हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा
प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज
सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे.
आत्मविश्वासाने मिळविलेले भावविश्व
उंच झेप घेऊन बांधलेलं घरट
त्यात जीवापाड जपूया नातं
खुलू दे त्यात अजोड तारांगण ~~~~~~
आयुष्य सोनसळी चा भास
आवडती मधुगंधा मनविभोर सांज
साजन वेडा गडगडट घाली साद
उब दाटता रिमझिमता रोमांच ~~~
विद्रोह जेव्हा पेटतो डोळ्यात
उजाड ज्याने केले विश्व सारे
पदोपदी धगधगता विखार
नको जखमांवर चंदन उगाळणे ~~~~
धपापु दे थेंब टपोरे वादळी
कोंडू दे श्वास घट्ट माझा
मज हवी पुन्हा तृप्ती
धुंद मनाचा फेसाळू दे किनारा ~~~~~~
धूप चाहे खुद को कम कर ले
चांदणी का मंझर नहीं बन सकती
आप तो खुलते चांद की तरह
हम तो उलझी शाम की तरह ~~~~~
राधे __/|\__ कृष्ण !!
श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे
No comments:
Post a Comment