Saturday, September 19, 2015

मुक्तपक्षी भाग क्रमांक - 20

हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
 आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा प्रयत्न केला तर ?... 
 ठरवले तर सहज शक्य आहे.

अंतरंगातून सहज सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.


तुझ्या डोळ्यातून एकाच वेळी
झरताना दिसेल समझुन घेतल्याचे भाव
      दाटणाऱ्या प्रश्नांची मिळतील उत्तरे
      दाबीत ओठात दात ~~~~~~



तुझे ओघळणारे अश्रू
  टिपायला जेव्हा माझे हाथ नसतील
     उसवलेले ठिगळ लावलेलं मन
       हुल्लडबाजीतही अंतरी विव्हळेल ~~~~~




खपल्या जखमांच्या खरचटल्या
  वादळाने साहिले ठाम संयमाने
      विझून पेटावे पुन्हा कितीदा
         नको फुका छळणारे शिडकावे ~~~~~~



मावळती चंद्रकोर मंदावते
   रंगतरंग निळाईचा तु अंतरात्मा
      लेवून उगवत्या दिनकराची भोर ल्याले
        चंद्र सखा , वेडं नभातला ~~~~




मावळतीला परसदारी 
   संध्याची लालीमा ओसंडते 
     अंगावर येणाऱ्या किरणांची 
      आठवण खळखळून मोहरते ~~~~~





राधे __/|\__ कृष्ण                              !! श्री स्वामी समर्थ !!
                                                         कैलास मांडगे 

No comments: