाश्वत अनंताचं नातं
           प्रीतबंधात कसं नाही भेटणं
              तूच पटटराणी .... नको करू देवदास ~~~






       गर्द मध्यरात्री भाव फुलतात
                खिडकीतून चंद्र गुपित सांगता
                      अंधारात लय अलवार साधतात
                                लय श्वासांची तनमन मोह्ररतात ~~~~





         
              मंद तेवत असते
                  दिपमालेतील वाट
                         नको पेरूस संशयाचे धुके
                               अखंड तेवू दे प्रेमळ साथ ~~~~~



सुगंधी मातीत पेरले शुद्ध बीज
        नीट रुजतेय ... कारण निसर्गाची साथ
            मायेचं खत घालून विश्वासाचं कुंपण
              प्रेमाचे अंकुर उमलले जपूया जीवापाड ~~~~


सुखं दु:खा सोबत जगायचे 
    सर्व कसं सोप्प म्हणून फुलायचे 
       विरहात नाही कधी जगायचे 
         नाही होऊ द्यायचे आठवणींचे ओझे ~~~






राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 

देहदान अमुल्य दान ......

::: देहदान :::

                                                                                                                       - प्रभाकर भिडे

कल्‍पवृक्षाप्रमाणे माणसाच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्‍या शरिराच्‍या अनेक अवयवांचा वापर इतरांची आयुष्‍ये सुखी करण्‍यासाठी होउ शकतो. या उद्देशातून गुरूदास तांबे यांनी मरणोत्‍तर देहदानाचा प्रचार करणा-या ग. म. सोहनी यांच्‍या प्रेरणेतून 1987 साली दधीची देहदान मंडळाचीची स्‍थापना केली. तांबे यांनी चर्चा-बैठकांमधून हा विषय
अनेकांपर्यंत नेला आणि त्‍यास चांगला प्रतिसाद मिळू लागला. आतापर्यंत मंडळाचे सोळाशेपेक्षा जास्‍त सभासद असून साडेतीनशेहून अधिक व्यक्तींचे देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयातून केले गेले आहे.
जसे र.धों.कर्वे यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी संतती नियमनाचा प्रसार करून आपण काळाच्या पुढे आहोत (प्रचंड विरोध पत्करून) हे दाखवून दिले; तसेच कै.ग.म.सोहनी यांनी तीस वर्षांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा प्रचार व प्रसार पुण्याला केला होता. ग. म. सोहनी हे शाळेत सुपरिटेंडंट म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांनी कोणतीही संस्‍था स्‍थापन न करता केवळ भाषणांच्‍या साह्याने देहदानाविषयी जनजागृती घडवण्‍याचा प्रयत्‍न केला. शंतनुराव किर्लोस्‍कर आणि ना. ग. गोरे यांच्‍या सहकार्याने सोहनी यांनी देहदानासंबंधीची काही पुस्‍तकेही प्रसिद्ध केली होती. मात्र त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर ते कार्य खंडित झाले. सोहनी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी मरणोत्तर देहदान-नेत्रदान यांचा प्रसार सुरू केला. ते साल होते 1988. त्या वर्षी संस्थेची नोंदणी करण्‍यात आली.

ग. म. सोहनी यांच्‍या एक भाषणाचा वृत्‍तांत गुरूदास तांबे यांच्‍या वाचनात आला. त्‍यांना देहदानाचा मुद्दा महत्‍त्‍वाचा वाटला. त्‍यानंतर त्‍यांनी जे. जे. रुग्‍णालयासहित मुंबईतील काही रुग्‍णलयांमध्‍ये जाऊन देहदानासंबंधीची माहिती गोळा केली. त्‍यातून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे त्‍यांनी 1987 साली दधीची देहदान मंडळाची अनौपचारिक स्‍थापना केली.
विश्व हिंदू परिषदेकडून भिवंडी येथे शिक्षण घेणार्‍या आदिवासी मुलांकरता वसतिगृह चालवले जाते. त्याची जबाबदारी 1974 सालापासून गुरुदास तांबे सांभाळत असत. वसतिगृहासाठी निधी गोळा करण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडे असे. मोठ्या प्रमाणात निधी गोळा करावा आणि त्‍यातून वसतिगृहामधील विद्यार्थ्‍यांचा खर्च भागवला जावा अशी तांबे यांची कल्‍पना होती. त्याकरता त्‍यांनी जी.पी.ओ.मधील नोकरीचा राजीनामा दिला आणि वसतिगृहाच्‍या जोडीने दधीची देहदान मंडळाचे काम सुरू केले. तांबे यांनी स्वत:चा देहदानाचा फार्म प्रथम भरला. त्यांनी बरोबरीच्या मित्रमंडळींबरोबर चर्चा करून देहदान मंडळाची स्थापना करत हा विषय डोंबिवली-ठाणे-मुलुंड येथील ज्येष्ठ नागरिक संघांपुढे ठेवला. सुरुवातीला, कॉर्नर मीटिंगा, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाच्‍या बैठका अशा माध्‍यमातून त्‍यांनी मंडळाच्‍या कल्‍पनेचा प्रसार केला. मग चर्चा/संवाद सुरू झाले. त्यातून प्रतिसाद मिळू लागला. तांबे यांनी तोच ध्यास घेऊन त्यांच्या घरीच कार्य चालू केले. गुरुदास तांबे यांच्‍या
रेडिओवर अनेक वेळा मुलाखती झाल्‍या.
मंडळाचे नाव ठेवताना सांस्कृतिक दृष्टीने विचार केला गेला. त्यांना वेदामध्ये एका कथेचा संदर्भ मिळाला. वृत्रासूर नावाच्या दैत्याने इंद्रादी देवांना त्रास देऊन त्राही भगवान करून सोडले. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना गार्‍हाणे घातले. भगवान विष्णू यांनी योगशास्त्रात पारंगत अशा दधीची ऋषी यांना, त्यांनी योगाच्या साहाय्याने जिवंतपणी प्राणोत्क्रमण करावे आणि त्यांच्या अस्थींचे वज्र बनवून वृत्रासुराचा वध करावा अशी आज्ञा केली. दधीची यांनी विष्णूची आज्ञा प्रमाण मानून पहिले देहदान केले! म्हणून मंडळाचे नाव दधीची देहदान मंडळअसे ठेवण्यात आले.
सध्या मंडळाचे अध्यक्ष विनायक जोशी असून कार्यवाह म्हणून सुरेश तांबे आहेत. गुरूदास तांबे हे सुरेश तांबे यांचे वडिलबंधू आहेत. काही ज्येष्ठ नागरिक हे काम नेटाने पुढे नेत आहेत.

सभासदांचे भरून आलेले फार्म वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांत पाठवण्यात येतात. वैद्यकीय महाविद्यालये सभासदांच्या नावे ओळखपत्रे बनवून देतात. म्हणजे त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तिचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात अडचण येत नाही. काही महाविद्यालये स्वत: शव आणण्यासाठी मेडिकल व्हॅन पाठवतात, तर काही त्याबद्दल मोबदला देतात. पण देह स्वीकारण्यापूर्वी शव निरोगी असल्याबद्दल डॉक्टरांचे सर्टिफिकेट असावे लागते. व्यक्तीला निधनापूर्वी काही रोग असल्यास महाविद्यालये शरीर स्वीकारत नाहीत.
महाराष्ट्रात दीडशे वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमानुसार माणसाच्या शरीरशास्त्राची रचना समजण्यासाठी दहा-पंधरा विद्यार्थ्यांना एक देह असावा लागतो. यावरून वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी किती मृत शरीरांची आवश्यकता आहे हे लक्षात येते.
विज्ञान, मेडिकल सायन्समध्ये नवनवीन इतके शोध लागले आहेत, की व्यक्तीच्या निधनानंतर एक मानवी देह अनेक जिवंत व्यक्तींची आयुष्ये सुखी करण्याकरता उपयोगी ठरू शकतो. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो. मानवाच्या अनेक अवयवांचे रोपण इतरांच्या शरीरात करणे शक्य झाले आहे. मानवी त्वचादेखील जळित तसे अपघातातील व्यक्तींना उपयोगी पडू शकते.

आपल्‍याकडे असलेली पुस्‍तके एकदा वाचली की पडून राहतात. दधीची देहदान मंडळाकडून लोकांना आवाहन करून अशी पुस्‍तके मिळवली जातात. या प्रयत्‍नांतून मंडळाने दधीची ज्‍येष्‍ठ नागरिक वाचनालयहे निःशुल्‍क वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयात लोकांकडून दान करण्‍यात आलेली चार कपाटेही आहेत. मंडळाच्‍या सभासदांना पुस्‍तके घरी नेण्‍याची सुविधा आहे. या ठिकाणी दर आठवड्याला वामनराव नवरे यांच्‍याकडून गीतेचे वर्ग भरवण्‍यात येतात. तसेच दर शनिवारच्‍या वर्गात गीतेच्‍या एका अध्‍यायावर गुरुदास तांबे यांच्‍याकडून भाष्‍य केले जाते. याचबरोबर मंडळाकडून गेल्‍या पंधरा वर्षांपासून महर्षी दधीची देहदान पत्रिकानावाचे एक त्रैमासिकही चालवण्‍यात येते.
दधीची देहदान मंडळात सोळाशेपेक्षा जास्त लोकांनी फार्म भरुन दिले आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा जास्त व्यक्तींचे देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयातून केले गेले आहे. मंडळ दर तीन महिन्यांनी पत्रिका प्रकाशित करते व आपल्या सभासदांना विनामूल्य पाठवते. त्यामध्ये देहदानाबरोबर नेत्रदान -अवयवदान-त्वचादान, तसेच इच्छामरण यासंबंधी मार्गदर्शपर लेख असतात. यापैकी देहदान, नेत्रदान व त्वचादान यांमध्ये मंडळ साखळी निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. समाजात जागृती निर्माण झाल्यामुळे दर तीन महिन्यांत शंभर-सव्वाशे लोक देहदानाचे व नेत्रदानाचे फार्म भरतात. मंडळ सभासदांशी संपर्क राहण्यासाठी वर्षातून दोन-तीन कार्यक्रम करते. मकर संक्रांतीचा तिळगुळ समारंभ, दधीची ऋषींची जयंती भाद्रपद महिन्यात असते, त्या समारंभात ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. तिसरा समारंभ वार्षिक सभेचा.

मंडळाने देहदान, शंकासमाधानअसे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
संपर्कदूरध्वनी : (0251) 2490740
सुरेश तांबे, सचिव - भ्रमणध्वनी : 9867755572
विनायक जोशी, अध्‍यक्ष – 9324324157, 2481553
पत्रव्‍यवहाराचा पत्‍ताश्री गुरूदास तांबे, ए-6/6, एलोरो सोसायटी, विष्‍णूनगर, डोंबिवली पश्चिम, 421202
कार्यालयाचा पत्‍ता- न्‍यू अनंत सोसायटी, पंडित दीनदयाळ मार्ग, डोंबिवली पश्चिम, 421202
प्रभाकर भिडे- बी-२०१ ओम यमुना माधव सोसायटी, सावरकर रोड, डोंबिवली (पूर्व), टेलिफोन: (0251) 2443642, 9892563154

मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार


::: मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार  :::

सहा शब्दांचा मंत्र माझी चूक झाली , हे मान्य आहे.
पाच शब्दाचा मंत्र हे तू फारच छान केलस!
चार शब्दांचा मंत्र तुझ मत काय आहे?
तीन शब्दांचा मंत्र एवढ प्लीज करशील ?
दोन शब्दांचा मंत्र आभारी आहे.
एका शब्दांचा मंत्र आपण



आपल्या कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. कार्यपूर्तीतून निखळ आनंद मिळतो. कामाची गुणवत्ता आणि काम करण्याची गुणवत्ता यात फरक करता येत नाही. एखादे काम तुम्ही किती वेगाने केलतं हे त्यांच्या लक्षात राहतं. तुम्ही अगदी रस्ता झाडण्यासारखं साधं काम करत असतात तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की लोकांनी थांबून म्हटलं पाहीजे, “ इतका छान झाडलेला रस्ता दुसरा पाहण्यास आला नाहीकाम असं करावं की त्यातुन आपल्या कौशल्याचा, कामगिरीचा अभिमान वाटला पाहिजे. आणि केलेले काम चांगल झाल्याचे समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे. एखादे काम चांगले केल्यामुळे वाटणार समाधान हेच खरं बक्षिस असते.  नकारात्मक विचार करण्यापेक्षा विचारसरणीस मदत होते. सकारत्मक विश्वास हा सकारात्मक विचारापेक्षा खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल असे निश्चितपणे वाटण म्हणजे सकारात्मक विश्वास.

              जीवनमुल्य, श्रद्धा-निष्ठा आणि व्यक्तिमत्त्व यांची बेरीज म्हणजेच माणसाचं चारित्र्य जगातील कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा आपलं चारित्र्य जपण्याची अधिक गरज असते. यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची गरज असते उत्तम चारित्य व्यक्तिंची वैशिष्ट्ये असणारे असे लोक कुठेही उठून दिसतात. या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त असतो. हे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहतात. हे लोक जबाबदाऱ्या स्विकारतात. हे लोक कणखर असतात. हे लोक विजयात ही नम्र असतात. असे लोक स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर असतात.
यशस्वी लोक हे काही अवाढव्य अचाट गोष्टी करीत नाहीत, तर ते साध्या साध्या गोष्टी वैशिष्टपूर्ण रीतीने व्यवस्थित करतात. तसे पाहिले तर शारिरीक दृष्ट्या मनुष्यप्राणी हा सर्वात दुबळा प्राणी आहे. तो पक्षासारखा उडू शकत नाही.हे मला माहीत आहे तसेच  तो पळण्यात चित्त्याला मागे टाकू शकत नाही. हे देखील माहीत आहे . माकडाप्रमाणे झाडावर सरसर चढू शकत नाही. वाघासारखी नखे नाहीत. परंतू निसर्गाने माणसाला सर्वात मोठी देणगी दिलेली आहे ती म्हणजे विचार करण्याची .........दुर्दैव एवढेच की फार थोडे लोक ह्या महान देणगीच्या विचारशक्तीचा पुरेपूर उपयोग करतात. आणि हे परमेश्वरा मला सुद्धा तशी सुबुद्धी दे आणि कायम मला त्याचे स्मरण राहू दे एवढीच इच्छया ............
                                                                                      श्री स्वामी समर्थ शरणं मम ......

                                                                 राधे __/|\__ कृष्ण 

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 21

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.







              भिनलेला मृदुगंध प्रीतीचा 
                              नेहमीच मज उमजतो 
                              अंगावर झुळूकसम प्रीत शहारे 
                                                मोरपिसारे फुलवितो ~~~



घट्ट रोवलंय नात्याचे निशाण
     नक्षत्रात तूच खळखळनारी तारका
         जुनं असून जाळी नसलेलं पिंपळपान
               पेटत्या यौवनात शहार हिरवागार ~~~~





     

      परंपरेची अनमोल भेट स्वरांजलीस
                 सुरातील बहर असून देखणी
                      इंद्रधनु ढग होऊन बरसशील
                           ओळख अस्तित्वाची कधी देशील ?





फुलेल आता मनीचा श्रावण
      नको कुंपण अंतरीचे अबोल
           जमून येतील माळलेली नक्षत्र
              बहरेल ओल्या दवात उबदार शृंगार ~~~~


पोवाडा गाताना डफ फाटला 
   स्वच्छंद लावण्या जोखडातून सुटल्या 
     जाणवल्या भुरभुरत्या अवजड बटा 
        पुन्हा अवखळ नको हुरहुरणारया ~~~~





राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे. 

Saturday, September 19, 2015

मानसिक स्वास्थ सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली ---- डॉ. विद्याधर बापट .... मानसोपचार तज्ञ

मानसिक स्वास्थ सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली ----    
           डॉ. विद्याधर बापट .... 
मानसोपचार तज्ञ 



हलो आई,
अगदी राहवेना म्हणून तुला काही सांगायचं ठरवलंय मी आज . मला माहितीय मी खूप लहान आहे अजून. लहान म्हणजे काय.. अगदीच लहान.. खरं तर मला वयच नाहीय ! .. जन्मालाच यायचोय ना मी अजून. माझा मुक्काम आहे तुझ्या पोटात.. मस्त मजेत आहे मी. तुझ्या मायेच्या उबेत.. सुरक्षित.. पण खरं सांगू का आई ? फक्त तुझ्यात आणि माझ्यातच ठेव हं हे .. तू सगळं छान करतेयस माझं . खाणं, पिणं, व्यायाम, माझी शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ चांगली व्हावी म्हणून गर्भसंस्कार. सगळं छानच. पण अलिकडे थोडसं अस्वस्थ वाटतं मला. भीतीसुद्धा वाटते कधीकधी. तुझी नाही गं .. ती तर कधीच वाटणार नाही..
तुझाच तर भाग आहे ना मी. मला अस्वस्थ वाटतंय माझ्या आसपास जे घडतंय ना.. त्यामुळे. बोलू ना मोकळेपणानं ? .. हं .. मग सांगतोच सगळं.. परवा रात्री तुझं आणि बाबाचं भांडण झालं जोरजोरात. तशी तर तुमची भांडणं सारखीच होतात. पण परवाचं अगदी टोकाचं. केवढ्या जोरजोरात? बाबा म्हणाला फार झालं आता. जमत नसेल तर वेगळं होऊ दोघे.तुही ओरडलीस माझीही इच्छा नाहीय आता एकत्र रहाण्याची”. मग एकदम शांतता. मी घाबरूनच गेलो. आणि माझी दीदी सुद्धा. ती सुद्धा केवढीशी आहे अजून. दुसरीत जाणारी . म्हणजे लहानच की नाही गं? रडायलाच लागली ती. तीला जवळ घ्यायचं सोडून रागावलीस तीला आता हिला काय झालं भोकाड पसरायला? जा जाउन झोप तिकडे त्या खोलीत. लवकर उठायचंय सकाळी. शाळा आहे. रिक्षा येईल. चल जा आधी.आता तुमच्या भांडणात दिदीची काय चूक झाली? .. कमालच झाली म्हणजे.. तरी मी तुला सारखा पायांनी ढकलत होतो आतून. पण लक्ष कुठे होतं तुझं? पुन्हा भांडण सुरु. मग पुन्हा एकदा त्या डॉक्टर काकांकडे जायचं ठरलं.. शेवटचं.. मग लाईट घालवलेत.. नंतर ती नकोशी शांतता.. रात्रभर जागीच होतीस तू.. अस्वस्थ .. मग मला कुठली शांत झोप?
काल डॉक्टरकाकांकडे गेलात दोघं. किती छान समजावून सांगितलं त्यांनी तुम्हाला? म्हणाले वेगळं होण्याची परिस्थिती आहे असं मला अजूनही वाटत नाही. सहजीवन हे आनंदासाठी असतं. दोघानीही थोडं समजून घ्या. आयुष्य आणि संसार प्रेमावर, विश्वासावर उभा रहातो. संशय आणि अहंकार शत्रू क्रमांक एक. लहान सहान कारणांवरून भांडणं चांगली नाहीत. मला हवं तसंच दुसऱ्यानं वागलं पाहिजे हा आग्रह नेहमीच बरोबर नाही. समोरच्याचीही काही बाजू असू शकते. आज एक गोंडस मुलगी पदरात आहे. एक मुल पोटात आहे.. म्हणजे मी.. त्यांच्या भवितव्याचा विचार करा. त्यांच्यावर काय परिणाम होईल? त्यांच्यात भावनिक असुरक्षितता निर्माण होऊ शकते. आणि पुढे व्यक्तिमत्वावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही दोघंही सुशिक्षित आहात. दोघंही मिळवते आहात. विचार करण्याची पद्धत बदलायची आणि मुख्य म्हणजे अहंकार सोडायचा. बस.
आई, हा अहंकार काय प्रकार आहे गं? काहीतरी फार भारी प्रकरण दिसतंय.. डॉक्टर काकांकडच्या सगळ्या मिटींग्स मध्ये हे सांगतातच . त्यांनी शांत होण्यासाठी, स्वभाव बदलण्यासाठी, विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी काही मनाचे व्यायाम

सांगितले होते. पण तुम्ही ते काही न करता नुसते भांडतच रहाता. मला आणि दिदीला किती त्रास होतो त्याचा? आणि एक महत्वाचा मुद्दा.. माझं जाऊ दे. मी तर अजून यायचोच आहे जगात. पण दिदीची काय अवस्था झालीय..आपण दोघं गेलो होतो ना तीच्या शाळेत मागे? टीचर सांगत होती .. मुलगी हुशार आहे पण अभ्यासात एकाग्रता होत नाही..टेन्शन आहे कसलं तरी. घाबरून घाबरून असते सारखी. मिसळत नाही मुलांच्यात म्हणावी तशी. एकदा काउन्सेलरला भेटा. काय झालंय आई तीला? घरी सुद्धा हट्ट करते सारखी. नाहीतर हिरमुसलेली असते. रडते. चिडते. डॉक्टरकाका म्हणाले, हे काही केवळ तुमच्या दोघांच्या भांडणामुळे नाहीय. पण आई वडिलांच्या मधल्या तणावाचा मुलांवर परिणाम होऊ शकतो म्हणाले. मलाच टेन्शन आलंय. मला खूप आवडते दिदी. आपण तिघंच असलो की पोटावरून हात फिरवते तुझ्या. लाड करते माझे. गोड गोड बोलते माझ्याशी. किती छान वाटतं तेंव्हा. आणि आई खरं सांगू ? बाबाही आवडतो मला. म्हणजे तुम्ही दोघंही. आपण राहू या ना सगळे मिळून ! सोडून नाही जाणार ना तुम्ही आम्हा दोघांना ? मी प्रॉमिस देतो. कधी त्रास नाही देणार मी तुम्हा दोघांना? खूप मोठा होईन. नक्की.. हे जग म्हणे खूप असुरक्षीत होत चाललंय. म्हणजे काय मला कळत नाही. पण तुमच्या दोघांची मायेची पाखर जर असेल आम्हा दोघांवर तर किती सुरक्षित वाटेल आम्हाला? रागावू नकोस हं आई. जरा जास्तच बोललो म्हणून. शेवटी तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे गं आणखी? ..
तुझा सोनूला आणि बाबाचा पिट्टू




                                     झोप

माणसाला झोप का येते आणि झोपेची आवश्यकता का आहे ह्या बद्दल आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी अनेक थिअरिज मांडल्या आहेत पण एक नक्की की आपण कार्यक्षम राहण्यासाठी , उत्साहासाठी, भावनिक समतोलासाठी, एकूणच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शांत झोप अत्यावश्यक आहे.
आपण रात्रीच का झोपतो? तर शरीरामध्ये असलेले जैविक घड्याळ (Biological clock) किंवा circadian clock जे सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलत राहते ह्यांच्याशी झोपेचा संबंध आहे. जसा जसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागतो तसं तसं शरीरात मेलोटोनीन नावाचे संप्रेरक स्त्रवू लागतं आणि झोप येऊ लागते. मेंदूतील wave activity, संप्रेरकांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि इतर महत्वाची कार्ये ह्या घड्याळाशी, पर्यायाने झोपेशी संबंधित आहेत. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात झोप येणे हे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.
झोप का महत्वाची आहे त्याची कारणे-
चांगल्या, शांत, पुरेश्या झोपेमुळे -
१. हृदय निरोगी रहाण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेचा संबंध अनियमित रक्तदाब व रक्तातील क्लोरेस्टोलशी आहे.
२. ताणतणाव कमी होतो- स्ट्रेस संप्रेरके कमी स्त्रवतात. पर्यायाने रक्तदाब नियमन व हृदयासाठी उपयुक्त.
३. स्मरणशक्ती व एकाग्रता चांगली रहाते- शरीर झोपलेले असले तरीही मेंदू, दिवसभरातील व पूर्वीच्या घटना, भावना, स्मृती, अनुभव वगैरेंची सांगड घालून memory consolidation चे (स्मृतींच्या फाइल्स तयार करण्याचे) महत्वाचे काम करत असतो. जे आपल्या भविष्य काळासाठी अतिशय महत्वाचे असते.
४. उत्साह व सतर्कता चांगली झोप आपल्याला उत्साही तसेच सतर्क बनवते. तसेच दुसऱ्या दिवशी चांगली झोप मिळण्याची एक चांगली शक्यता निर्माण होते.
५. दुरुस्ती व देखभाल झोपेमध्ये पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात ज्याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना ह्यासाठी होतो.
६. नैराश्य कमी होण्यास मदत मेंदूत सेरोटोनीन हे संप्रेरक योग्य प्रमाणात स्त्रवल्यामुळे नैराश्याची शक्यता किंवा नैराश्य
कमी होण्यास मदत होते. उत्साह वाढतो.
७. शारीरिक आजार बरे होण्यास व एकूणच प्रतिबंध होण्यास मदत निद्रानाशामुळे स्ट्रेस सम्प्रेरकांमुळे होणाऱ्या मानसिक तणावजन्य आजारांबरोबरच आर्थ्रायटीस, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी निर्माण होत असतात. शरीर लवकर थकते व वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागते. ह्या सर्वांना शांत, नियमित झोपेमुळे प्रतिबंध होतो.
पण अनेकांना झोप न येण्याचा म्हणजेच निद्रानाशाचा आजार असतो.
निद्रानाश किंवा झोप न येणे ह्या आजारात साधारण पुढीलपैकी एक किंवा जास्त लक्षणे दिसतात १ अजिबात झोपच न येणे २. मध्यरात्रीच उठून बसणे व पुन्हा झोप न येणे ३. सकाळी खूप लवकर जाग येणे ४. झ़ोपेतून जागे झाल्यावर अतिशय थकवा वाटणे. ५. वेडीवाकडी, संदर्भ नसलेली स्वप्ने पडणे व सकाळी अस्वस्थता जाणवत रहाणे.
निद्रानाशाचे ढोबळ मानाने दोन प्रकार असू शकतात. १. प्रायमरी निद्रानाश ह्या प्रकारात व्यक्तीचा निद्रानाश कुठल्याही इतर शारीरिक आजाराशी निगडित नसतो. सेकंडरी निद्रानाश ह्या प्रकारात झोप न येणे हे कुठल्या ना कुठल्या शारिरिक किंवा मानसिक व्याधीशी निगडित असते. उदा. अस्थमा, अर्थाइट्रिस, कर्करोग, हृदयविकार, मानसिक व्याधि, नैराश्य, वेदना, व्यसनाधिनता इ.
निद्रानाश हा कमी कालावधीसाठी (Acute Insomnia) किंवा जास्त कालावधीसाठी (Chronic Insomnia) असू शकतो.
निद्रानाशाची कारणे पुढील असू शकतात. १. आयुष्यातील महत्वाच्या तणावकारक घटना उदा. जवळील व्यक्तीचा मृत्यु, घटस्फोट, अचानक नोकरी जाणे २. शारीरिक आजारपण व वेदना ३. भावनात्मक ताणतणाव ४. काही औषधांचे साइड

इफेक्टस ५. नैराश्य ६. दबलेली असुरक्षितता, भीति इ. ७. सतत च्या नाइट शिफ्ट्स किंवा प्रवासामुळे झोपेचे बिघडलेले रूटीन ८. व्यसने ९. मोबाइल्स किंवा इंटर नेटचे व्यसन १०. जुना chronic ताण तणावाचा आजार
निद्रानाशामुळे काय होते ?- दिवसभर ग्लानी येणे, थकवा वाटणे, चीड चीड होणे, एकाग्रता न होऊ शकणे तसेच विस्मरण होणे, निरुत्साह, निर्णय क्षमता घटणे, शारिरीक वजन वाढणे, प्रतिकार शक्ती घटणे , मधुमेह, हृदयविकार, पचनाच्या तक्रारी व इतर शारीरिक आणि मानसिक व्याधी ह्या गोष्टी असू शकतात.
झोपेच्या स्टेजेस प्रामुख्याने दोन. Rem स्लीप (Rapid Eye Movement) ही सुरवातीची पायरी ज्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणं इ. घडतं. दुसरी स्टेज Non-Rem स्लीप जिच्या मध्ये आपण साधारण तीन पायऱ्यांमध्ये आपण जास्त जास्त गाढ झोपेत जातो. ही खूप महत्वाची. खरी झोप. डीप स्लीप. ह्या पायऱ्या आलटून पालटून येत असतात व त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. अनेकांची, आपण खूप वेळ झोपतो तरी झोप झाल्यासारखे वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, अशी तक्रार असते. ह्यांच्या बाबतीत डीप स्लिपची पायरी खूप कमी वेळा येते व कमी काळ टिकते.
तीव्र निद्रानाशाचा त्रास बराच काळ असेल तर वेळ न दवडता तज्ञांना भेटावे. निद्रानाशाच्या कारणांच्या मुळाशी जाउन उपचार करणे आवश्यक असते. निद्रानाशाच्या मागील शारीरिक व मानसिक कारणे शोधून योग्य ते आवश्यक उपाय योजना करणे शक्य असते. औषधे तसेच, तणाव नियंत्रणाचे तंत्र, स्व-संमोहन थेरपी, स्लीप रेस्टरिक्शन थेरपी, रिकंडीशनींग थेरपी, बिहेवियरल थेरपी असे अनेक उपचार उपयुक्त असतात.
ज्यांना सौम्य निद्रानाशाचा त्रास होतो त्यांच्यासाठी काही टिप्स १. शक्यतो रात्री झोपण्याची व सकाळी उठण्याची विशिष्ट वेळ ठरवून पाळावी. २. संध्याकाळनंतर चहा, कॉफी इ. पेये घेऊ नयेत. ३. रोज भरपूर व्यायाम करावा. परंतु व्यायाम व रात्रीची झोप ह्यामधील अंतर तीन ते चार तासांचे असावे. ४. रात्री उशिरा व जड जेवण जेवू नये. रात्रीचे जेवण व झोपेची वेळ ह्यात किमान दीड-दोन तासांचे अंतर असावे. ५. झोपण्यापूर्वी ध्यान-धारणा, संगीत ऐकणे, शक्य असल्यास स्नान करणे उपयुक्त ठरते.



६. मनात काळजीचे किंवा अस्वस्थतेचे विचार येत असतील तर त्यांची एक यादी बनवावी व स्वत:ला सांगावे की ह्याबद्दल मी उदया “worry time ” (काळजीचे विचार करण्याची विशिष्ट वेळ) मध्ये विचार करीन. सोयीने तसा दिवसातला worry time ठरवून घ्यावा. व त्यावेळी काळजीच्या प्रश्नांवर विवेक पूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. न जमल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. परंतु झोपेची वेळ ही प्राध्यान्याने महत्वाची आहे हे स्वत:शी ठरवून टाकावे व शांत राहावे.
शरीराच्या व मनाच्या गरजेप्रमाणे आवश्यक अशी शांत आणि पुरेशी झोप हे चांगल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.