हृदयाच्या पिज-यात बंदिस्त करून ठेवलेल्या आठवणीच्या
पक्षाला आपण मुक्तउडू दिले तर ?...
आणि त्याला मुक्त उडताना पाहून मिळणा-या समाधानात आनंदमिळवण्याचा
प्रयत्न केला तर ?...
ठरवले तर सहज शक्य आहे.
अंतरंगातून सहज
सुचलेल्या माझ्या चारोळ्या ............ कैलास मांडगे
आयुष्याची तू नीत नवी प्रेरणा
तूच प्रश्न आणि तूच उत्तर
सहवासात तुझ्या सखे
सर्व काही गोड झाले ~~~~
आयुष्याचा सुगंधच निराळा
फुलांनी ओंजळ भरावी
श्रमिकांना राबतांना
विनवावे घ्या येथे विश्रांती ~~~~
हळवासा नाद अखंड घुमतोय
निरर्थक आहे तुझ्या शिवाय जगणे
अबोल तुझा भास छळ्तोय
तितकेच समरस होऊन वाट पहाणे ~~~
अलवार सूर नसतात हरवणारे
भाव अंतर्मनात पोहोचवणारे सखे
तुझी छबी पसरवतात अलीकडे
ऋतु स्मरू दे गतकाळाचे ~~~~~
चिमुटभर आनंदावर जमली धूळ
शब्दातीत भाव झाले पारखे
म्यान करू किती तलवारी
अर्थाचा अनर्थ होतांना अंतर्मन कळवळे ~~
राधे __/|\__ कृष्ण !! श्री स्वामी समर्थ !!
कैलास मांडगे ~~~~~
No comments:
Post a Comment