::: मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार :::
सहा शब्दांचा मंत्र माझी चूक झाली , हे मान्य आहे.
पाच शब्दाचा मंत्र हे तू फारच छान केलस!
चार शब्दांचा मंत्र तुझ मत काय आहे?
तीन शब्दांचा मंत्र एवढ प्लीज करशील ?
दोन शब्दांचा मंत्र आभारी आहे.
एका शब्दांचा मंत्र आपण
आपल्या कामगिरीचा अभिमान म्हणजे अहंकार नव्हे. कार्यपूर्तीतून निखळ
आनंद मिळतो. कामाची गुणवत्ता आणि काम करण्याची गुणवत्ता यात फरक करता येत नाही.
एखादे काम तुम्ही किती वेगाने केलतं हे त्यांच्या लक्षात राहतं. तुम्ही अगदी रस्ता
झाडण्यासारखं साधं काम करत असतात तरी ते काम इतकं मनापासून आणि इतकं चांगलं करा की
लोकांनी थांबून म्हटलं पाहीजे,
“ इतका छान झाडलेला रस्ता दुसरा
पाहण्यास आला नाही” काम असं करावं की त्यातुन आपल्या कौशल्याचा, कामगिरीचा अभिमान
वाटला पाहिजे. आणि केलेले काम चांगल झाल्याचे समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे. एखादे
काम चांगले केल्यामुळे वाटणार समाधान हेच खरं बक्षिस असते. नकारात्मक विचार
करण्यापेक्षा विचारसरणीस मदत होते. सकारत्मक विश्वास हा सकारात्मक विचारापेक्षा
खूप श्रेष्ठ असतो. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल असे निश्चितपणे वाटण म्हणजे
सकारात्मक विश्वास.
जीवनमुल्य, श्रद्धा-निष्ठा आणि व्यक्तिमत्त्व यांची बेरीज म्हणजेच माणसाचं
चारित्र्य जगातील कोणत्याही मौल्यवान रत्नापेक्षा आपलं चारित्र्य जपण्याची अधिक
गरज असते. यशस्वी होण्यासाठी चारित्र्याची गरज असते उत्तम चारित्य व्यक्तिंची
वैशिष्ट्ये असणारे असे लोक कुठेही उठून दिसतात. या लोकांचा आत्मविश्वास जबरदस्त
असतो. हे लोक उच्चपदी असले तरी सर्वांशी मिळून मिसळून राहतात. हे लोक जबाबदाऱ्या
स्विकारतात. हे लोक कणखर असतात. हे लोक विजयात ही नम्र असतात. असे लोक स्वयंपूर्ण
आणि आत्मनिर्भर असतात.
यशस्वी लोक हे काही अवाढव्य अचाट गोष्टी करीत नाहीत, तर ते साध्या साध्या गोष्टी
वैशिष्टपूर्ण रीतीने व्यवस्थित करतात. तसे पाहिले तर शारिरीक दृष्ट्या
मनुष्यप्राणी हा सर्वात दुबळा प्राणी आहे. तो पक्षासारखा उडू शकत नाही.हे मला
माहीत आहे तसेच तो पळण्यात चित्त्याला
मागे टाकू शकत नाही. हे देखील माहीत आहे . माकडाप्रमाणे झाडावर सरसर चढू शकत नाही.
वाघासारखी नखे नाहीत. परंतू निसर्गाने माणसाला सर्वात मोठी देणगी दिलेली आहे ती
म्हणजे विचार करण्याची .........दुर्दैव एवढेच की फार थोडे लोक ह्या महान
देणगीच्या विचारशक्तीचा पुरेपूर उपयोग करतात. आणि हे परमेश्वरा मला सुद्धा तशी सुबुद्धी
दे आणि कायम मला त्याचे स्मरण राहू दे एवढीच इच्छया ............
श्री स्वामी समर्थ शरणं मम ......
राधे __/|\__ कृष्ण
No comments:
Post a Comment